कोकणातील समुद्रकिनारा
कोकणातली खूप मंदिरे… सागरकाठावरी! भक्ती गाठते मुक्तीकिनारा, बसून लाटांवरी! कृतज्ञतेचे मीठ सांडते, रात्रंदिन येथे, जाळ्यामध्ये येती धावत, माशांचेच जथे! आकाशाचा रंग पांघरून स्वच्छ निळे पाणी ओठावरती लाटांच्या तर, फेसांची गाणी! होड्या झुलती दबा धरुनिया, पकडाया मासे, शकुनी मामा होऊनी कोळी, जाळ्यांचे फासे! समुद्र भेटे जिथे नभाला क्षितीजरेषा निळी! सांजसूर्य भेटाया येता, क्षितीज त्याला गिळी! दगडांचा आडोसा […]
