नवीन लेखन...

बाप विठूराया

आषाढी कार्तिकी जसा पाहतसे वाट तसा माझा बाप गावी उभा राऊळी डोळ्यात जशी विठूच्या प्रतीक्षा लेकरांची म्हाताऱ्या बापाचीही अवस्था तीच त्याला तरी आहे विटेची सोबत थकलेला माझा बाप उरे एकाकी आणावे वाटते शहरात त्याला पण नाही हवा म्हणे मानवत उमगते मला तगमग त्याची पण भ्रांत पोटाची करी हतबल गावच्या मातीशी त्याची नाळ जुळलेली अन् शहराच्या बेड्या […]

या सांजराई

या सांजराई मी माझ्या डोकावलो जरा भूतकाळी. आठवले अर्ध्यात सोडून गेलेले बाबा आणि आई, आठवण त्यांची मज येई आजही आयुष्याच्या या सांजराई.. बाल सवंगडी वरच्या आळीचे बंडू व माझी ताई, आठवण त्यांची मज येई आजही आयुष्याच्या या सांजराई.. मी सगळ्यात लहानगा दोन भावंडांत मोठा माझा भाई, आठवण त्यांची मज येई आजही आयुष्याच्या या सांजराई.. गावची कौलारू […]

उचलून जेव्हा पापण्या

उचलून जेव्हा पापण्या माझ्याकडे तू पाहिले चांदणे चंद्राविना मी सांडताना पाहिले पौर्णिमा उतरुन आली की धरेचा स्वर्ग झाला ऐश्वर्य साऱ्या नंदनाचे बहरताना पाहिले पाहिले तू चुकवूनी सारे पहारे भोवतीचे लाजले मी भासुनी तू लोचनांनी स्पर्शिले पाहतां तू अंतरीचे शल्य माझ्या फूल झाले लोचनांसाठीच या मी ताप सारे साहिले मानिनी होते कधी मी या क्षणी झाले सती […]

काळं अधिवेशन

क्षुल्लक विषयावरचं सेशन -बराच वेळ रंगवलं होतं दोघांनी.मी ही मग घरात आलो -घोषणा मात्र ऐकू येत होत्या -एकाच साच्यातल्या,बहुधा काकंत्रालयाच्या बाहेर -पायऱ्यांवर बसून दिल्या जात असाव्या.आवेश तोरा अन् दिखाऊपण मात्र -अगदी तस्संच होतं. […]

बापाचं मन

एक बाबा थकलेला कमरेमध्ये वाकलेला हातात काठी तुटका चष्मा उदासवाणा बसलेला अंगावर सुरकुत्या चुरगळलेल्या स्वप्नांच्या फाटकं धोतर फाटका सदरा अनवाणी चाललेला..! कधीकाळचा सूर्य आज निस्तेज झाला आहे करपलेल्या मनाचा एक कोपरा ओला आहे डोळ्यांवर हात ठेवून वाट अजून पाहतो आहे येईल कधीतरी लेक माझा शहरात राहतो आहे..! वाट पाहून वाटा सरल्या नवी वाट दिसत नाही काळोखात […]

ओझं

जड झाला जीव आता ओझं सोसवत नाही… भोग भोगायचे किती आता देवादारी बसवत नाही…! जन्म वाया गेला राबण्यात नाही गाव दुसरं पाहिलं.. भरल्या गोकूळ घराचं सपान मनात राहिलं..! वाट एकटा चालला तिला जोडीला घेतलं.. एक नातं विश्वासाचं त्याच्या जिवावर बेतलं…!! …. राजेश जगताप, मुंबई ९८२१४३५१२९.

चण्याची पुडी

माझे मन आहे चण्याची पुडी जड विचारांची तळाशी बुडी भरले आहेत चणे फुटाणे तेच चव साधती साधेपणे मावत नाही काजू अक्रोड कशास हवी ती डोकेफोड ? लांब ठेविले बदाम मनुके यास्तव मन हे हलके फुलके चणा वाटतो आपलाच सहज बाकी भासती किंमती ऐवज नको बेदाणे खारीक पिस्ते तेच घडविती विवाद नस्ते चघळत बसतो एक चणा मुरवत […]

तुझ्या-माझ्या कविता

माझ्या झेपावत्या पंखांना तूरेशिमपाश बांधलास नि त्यांनी वसा घेतला मायेचा — प्रेमाचा आता या पंखांखालून तू होऊ नकोस – रानभरी ! शस्त्रांचीच सवय होती या माझ्या हातांना ! तू पेटत्या हातात फुलं दिलीस, शस्त्रं आपोआप बोथटली नि फुलांची वरमाला कधी झाली कळलंच नाही ! मी निघाले होते स्वातंत्र्याचा पत्ता शोधीत निखाऱ्यांचा वसा घेऊन सोन्याच्या बेड्या तोडून […]

तुझ्यासाठी

कवितेच्या तलम पडद्याआडून माझ्या भावना तुला सागतात माझ्या विरहव्यथा शकुंतलेची व्यथा सांगावी दुष्यंताला तिच्या सखींनी तशी क्वचित दुर्लक्षिल्यासारखं क्वचित दाद देत तू म्हणतोस वा ।’ आणि निघून जातोन कसं सांगू तुला कवितेतून? माझ्या कविता तुझ्यासाठी असतात! –सौ. राजलक्ष्मी देशपांडे

माती

आज डोळे उघडताना रंगलेले दिसले सनईचे सूर पहाटेच्या क्षितीजावर… सातच पावलं चालून मी पोचले आभाळाकडे पण देहाचं नातं मातीशी अजून तुटलं नाही… तसं काहीच विसरले नाही, विसरता येणार नाही या मातीनंच माझे घुंगुरवाळे मळवलेत हळूवार खेळवलेत… माझ्या कणाकणात मिसळलेली ही माती.. आठवतंय – श्रावणातल्या धारांनी ही माती थरारताना माझा कणन्कण झेलायचा तिचा शहारा वसंतात ती यायची […]

1 15 16 17 18 19 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..