किर्तनी झोप

नियमित जाऊनी मंदिरी,  श्रवण करी तो किर्तन
तन्मयतेनें ऐकत असतां,  जाई सदैव तेथे झोपून…१,

एकाग्र करिता चित्त प्रभूसी,  निद्रेच्या तो आहारी जाई
निघूनी जाती सर्व मंडळी,  एकटाच तो तेथे राही….२,

पवित्रतेच्या वातावरणीं,  प्रभू नामाच्या लहरी फिरती
झोपीं गेला कोपऱ्यांत तो,  परिणाम त्या त्यावरी करती….३,

शांत असूनी निद्रीस्त इंद्रीये,  शोषूनी घेती त्या लहरी
आनंदाचे वलय भोवती,  समाधान ते त्यास करी….४

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

About डॉ. भगवान नागापूरकर 1383 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

महाभारतकालीन कुंतलनगर काटोल

महाभारत काळात कुंतलनगर या नावाने काटोल प्रसिध्द होते. कुंतीच्या नावावरुन ...

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

Loading…