Web
Analytics
प्रेम नाणे – Marathisrushti Articles

प्रेम नाणे

तसेंच वागा इतरजणांशी,  वाटत असते ,तुमच्या मनीं
अपेक्षा करता तुम्हीं प्रेमाची,  सदैव इतरांकडूनी…१,

सहानूभुतीचा शब्द लागतो,  दैनंदिनीच्या तुमच्या जीवनीं
क्षणा क्षणाला भासत असते,  जीवन तुमचे अवलंबूनी…२,

प्रेम वाटतां इतरांना, परत मिळते तेच तुम्हांला
प्रेम नाण्याचे मूल्य जाणूनी चलनांत ठेवा हर घडीला…३,

याच नाण्यांनीं काम बनते, चटकन सारे बघा कसे
दोन मनें ती सांधली जावूनी,  आनंद सर्वत्र दिसत असे…४,

राग लोभ हे शत्रू आपले,  घालवूनी घ्यावे तुम्ही त्यांना
प्रेम नाण्याची मदत घेता,  सहज जमेल हे सर्वांना…५

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

 

About डॉ. भगवान नागापूरकर 1290 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…