नवीन लेखन...

कृतज्ञता

अगणित आकाशगंगा तुझ्या. त्या सगळ्याला व्यापून उरलेलं, तुझं अस्तित्व, मला परीपूर्ण करणारं ….. तुझ्या असंख्य सौरमालेतल्या, एका छोटूश्या ग्रहावर मी. तरी माझी दखलं घेणं तुझं. कृतज्ञ करतोस मला.. दाखवतोस तुझं असणं मला नेहमीच. ही अथांग निळाई, खेचुन काढते माझ्यातलं काहीतरी… गुंतुन जातं भान, निळाईच्या नवलात….. असशील का तु या निळाईत!! की त्याच्याही पार विहरणारा की माझ्यात […]

तारकांचे पुंज माळून

तारकांचे पुंज माळून, वाटते तुझ्या कवेत यावे, दुःखांच्या आभाळीही, मुक्त बघ जरा हिंडावे,–!!! घायाळ जीव तो आंत आंत, तो कोणा कसा कळावा,-? आत्म्यानेच आत्म्याला, दिलासा कसा कुशीत द्यावा,–!! ओढ नसावी शरीरातून, असावी प्रीत मनामनांची, धागे एकमेकांत गुंफत, वीण गुंतावी काळजांची,–!!! तुझे दुःख माझ्या उरात सले, माझे व्हावे ना रे तुझे, अश्रू माझे गाली सांडताना, राजा,अंतर मात्र […]

तो

त्याच्या चांगुलपणावर ती पूर्ण हरते, स्त्री कमी की पुरुष अधिक ह्याची व्याख्या तिला न कळते.. तिच्या समजण्याच्या बाहेर त्याचा चांगुलपणा तिला कळतो, स्त्री पेक्षा पुरुष जास्त कणखर नक्कीच असतो.. तिच्या पेक्षा तो जास्त सरस तिला जाणवतो, तिच्या अस्तित्वाच मूल्य तेव्हा तिला नकळत बोचतं.. त्याच्या अव्यकतेत तिच्या चुका तिला कळतात, अबोल पणात त्याच्या तिच्या भावना कोमेजतात.. ती […]

भेट

भेट तुझी-माझी….. बरसती श्रावणधारा बेधुंद वाहतो वारा पडती सुखनैव गारा प्रेमरंगी रंगतो इंद्रधनु न्यारा भेट तुझी-माझी…… खळखळता गोड झरा अंगावर रोमांचित शहारा फुलतो मोर पिसारा सुगंधी फुलांचा फुलोरा भेट तुझी-माझी…… हिरवा निसर्ग सारा उभा राही जोडूनी दोन्ही करा स्मरावा गत आठवांचा पसारा प्रेमगंधी गंधाळावा आसमंत खरा भेट तुझी-माझी….. पाहताच तुला सामोरा उधान येई मनमोरा लोचनी चमकती […]

थवा राव्यांचा

सकाळच्या या प्रसन्न प्रहरी सूर्यकिरण पसरले अंबरी ।। उदर भरण करण्यासाठी लगबग उडाली ही पक्ष्यांची ।। कावळे, घारी, साळुंखी ही पारवे, चिमण्या, बुलबुल संगती ।। प्रत्येकाचा सूर निराळा गाऊन सवंगड्या साद घालती ।। पटकन आला थवा राव्यांचा मंदिर शिखरी क्षणभर विसावला ।। घाणेरीच्या झुडुपांमध्ये क्षणात हा थवा मिसळून गेला ।। मोबाईल हा गप्प बसेना मग नजारा […]

श्रावण

तो श्रावण होता धीट शीळ घालीत मला खुणवीत मागुनी गेले त्या रंगी रंग रंगले …….१ ऊन त्याच्यासंगे चाले बांधुनी चाळ पावसाची माळ घालुनी ओले रूप आरसपानी ल्याले …..२ सांडले इंद्रधनुचे रंग रानात फुलापानात शिवारी सजले पालवले पालव सगळे …….३ उधाण नदी ओढ्यास शहारे वारे चिंब जग सारे झोके झुलले देवलोक भूवरी सजले …….४ वरखाली झुलता झोका […]

 देवाचिया दारीं

देवाचिया दारीं, मनाचा मुजरा, झुकवूनिया मान, हासे तो चेहरा ।। धृ ।।   जाई जेव्हां मंदिरी, घेतां प्रभू दर्शन, आनंदानें नाचते, हर्षित चंचल मन, नयन साठविती, त्या मंगल ईश्वरा, देवाचिया दारी मनाचा मुजरा  ।।१।।   नदीनाले धबधबा, उंच उंच वृक्ष वेली, कोकीळ गाती, मोर नाचे, इंद्रधनुष्याच्या खाली, रोम रोमातूनी शिरे, निसर्गाचा फवारा, देवाचिया दारी मनाचा मुजरा  […]

जीवन ध्येय

प्रभूची लीला न्यारी   विश्वाचा तो खेळ करी कुणी न जाणले तयापरी   हीच त्याची महिमा   ।।१।। जवळ असूनी दूर ठेवितो   आलिंगुनी पर भासवितो विचित्र त्याचा खेळ चालतो   कोणी न समजे त्यासी   ।।२।। मोठे मोठे विद्वान   त्यांत कांहीं संतजन अध्यात्म्याचे ज्ञान घेऊन   विश्लेषन करिती प्रभूचे   ।।३।। कांहीं असती नास्तिक   कांही  असती आस्तिक त्यांत कांही ज्ञानी मस्तक   चर्चा करिती […]

शांत निद्रा

शांत अशा त्या मध्यरात्री, उंच पलंगी मऊ गादीवरी लोळत होतो कुशी बदलीत,  निद्रेची मी प्रतीक्षा करी….१, निरोगी माझा देह असूनी,  चिंता नव्हती मम चित्ताला अकारण ती तगमग वाटे,  बघूनी दिशाहिन विचारमाला….२, प्रयत्न सारे निष्फळ जावूनी,  निद्रा न येई माझे जवळी धूम्रपान ते करण्यासाठी,  उठूनी सेवका हाक मारली….३, बऱ्याच हाका देवून झाल्या,  परि न सेवक तेथे आला […]

शांत निद्रा

शांत अशा त्या मध्यरात्री, उंच पलंगी मऊ गादीवरी लोळत होतो कुशी बदलीत,  निद्रेची मी प्रतीक्षा करी….१, निरोगी माझा देह असूनी,  चिंता नव्हती मम चित्ताला अकारण ती तगमग वाटे,  बघूनी दिशाहिन विचारमाला….२, प्रयत्न सारे निष्फळ जावूनी,  निद्रा न येई माझे जवळी धूम्रपान ते करण्यासाठी,  उठूनी सेवका हाक मारली….३, बऱ्याच हाका देवून झाल्या,  परि न सेवक तेथे आला […]

1 182 183 184 185 186 435
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..