देवाचिया दारीं

देवाचिया दारीं, मनाचा मुजरा,

झुकवूनिया मान, हासे तो चेहरा ।। धृ ।।

 

जाई जेव्हां मंदिरी,

घेतां प्रभू दर्शन,

आनंदानें नाचते,

हर्षित चंचल मन,

नयन साठविती, त्या मंगल ईश्वरा,

देवाचिया दारी मनाचा मुजरा  ।।१।।

 

नदीनाले धबधबा,

उंच उंच वृक्ष वेली,

कोकीळ गाती, मोर नाचे,

इंद्रधनुष्याच्या खाली,

रोम रोमातूनी शिरे, निसर्गाचा फवारा,

देवाचिया दारी मनाचा मुजरा  ।।२।।

 

दु:खी – कष्टी दुबळा,

दीनवाणा  दिसे,

प्रभूच्याच आज्ञेने,

भोग भोगीत असे,

जातां   हृदय भरूनी, करि आसवांचा मारा,

देवाचिया दारी मनाचा मुजरा  ।।३।।

 

— डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1555 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…