नवीन लेखन...

हवापाणी

माणसाचे तेज डोके कसे पिकू लागले? निसर्गात मिळे फुकट तेच विकू लागले! हवा होती मुक्तवावर बंदिस्त होऊ लागली रस्त्यावर , दुकानात पैसा कमवू लागली! पाणी होते प्रवाही बाटलीबंद झाले जारबंद संस्कृतीला पैसे मोजू लागले! माती तर अमापच बघा जिथे तिथे मिळे विटा पाडून भट्टीवर बंगले बांधू लागले! हवा, पाणी, मातीची अशी चालू लूट आहे कुरतडे उंदीर […]

दुष्काळ

आला म्हणती तो काळ असा पडतो दुष्काळ ||धृ || नसते पिण्यास पाणी नसते खाण्यास धान्य नसते रानात पळपळ नसते वनात सळसळ ||१|| मरती भूकेली गुरंढोरं पडती आजारी पोरंसोरं होई जीवांची तळमळ रडते कडेवर ते बाळ ||२|| मोकळी झालेली गव्हाण दु:ख धरतीचं आंदण होई ओसाड तो माळ राती भेटेना सकाळ ||३|| कुठे घडतेय माळीण कुठे गुडूप किल्लारी […]

तयांना मृत्यूची वाटे भीति

अस्तित्वशक्तीला बाधा येणें,  अति भयंकर घटना ती तयांना मृत्यूची वाटे भीति….।।धृ।। गरिबीत जगती कित्येक, भ्रांत पाडे ती भाकरी एक जगण्यासाठीं झगडा देती,  तयांना मृत्यूची वाटे भीति….१, आरोग्याला धक्का बसतां शरिर जर्जर होवूनी जातां देह तारण्या धडपड होती,   तयांना मृत्यूची वाटे भीति….२, समाज रचना बघा कशी, लौकिक जाई तो राही उपाशी कुणी न दाखवी सहानुभूती,   तयांना मृत्यूची […]

ब्रेक्झिट (१) (लघुकाव्यें)

1 पाहिजे तेवढं Brain-Storm पण, How will you avoid a storm Brexit नावाचं ? 2 Brexitच्‍या प्रत्‍येक विकल्‍पाला MP म्‍हणतात, ‘Not OK’. अन् इकडे, फासावर चढलाय UK. 3 MP बसलेत डोकं खाजवत UK च्‍या नांवाला लागतोय् बट्टा. अरे, Brexit आहे की थट्टा ! 4 ब्रेक्झिटचा प्रश्न असा आहे गूढ की, मतदानावर मतदान चाललंय् पण निघतच नाहीं […]

आस…

ओळीने चालल्या बगळ्यांच्या रांगा हा निरोप अमुचा त्या ढगांना सांगा तहान लागली धरतीच्या लेका थेंब पावसाचे जमिनीत टाका पुरे झाली आता दुष्काळाची सजा पाषाणहृदयी तू होऊ नको राजा झाडांना दे पाणी जनावरांना चारा धान्याची बरकत जीवांना निवारा ओळीने चालल्या… — © विठ्ठल जाधव शिरूरकासार (बीड) सं. ९४२१४४२९९५

सैनिक आम्ही

सैनिक आम्ही देशाचे टिळा कपाळी मातीचा जिंकविण्या भारतास त्याग करी जगण्याचा एक नारा आम्हा प्यारा ‘जय हिंद’ घोष गगनात पुढे चला रे पुढे चला रक्षण्या देश हा भारत एकच ठावे विजयी व्हावे उरी दाटले निशान तिरंगा पहाडी छाती अभिमानाने सीमा लढवू पार अभंगा — विठ्ठल जाधव शिरूरकासार (बीड) सं.९४२१४४२९९५

लाटांवर लाटा उसळती

लाटांवर लाटा उसळती, तुषारांचे बनती मोती, अथांग सागराच्या ह्या, सुंदरतेची काय गणती,–!!! निळेशार पसरलेले पाणी, दूरवर क्षितिजी पोहोचलेले, जितके विस्तीर्ण तितुके, सखोल आत गेलेले,–!!! एक लाट उठता उठतां, दुसरी उभी टाके, टक्कर दोघींची होता, पाणलोट होती जागे,–!!! रत्नाकराची दुनिया, सारी अजब किती, पारणे फिटे डोळ्यांचे, तृप्त होतसे दीठी,–!!! थेंबांचे मोती उधळतो, तो रात्रंदिवसा, किंमत नसे त्याची, […]

शोध

देव देव राहतो कुठे ? सांग आई, सांग आई ! चंद्रावरती, सूर्यावरती आभाळी की धरेवरती? सागरात , पर्वतशिखरी जंगलात की पाण्यामध्ये दगडगोट्यात,धातूमध्ये देवळात की मठामध्ये? शाळामध्ये, घरामध्ये रानीवनी की मुर्तीमध्ये मंत्रतंत्र की ग्रंथामध्ये महाली की कोपीमध्ये ? तुझी वात माझ्यामध्ये माझा दीप तुझ्यामध्ये दिसला गं देव माझा आई, मला तुझ्यामध्ये देव देव राहतो कुठे? — विठ्ठल […]

काळ व कार्याची सांगड

मानव जीवन तुम्हां लाभले,   महत् भाग्य ते समजावे कर्म दिधले पाठी तुमच्या,  सद्उपयोगी यांसी करावे….१, जीवन रेखा मर्यादेतच,   ठेवली असती तुमचे हातीं जाणीव त्याची मनीं असावी,  कर्म कार्ये जेव्हां करिती…२, हाती घेतल्या कार्यामध्ये,  एकचित्त तो प्रयत्न व्हावा काळ केवढा तुमचे जवळी,  याचा विचार सतत यावा…३, कार्ये राहता अपूर्ण अशी,  वेळ न उरे तुमचे हाती अभाव असता […]

हे परमेश्वरा.. हे परमेश्वरा

(मुक्तछंदात्मक) थोडा वाकून पहा खाली, काय चाललंय या पृथ्वीतली, सत्ता, लत्ता, अधिकार, पैसा, यामधून एवढा माततो का कुणी,-? जनावरे बरी म्हणायची पाळी, संकेत, भाषा, सभ्यता, निष्ठा, कशी पाळतात ती सारी,–!!! समूहनियम, कर्तव्येही माहित, अधिकाराचे बडगे दाखवत नाहीत, नुसतीच माणुसकीचा आंव आणून,—- पैसा इतका प्रिय असावा की, म्हाताऱ्या आई-बापांनी जावे वृद्धाश्रमी, खस्ता जराही आठवत नाहीत, त्यांनी भोगलेल्या; […]

1 … 183 184 185 186 187 … 440
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..