नवीन लेखन...

स्त्रियांमधील टक्कल

केस विंचरताना जेव्हा कंगव्यात भरभरून केसांचा गुंता येतो किंवा जमिनीवर असंख्य वाटणारे केस पडलेले दिसतात, हे दृष्य नकोसं वाटतं. सुंदर, दाट, केशसंभाराने सौंदर्य आणि | व्यक्तिमत्त्व खुलून. मात्र गळणारे केस केवळ सौंदर्यावरच नव्हे तर मानसिक स्वास्थ्यावरही घाला घालणारे ठरू शकतात आणि त्याचे सामाजिक परिणामही दिसून येऊ शकतात. डोक्यावरील ९० टक्के केस वाढत असतात आणि १० टक्के गळतात हे केस सर्वसामान्य ज्ञान आहे. ३ महिन्यांनी ४ ‘गळण्याच्या स्थितीत’ असलेले केस गळून पडतात व त्याजागी नवीन केस येतात. अर्थात, रोज काही केस गळणं हे या चक्रामधील एक टप्पा आहे; परंतु काहीजणींमध्ये केस अधिक प्रमाणात गळतात व त्याजागी नवीन केस उगवत नाहीत. याचंच रुपांतर पुढे टक्कल पडण्यात होतं. टक्कल पडण्याची अनेक कारणं आहेत. उदाहरणार्थ मानसिक ताण, पूरक अन्न न घेणं धूम्रपान, रक्तक्षय, केमोथेरपी, किरणोत्सर्ग उपचार पद्धती, फंगल इन्फेक्शन इत्यादी. याव्यतिरिक्त शरीरात लोहाची कमतरता, संप्रेरकांचा समतोल ढळणं, ऋतूनिवृत्ती अथवा बाळंतपणातील ताण या व इतर कारणांमुळेही केस पातळ होऊ शकतात.

गर्भधारणेसाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्या, उदासीनतेवरील औषधोपचार किंवा एक अगदी केस गळण्याचे सामान्य कारण म्हणजे केस किंवा वेणी गच्च, करकचून बांधणे. महिलांमध्ये दिसून येणारं टक्कल याला Androgenic Alopecia (ॲण्ड्रोजेनिक ॲलोपेशिया) किंवा female pattern thining म्हटलं जातं याचं कारण डीहायड्रोटेस्टॉस्टेरॉन किंवा DTH हे संप्रेरक होय! हे संप्रेरक केसाच्या मुळाशी जाऊन बसतं आणि कालांतराने केसाचं मूळ आणि केस दोन्हींचा नाश करतं. गेल्या काही वर्षांत, टक्कल कमी किंवा नाहीसं करण्याचे काही उपाय विकसित झाले आहेत. यामध्ये शोध आणि तंत्रज्ञानाची सांगड सौंदर्याशी घातली गेली आहे. विविध दराने उपलब्ध होणारे हे उपाय सहज उपयोगात येणारे, केस नैसर्गिक रुपात दर्शविणारे आणि परवडण्याजोगे आहेत.

डॉ. सोनल शहा
मराठी विज्ञान परिषद,

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..