श्री सरस्वतीची तसवीर

जीवनांतले चित्र पालटूनी, रंग ते बदलले जनी जनार्दन ठरविले, सारे काय मिळविले ।१। सुंदर तसबीर एक आणली, देवी श्री लक्ष्मीची श्रद्धेचे भाव गुंतविले, पूजा करूनी तिची ।२। शिक्षण घेवूनी ज्ञान मिळविले, कष्टानें सारे शरीर होते चैतन्यमय, आणि धडपडणारे ।३। रंग बधितले जीवनांतील, विविध छटांचे सजविण्यास लागते त्या छटांना, बळ संपत्तीचे ।४। ज्ञान आणि प्रयत्न जेव्हां, एक […]

हृदय नावाची चीज

भूकंपाच्या एक एक धक्क्याने सारं जमीनदोस्त केलं | पहाता पहाता त्या भेगांनी होत्याच नव्हतं केलं ||१|| ज्वालामुखीच्या मुखातून लाव्हा भळभळतअसताना | प्रत्येक वस्तू खाक होत होती त्याला अंगावर घेताना ||२|| हे सारं लोभस दिसत होतं दुरुन पहाताना | मीच माझा राहू शकलो नाही हे अनुभवताना ||३|| म्हणून वाटतं या जगात प्रत्येक माणसाला | हृदय नावाची चिज […]

वाट

मला राज रस्त्यावरुन चालता येत नाही कारण ती शान मला पेलवत नाही | मला हम रस्त्यावरुन चालता येत नाही कारण सुखदु:खाच्या गर्दीतून वाट काढता येत नाही | मला आड वाटेंने चालता येत नाही कारण त्याचा तोकडेपणा मला झेपत नाही | मला वळणा-वळणाने चालता येत नाही कारण भोवळ येऊन मला मार्ग दिसत नाही | मला काट्याकुट्या पायवाटेंनं […]

तवा

या तव्यावरची भाकरी नाही निर्लेपला ऐकायची | कारण सरावलेल्या हातांनी तीला सवय होती फिरायची ||१|| ठरावीक ठिकाणी दाबल्यावर ती टच्च अशी फुगायची | दोनच चिमटीत धरुन अलगतशी तुटायची ||२|| तशीच जीवनाची भाकरी बाई तीला लेपनाची गरज नाही | कुठे फुगायचे कुठे ओसरायचे हे तिच्यावर अवलंबून नाही ||३|| सराईत हात दिसणार नाहीत चिमटीतून कधी सुटणार नाहीत | […]

अन्नपूर्णा

अन्नपूर्णा दारातून म्हणाली भाकरी दे माई | मी म्हणाले भाकरी नाही ब्रेड देवू कां बाई ||१|| ती म्हणाली भाकरीची चव ब्रेडला येणार नाही | मला मात्र भाकरी करायला वेळच नाही ||२|| एन्जॉयमेंट मधून मला खरं सवडच नाही | ब्रेडपेक्षा भाकरी मला परवडत नाही ||३|| रागावू नकोस तू जा पुढच्या दारी हीच रीत बघशील तू सध्या घरोघरी […]

रातराणी

पहाट झाली. काळपट आकाश उजळू लागलं. गार वारा भिरभिरू लागला. पाखरांचा किलबिलाट सुरू झाला. पाने सळसळली.. .. झाडांची झोप उडाली. फुलं हळूहळू फुलू लागली.. .. वाऱ्यावर डोलू लागली. आणि… एका झाडाला वाटलं, ‘छे! हे आता रोजचंच झालंय. रोज-रोज का सकाळी फुलायचं आणि वाऱ्यावर डोलायचं? हे सारं बदललंच पाहिजे. रोज पहाट आणि रोज रोज किलबिलाट. नको हा […]

आई

आईबरोबर भांडल्याशिवाय मला चैन नाही पडायची आणि तिच्या कुशीशिवाय मला निज नाही यायची ||१|| कारण मी होते मुलगी आणि ती होती आई मी चांगली घडावे म्हणून तीची सारखी घाई ||२|| आता मी झाले आई तेव्हा कळून चुकलं सारं आई म्हणजे झूळूक होती नव्हतं नुस्त वारं ||३|| आईबरोबर भांडायला मला मुळी आवडत नाही पण तीची कुस मला […]

चंदाराणी

१९४७ साली एक बालक जन्माला आले माय-पित्यांनी त्याचे नाव चंदाराणी ठेवले त्याच वेळी मी बिगर राज्याची राणी झाले नेहमीच विजय तर कधीतरी हार झाली आणि त्या हारेलाच एक वेगळी धार आली आयुष्याच्या सुखदु:खांशी मर्दानीपने लढली संकटाच्या सार्‍या थव्यांनी आता माघार घेतली स्त्री म्हणून सारे चटके मी एकटीनेच घेतले या सार्‍या चोथ्याचे राज्य माझे असेच उभे राहिले […]

बालकांसाठी काव्य मेवा

बालकांनी खावा छान छान मेवा वाटावा त्यांना सदा हवा हवा शाब्दिक मेवा बुध्दीचा ठेवा येता-जाता खावा खावा खावा मित्र-मैत्रिणींना द्यावा द्यावा द्यावा — सुधा नांदेडकर

असे पंचतारांकित पदार्थ मराठमोळे!

देशातील पंचतारांकित हॉटेलात हल्ली अस्सल मराठमोळे जेवण आणि नाष्टा मिळू लागला आहे याचे सर्व श्रेय तरुण तडफदार मराठी शेफना जाते ज्यांनी यासाठी खूप प्रयास केले. त्यात सोलकढी आणि खरवस यांनी तर बाजीच मारली आहे. […]

1 243 244 245 246 247 288