नवीन लेखन...
Avatar
About आनंद उ पाटणकर
आनंद पाटणकर हे चार्टर्ड अकाउंटंट असून गेली १५ वर्षे अकाउंटिंग आणि टॅक्सेशन क्षेत्रात कार्यरत आहेत . कविता लेखन या छंदा सोबतच काही कथा आणि ललित लेखही लिहिले आहेत.

मी पाऊल पाऊल हळुच निघालो

मी पाऊल पाऊल हळुच निघालो संध्येच्या अनवट वेळी तरू-तरुंवर पसरत होती क्षितिजावरची सांज सावळी मी बघता वळून मागे दूर दिव्यांचा चमके लोलक मी सांधून घेतो सुटले धागे चांदण्यात भिजले मोहक पाऊलवाटा निजल्या होत्या आठवणींची होती सोबत वेचून मोती गतकाळाचे मग पूर्वेला पाऊल पडते अलगद… — आनंद

चांदणं

उन्हाळ्यातल्या निवांत रात्री मंद मंदसा वाहे वारा चांदण्यांच्या स्वप्निल नेत्री निरवतेचा शुभ्र किनारा शब्दांचे विणता धागे आठवणींचे घेऊन मोती हृदयाचे आर्जव विरते उन्हाळ्यातल्या चांदण राती… — आनंद

सोबत

कोणते हे रस्ते कुठले हे वळण कसल्या या जाणीवा कसले हे स्पंदन पहाटेचे दवबिंदू हळूच जातील घसरून ओंजळीतल्या रेतीचे कण जातील निसटून माहित आहे जरी स्वप्न हे नाही खरे तुझ्या सोबतीचे स्वप्नही असते पुरे… — आनंद पाटणकर.

हितगुज

स्थितप्रज्ञ असा समुद्र आणि तितकंच अथांग असं आकाश एकमेकांना भेटतात क्षितिजाच्या तितक्याच प्राचीन रेषेवर आणि ती चिरंतन रेषा जपून ठेवते त्यांच्यातल्या जुन्या संदर्भांचे दाखले.. त्या हितगुजाचे अर्थ जाणवतात फक्त त्या समुद्राला,आकाशाला आणि त्या क्षितिजाला काही हितगुजं शब्दातीत असतात हेच खरं… —आनंद

निशिगंध

तू जो दिला होतास ना निशिगंध तो आता हरवला आहे पण त्याचा सुगंध येतो नेहमी कुठल्यातरी कोपऱ्यातून… तू दिलेलं प्रत्येक फुल नाही ठेवता आलं जपून पण त्यांचा सुगंध मात्र दरवळतो कुठल्या ना कुठल्या तरी कोपऱ्यातून… — आनंद

आठवणींचे शिंपले

आठवणींच्या लाटांमधले मी शिंपले जेव्हा वेचत जातो सुखस्वप्नांचे संचित काही जणू अलगद वेचत जातो ओंजळीत भरून मग ते किनाऱ्यावर जरा टेकतो गाज सागरी ऐकत ऐकत सांजदीवा लुकलुकतो कुठूनसा मग वाहत येतो धुंद ओला पश्चिमवारा हळू हळू मग उमगत जातो सुखस्वप्नांचा अर्थ खरा…. — आनंद

मैत्र

तू , मी आणि वाफाळत्या चहाचा कप तुझ्या ओठांवर हसू आणि नजर बेफिकर बाहेर धुंवाधार पाऊस आणि धावपळ करणारं शहर माझं काही बोलणं तुझं लक्ष मात्र कुठं दूरवर सर आता जरा कमी होते पाऊस शांत बरसत राहतो शब्दांना शोधता शोधता चहा निवत जातो काही क्षण असेच रेंगाळतात आठवणींना जपण्यासाठी तुझ्यासाठी , माझ्यासाठी आणि त्या वाफाळत्या चहासाठी… […]

किनारा

चमचमणाऱ्या लाटा भिजवी वाळूचा शुभ्र किनारा वाहतो त्या वरून अलगद धुंद ओला समुद्रवारा ऊन सोनेरी अलगद टिपती माड तरु झुलता झुलता अनाम आनंदी गाणे गाती समुद्रपक्षी उडता उडता निरवतेच्या अशा किनारी बांबूची उबदार बने त्यातून वाहे वारा घेऊन सागराची अथांग स्वप्ने… —आनंद

चहा

लवंग, आले दालचिनीचा सुगंध सारा भरून घ्यावा डोळे मिटूनि निवांत रेलून घोट चहाचा हळूच घ्यावा वेळ असो दुपार तीनाची की पहाटेचा असो गारवा चहास का लागे निमित्त कोणते? कधीही द्यावा कधीही घ्यावा चाहते असे चहाचे मिळता योग दुर्मिळ जुळून यावा स्थळकाळाचे बंधन सोडून मस्त गप्पांचा फड रंगावा मात्र एकट्या सांजवेळी घोट चहाचा हळूच घ्यावा पापणीतल्या सुखस्वप्नांना […]

स्वप्न क्षणांचा पक्षी

हे चांदणे नभीचे अन् पौर्णिमा शरदातली वाहणारी ही हवा अन् दिवाळी स्वप्नातली.. गुणगुणतो पहाटवारा दवबिंदू शीतल शीतल स्तब्ध धूसर डोंगरमाथे ऐकती शांतता निश्चल.. फांदी फांदी वरून उडतो क्षणा क्षणांचा स्वप्नपक्षी अन् हृदय प्रदेशी रेखीत जातो जाणिवांची अपूर्व नक्षी… —आनंद

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..