नवीन लेखन...

आकांक्षांचा चंद्र

तुझ्यामाझ्या माथ्यावरती आकांक्षांचा चंद्र आहे नको असा उदास होऊस मला वचन याद आहे! दूर असेल जात वाट माझी पावलं सिध्द आहेत तुझ्या वाटेवरचे काटे माझ्या पायी वेदना आहेत तुझ्या-माझ्यासाठी चांदणं अमृत बनून वहात आहे ! आपली सारी प्रेमगीतं गंगेकाठचे मंत्र आहेत मंदिरातले मंजूळ निनाद हृदयातली स्पंदनं आहेत आजच्या व्यथागीतातही उद्यावरती श्रध्दा आहे ! तुझ्या प्रत्येक पावलापाठी […]

अभिलाषा

************ मन मुक्त विरक्त आता अभिलाषा उरली नाही संवेदनाशून्य काळीज चिंता कशाचीच नाही…. कोलाहल उगा अंतरी तो कधीच संपत नाही स्पंदनांची चाहूल संथ सामर्थ्य चैतन्यी नाही…. उदय अस्त कालचक्री त्याला कधी अंत नाही सहज सुखा पांघरताना केवळ स्वार्थी होवू नाही…. हरिहर जाणतो सर्वकाही तिथे कुणास सुटका नाही हे सत्यब्रह्मांडी सुर्यप्रकाशी याचा विसर मना पडू नाही…. ********************** […]

श्रावण

म्हाताऱ्या रिपरिपत्या पावसाचा कंटाळवाणा सूर आळसावलेली जमीन लांबचलांब पसरलेली सुस्त म्हशीसारखी ओल्याकिच्च आंब्यावर जांभया देत कोकिळ मूक पेंगुळलेला क्षण क्षण मोजले तरी स्वस्थ दिवस सरकेना सुस्त अजगरासारखा किती श्रावण असेच निघून जाणार तुझ्याविना?  

गर्दीत माणसांच्या

गर्दीत माणसांच्या लोटून हाय! मजला स्वप्नात पाहिलेला माझा गुलाब गेला त्या मखमली सुखाला मी स्पर्शिले न होते अजुनी; तरीही त्याच्या का पाकळ्या गळाल्या? शहरात आज साऱ्या ही ‘ईद’ चाललेली त्याच्या स्मृतीत माझा सारा सुना मुहल्ला त्या जायचेच होते निघुनी नवीन देशा का शुभ्र हा दुपट्टा इष्कात रंगविला? –सौ. राजलक्ष्मी देशपांडे

एखादा श्वासही

तुझी पावलं माझ्या दारावरून जाताना मी पुसली नाही कधी तुझी पाऊलवाट नि ठरवलं नव्हतं येणं कधीच त्यांच्यामागून | मस्त रंगले होते मी माझ्यातच माझं काही मला खरंच द्यायचं नव्हतं पण तुझी पावलं थबकली माझ्या दारात तेव्हा देऊन बसले सारंच मंत्रमुग्धेप्रमाणं माझे प्राण…माझे श्वास…..माझं जगणं… आता दूर गेलास तर माझे प्राण नसतील माझ्याजवळ संपवण्यासाठीसुध्दा एखादा श्वासही तुझ्याकडून […]

विश्वास

कधी मनाच्या फुलती पाकळ्या काट्यांचाही डंख जिव्हारी अदृष्टाच्या पानावरती कशी लिहावी मौनडायरी धूळमाखल्या आयुष्याला प्रश्न विचारू नये फुकाचे काजळकाळ्या रात्री तरीही उघड्या डोळी स्वप्न सुखाचे रुणझुणत्या इच्छांची माया खुणावितो शुक्राचा तारा जागवितो विश्वास आतला पहाटचा प्राजक्ती वारा पैलपार त्या अंधाराच्या जाईन उडुनी पंख पालवित आभाळाच्या माथी लाविन या मातीचा टिळा सुगंधित पाचोळ्यातून फुलवित राहिन हिरवा अंकुर […]

नव्याने

मी तुला स्वप्नात पाहू लागले दूर रानी मोर नाचू लागले दिवस हे नाहीत जरिही पावसाचे का अवेळी मेघ बरसू लागले? चाललो एकत्र इतुकी पावले मी नव्याने तुज बघाया लागले फिरुन का मी षोडषी झाले आता? हृदय माझे धडधडाया लागले काय हे माझे तुझे नाते असे? हृदयास मी माझ्या पुसाया लागले तू नको देऊ उजाळा आठवांना काठ […]

आरोग्य धनसंपदा

ध्यान धारणा ही ,शांतता मनाची आरोग्य धनाची, गुरुकिल्ली || सात्विक आहार, कंद मुळा भाजी खावी रोज ताजी, सर्वकाळ || ॠषीतुल्य झाड, पिंपळ उंबर वड हो अंबर, महाराजा || वृक्ष करीतसे, धरती श्रृंगार ही हिरवीगार, दिसतसे || पहाटे उठणे, करा रोज योग सरतील भोग, शरीराचे || शुद्ध हवा पोटी, रोग हे सरेल आनंद भरेल, गगणात || राखा […]

रामदासी मी

श्रीराम प्रभू माझ्या मनी असे कंदकृर्ती ग्रामी मज दिसे एकच मुखी नाम असे श्री राम जय राम जय जय राम चैत्र शुद्ध नवमीला यात्रा भरे रामभक्तांना सुखावह करे भोगी सुख रामगण सारे श्री राम जय राम जय जय राम राम स्वयंभू जागृत स्थान असे पवित्र गोदाकाठी रममाण दिसे राम भक्ती शिवाय माझे जीवन कसे श्री राम […]

आजी आजोबांचा व्हॅलेंटाईन वीक”

एक होती साधीभोळी आजी , पण आजोबा होते कहर ! काहीतरी वेगळं करण्याची, आजोबांना मध्येच आली लहर !! “यावेळेस आपण करूया का गं, प्रेमाचा आठवडा साजरा ?” लाजत मुरडत हो म्हणत , आजीने लगेच माळला गजरा !! “रोझ डे” चा गुलाबी दिवस , केला गोडाधोडाचा भडीमार ! एकमेकांना भरवला गुलकंद , मग रोझ सरबत थंडगार !! […]

1 14 15 16 17 18 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..