नवीन लेखन...
Avatar
About आनंद उ पाटणकर
आनंद पाटणकर हे चार्टर्ड अकाउंटंट असून गेली १५ वर्षे अकाउंटिंग आणि टॅक्सेशन क्षेत्रात कार्यरत आहेत . कविता लेखन या छंदा सोबतच काही कथा आणि ललित लेखही लिहिले आहेत.

प्रवास

उतरते ऊन पुन्हा परसातल्या दारातुनी उजळले दीप पुन्हा शिशिराच्या सांजेतुनी हवेहवेसे होते कधी समुद्रवाऱ्याचे शहारे मागून का मिळते कधी पहाटेचे स्वप्न गहिरे? शोधताना चांदणे वेचले उन्हाचे कवडसे राहिले मग दूर मागे दिव्यांचे बिलोरी आरसे… —आनंद

पाऊस

चिंब भिजल्या आभाळातून पाऊस अविरत रिमझीमतो टपटपणाऱ्या थेंबांमधुनी सुगंध मातीचा दरवरळतो भिरभिरणाऱ्या वाऱ्यामधुनी मेघांचे तोरण हलते नितळ ओल्या क्षितिजावरती वीज रुपेरी चमचमते घनघोर भरुनी आभाळ असा पाऊस कितीदा तरी कोसळतो परी मनास भिजवून जाईल ऐसा वळीव एकदाच येतो… —आनंद

निवांत

आताशा वाटतं बसावं इथंच निवांत क्षणांचे शिंपले वेचत आणि पहावं दूर मागे त्या वाटांकडे जिथून आले होते ते सुखदुःखांचे वारे.. आयुष्याचं गणित मांडून सोडून द्यावेत जुने हिशोब आणि बसावं इथंच निवांत स्वप्नांचा कशिदा विणत… — आनंद पाटणकर

स्वप्न तारा

सांगावीत कशी मी स्वप्ने मज शब्द सुचेना काही मौनातल्या अंधुक रेषा हलकेच पुसते जाई सांजवेळ की पहाट ही रात्रीस उन्हाचे कोडे दवबिंदूंची चांदण स्वप्ने अलगद टिपती झाडे नवीन जरी झाल्या वाटा जुनाच तरी वाहील वारा वळणावरती भेटेल तुला आठवणींचा अंधुक तारा… — आनंद पाटणकर

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..