नवीन लेखन...

निरागस जीवन

प्रफुल्लित ते भाव वदनी,  घेवूनीं उठला सूर्योदयीं गत दिनाच्या आठवणी नव्हत्या,  आज त्याच्या मनांत कांहीं…१ खेळत होता दिवसभर तो, इतर चिमुकल्या मित्रांसंगे खाणें पिणें आणिक खेळणें,  हीच तयाची जीवन अंगे…२ सांज होता काळोख येवूनी,  निश्चिंतता ही निघूनी गेली भीतीच्या मग वातावरणीं,  कूस आईची आधार वाटली..३ निद्रेच्या तो आधीन होतां,  निरोप घेई शांत मनाने येणाऱ्या त्या दिवसा […]

फेब्रुवारी

फेब्रुवारीला एवढी का बरं घाई दोन दिवस आधीच गुंडाळल्या जाई ! ****** आली का सुचना,आदेश कुठून आताशा फेब्रुवारी आटोपतं घेवून गुंडाळतो गाशा ! — श्रीकांत पेटकर 

आकाश

इतकं सारं विस्तीर्ण अवकाश असताना गरीबांच्या घरीच तेवढं छपरातून का डोकावून पाहावं आकाशानं ? — श्रीकांत पेटकर 

मराठी भाषा दिनानिमित्त ..

थोडा रिकामा दिसलो रे दिसलो की एखादा शब्द येतो कुठूनतरी त्याला थोडं गुणगुणलं कि अजून दुसरा मग तिसरा असे येत राहतात फेर धरतात मी सुद्धा जास्त विचार करत नाही शब्दांना येऊ देतो मग लिहून घेतो मला बरं वाटते …छान वाटते ते काही म्हणत नाही अन मीही काही म्हणत नाही हे सारं कविता आहे की अजून दुसरं […]

‘ तन्मयतेत’ आनंद – प्रभू

सतत गुंतलो आहो सारे शोध घेण्यास त्या ‘आनंदाला’ युगानूयुगे प्रयत्न होतो मिळवण्यासाठींच प्रभूला…१ बाह्य जगाचे सुख आगळे लागले सारे त्याच्या पाठीं ‘देह सुख’ अंतीम वाटे, खरा ‘आनंद’ देण्यापोटी…२ ‘ज्ञानामध्ये’ भरला  ‘आनंद’ समजूत झाली ही कांहींना लेखक, कवी, साहीत्यिक हे पाठ त्याची कांहीं सोडीना…३, साधू संत हे थोर महात्मे आनंद शोधूती ‘विश्रमांत’ ‘ध्यान’  लावून एक मनानें शांत […]

प्रकट दिन

असे कसे प्रकट होतात काही संतजन ज्यांना नसतात मायबाप नसते जन्मतारीखही प्रकटू देत त्यांचे त्यांना भेटू देत त्यांना भक्तही बापुडे हजारोंनी मला काय त्याचे…. पण म्हणतो देशासाठी देशाच्या सिमेवरही प्रकट व्हा हो संतानो असेच युध्दाचे वेळी हजारो संख्येनी !

कविते-बिवितेसाठी?

घर -दार ऑफिस- बिफीस पोरं-सोरं लोकल -बिकल रीक्षा -बिक्षा रोज दिवसभर जा- ये पुन्हा तसंच ये -जा लोकल- बिकल परत -फिरत घर -बार जेवण- खावण जीवन -बिवन चालत राहतं वेळ कुठे कविते-बिवितेसाठी? ती तर सतत–सोबत पाठी- पाठी मुखी -ओठी/// # कौशल श्रीकांत पेटकर ९७६९२१३९१३ 

एक झाड

एक झाड सारखं माझ्या स्वप्नांत येत राहतं अक्षरांनी लगडलेलं मी वेचतो,मी तोडतो मी जमवतो खुप अक्षरे आणि बनवतो निरनिराळे शब्द त्यांचेपासून माळेसारखी ओवून वाचकासाठी ठेवतो काही माझ्यासाठीही….. कुणी म्हणतात याला कविता कुणी गझल आणि कुणी काहीही! — श्रीकांत पेटकर

जगाचा निरोप

काळ येतां वृद्धपणाचा,  विरक्तींची येई भावना । निरोप घेण्या जगताचा,  तयार करीत असे मना  ।।१।। वेड्यापरी आकर्षण होते,  सर्व जगातील वस्तूंवरी । नाशवंत त्या, माहित असूनी,  प्रेम करितो जीवन भरी ।।२।। जीवनांतील ढळत्या वेळीं,  जेव्हां वळूनी बघतो मागें । मृगजळासाठीं धावत होतो,  जाणून घेण्या सुखाची अंगे ।।३।। प्रयत्न केले जरी बहूत,   हातीं न लागे काहीं । […]

वेळ दवडू नका

रंग भरले जीवनीं,  रंगात चालतो खेळ टप्प्या टप्प्याच्या नादानें,  जाई निघूनीया काळ….१, शिखरावरचे ध्येय,  दुरुनी वाटते गोड लांब लांब वाट दिसे,  जाणें तेथे अवघड……२, ठरलेल्या वेळेमध्ये,  जातां योग्य दिशेनें यश पदरीं येईल,  निश्चींच रहा मनानें….३, रमती गमती कुणी,  टप्प्यांत रंगूनी जाती वेळ सारा दवडूनी,  निराशा पदरी येती…४, जीवनातील अंगाचे,  अनूभव घेत जावे मिळणाऱ्या त्या सुखाला,  क्षणीक […]

1 227 228 229 230 231 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..