म्हाताऱ्या रिपरिपत्या पावसाचा
कंटाळवाणा सूर
आळसावलेली जमीन लांबचलांब
पसरलेली सुस्त म्हशीसारखी
ओल्याकिच्च आंब्यावर जांभया देत
कोकिळ मूक पेंगुळलेला
क्षण क्षण मोजले तरी स्वस्थ दिवस सरकेना
सुस्त अजगरासारखा
किती श्रावण असेच निघून जाणार तुझ्याविना?
Leave a Reply