नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

बांधणी भाषेची आणि दडलेले अंतरंग

मराठी भाषा,भाषेचे उच्चार, लहेजा, त्यामधून डोकावणारं आणि ऐकणाऱ्याला जाणवणारं वेगळेपण, भाषेचे वळसे, वेलांट्या, वळणं आणि त्यामधून बाहेर येणारं पोटातलं या सगळ्याची एक गंमत असते नाही ?
घाबरून जाऊ नका ! मी काही मराठी भाषा आणि तिच्यावर साधक बाधक चर्चा यामध्ये अजिबात शिरणार नाहीय. […]

भिंत

( आगरी भाषेत (भिवंडी भागातील) ग ऐवजी ज, ग किंवा घ ऐवजी झ, ण ऐवजी न, ड ऐवजी र, ळ ऐवजी ल तसेच काय ला क, आहे ला ह आणि मी व मला ऐवजी मना असे शब्द वापरले जातात, आगरी बोलीभाषेतील शब्द वापरून कथा लिहिण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.) हॅलो, वंसा, मी मंगल बोलताव, तुमी कई […]

अमेरिकेतील आकाशदर्शन..

अमेरिकेत पाऊल टाकले की तिथला विलक्षण निसर्ग मनाला भावतो. आपला भरतखंडही यादृष्टीने संपन्न आहेच. त्याला स्वतंत्र परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक संदर्भ आहेत. […]

कोकण विकासाची संधी

आज मुंबई शहर उपनगर तसेच ठाणे, रत्नागिरी, रायगड किंवा सिंधुदुर्गचा कोकणात समावेश होत असला तरी चिनी प्रवासी युआन च्यांग याच्या वर्णनावरून वनवासी, बेळगाव, धारवाड इत्यादी घाटापलीकडील प्रदेशाचा कोकणात समावेश होता असे दिसते. मध्ययुगात कोकणचे तीन भाग मानले गेले होते. तापीपासून वसईपर्यंत ‘बर्बर’ बाणकोटपर्यंत ‘विराट’, देवगडपर्यंत ‘किरात’. पूर्वी हा सारा प्रदेश अपरान्त नावाने ओळखला जाई त्याचे नाव कोकण कसे झाले याबाबत मतभिन्नता आहे. […]

कोकण : मराठा आरमाराची भूमी

छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीचा वनराईने व्यापलेला इतरांना जिंकायला अवघड असलेला हा प्रदेश स्वराज्यासाठी निवडला. वणव्याप्रमाणे पसरत चाललेल्या मोगलांच्या सत्ताप्रसारापुढे संपूर्ण देश हतबल असताना, ‘संकटं पराक्रम गाजविण्याची संधी देतात’ या तत्त्वाने स्वराज्य निर्मितीसाठी, सह्याद्रीच्या शिखरावरील किल्ले आणि पाताळाला, समुद्राला जाऊन भिडणाऱ्या कोकणदऱ्या, खाड्यांचा आधार घेतला. […]

कोकण म्हणजे स्वर्ग

पर्यटन हा तर कोकणाचा श्वास! ढगांनी गच्च भरून ओथंबून येणारं आकाश आणि सहस्रावधी जलकुंभांनी अभिषेक करावा असा अनिर्बंध कोसळणारा पाऊस कोकणातला पर्यटन हंगाम खऱ्या अर्थानं जिवंत करतो. ओसंडून वाहणारे धबधबे, धडकी भरवणारे पण डोळ्याचं पारणं फेडणारे घाटरस्ते, थंड हवेची ठिकाणं आणि स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांना खुणावतात. […]

माझा बाळ कुठे गेला

त्या वर्षी अण्णांनी याच मैना च्यापटीत संपूर्ण धना. केला होता. त्याकाळी पाऊस भरपूर पडत होता निसर्ग हिरवागार दिसत होता. शेतीने हिरवा गार शालू परिधान केला होता इतका निसर्ग शोभून दिसत होता. कोकिळा आनंदाने झाडावर गात होती गावातील प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. […]

हतबल – भाग दोन

इस्पितळातून तेथील ड्यूटी कॉन्स्टेबलचा पोलिस ठाण्यात फोन येतो. हवालदार मेसेज रीतसर लिहून घेऊन ड्यूटी ऑफिसरला थोडक्यात सांगतात . ” सर, xxxxxx हॉस्पिटल मधून डेथ बिफोर अँडमिशनचा मेसेज आहे .”ड्यूटी ऑफिसर मेसेज वाचतो . पोलिस स्टेशन डायरी मधे , त्याच्यासोबत जात असलेल्या हवालदारांचा बकल क्रमांक नमूद करून ” xxxx इस्पितळात रवाना ” झाल्याची नोंद करतो आणि तातडीने […]

नमामि गंगे

उत्तर प्रदेश भारतातलं सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं कृषीप्रधान राज्य.मोहोरी,ऊस आणि बटाटे इथली प्रमुख पिकं.महामार्गांच्या अगदी लगत जर्द पिवळ्या फुलांनी आच्छादलेली लांबच लांब पसरलेली मोहोरीची हिरवीगार शिवारं डोळ्यांना गारवा देत होती.त्यात हवेत अगदी दुपारच्या दोनच्या टळटळीत उन्हातसुद्धा हवेत किंचित असलेला गारवा छान आल्हाददायक वाटत होता. […]

सतर्क ग्राहक

मी मुंबईत वांद्रे येथे एक सरकारी बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून काम करत होतो तेव्हाची गोष्ट आहे. या शाखेचे बहुतांश ग्राहक अनिवासी भारतीय असल्याने ते लाखात कमी आणि कोटींमध्ये जास्त व्यवहार करायचे. त्यामुळे या शाखेत फसवणुकीचे (फ्रॉड) प्रकार नेहमी होत असत. […]

1 87 88 89 90 91 525
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..