नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

तुकाराम दर्शन माझ्या दृष्टीनं झालेलं

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये अनंत कदम यांनी लिहिलेला हा लेख संत तुकाराम महाराज म्हणजे मराठी साहित्यातील एक महान तेजस्वी हिरा, दुःखितांना त्यांच्या अंधकारमय जीवनात वाट दाखवणारा तेजोमय ताराच! तुकारामांचं हृदय आकाशाएवढं. त्यांचं मन पर्वताएवढं उत्तुंग! गरिबांविषयी अफाट कळवळा! अपार उमाळा. गांजलेल्या- रंजलेल्यां विषयी अफाट कळवळा. असा हा थोर कवी मराठी साहित्याला लाभला. हे मराठी […]

उभा तुझ्या अंगणी स्वरांचा “अबोल” हा पारिजात आहे!

भुदरगड येथील साहित्य संमेलनात प्रसिद्ध लेखक -शिवाजी सावंत म्हणाले होते- “अश्रुंचे वय किती ?” डोळ्यात उगवल्यापासून ते ओघळून जाईपर्यंत (किंवा डोळे कोरडे होईपर्यंत)कां खूप आधीपासून (आत खोलवर साठल्यापासून ते कधीच बाहेर न येईपर्यंत?) लताच्या स्वरांचे वय काय? कानावर पडल्यापासून ते विरून जाईपर्यंत की मी जन्मल्यापासून आजतागायत जे मी आत साठवून ठेवलंय (आणि जे माझ्याबरोबरच संपेल) तेथपर्यंत? […]

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ११ – अस्पृश्यता निवारक सावरकर

सत्यशोधक समाजाचे बागल म्हणाले “जे कार्य आम्ही कोल्हापुरात करू शकलो नाही ते सावरकर यांनी रत्नागिरीत करून दाखवले. असा नेता आम्हाला मिळाला असता तर आम्ही त्याला डोक्यावर घेऊन नाचलो असतो.” सावरकर यांनी आदेश दिला की माझा  वाढदिवस अस्पृश्यता निवारण म्हणून पाळा.” व कार्यकर्ते यांना सूचना केली की घरोघर जाऊन पत्रके भरून घ्या की “मी  सार्वजनिक व खाजगी जीवनात अस्पृश्यता पाळणार नाही.” […]

माझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२)

माझ्या आईच्या पिढीतले पणजोबांच्या घराला “तेंडोलकर युनिव्हर्सिटी” म्हणत. कोल्हापुरला राजाराम कॉलेज होते. पुण्यानंतर कुठे कॉलेज नव्हते, त्यामुळे कोंकण, सातारा, इथले सर्व विद्यार्थी तिथेच येत. महाविद्यालयीन अभ्यासाबरोबरच कसं रहावं, कसं वागावं, ह्याचे धडे त्यांना तेंडोलकरांच्या घरी मिळत. त्यामुळे ते आपलं शिक्षण तेंडोलकर युनिव्हर्सिटीत झालं आहे असं अभिमानाने सांगत. पहिली गोष्ट तिथे शिकवली जाई ती म्हणजे काम करणे महत्त्वाचे. तिथे राहिलेल्याला पुढे आयुष्यात कधीही कोणतेही काम करायला लाज वाटायची नाही. आजोबा स्वतः श्रमप्रतिष्ठा आचरणारे होते. दुसरी गोष्ट म्हणजे वायफळ खर्च न करणे. छानछोकीवर पैसे वाया न घालवणे. तिसरी गोष्ट निर्व्यसनीपणा. कोणतेही व्यसन लावून घ्यायचे नाही. […]

इमारतींचं सौंदर्य

अमेरिकेत सॅन फ्रॅन्सिस्को येथे एका बागेत फिरत असताना अचानक समोर एक दिमाखदार इमारतींची रांग दृष्टीपथात आली आणि ते दृश्य पाहून मी अक्षरशः भारावून गेलो. बागेतल्याच एका बाकावर बसून मी त्या इमारतीचं सौंदर्य शांतपणे न्याहाळू लागलो. बागेच्या समोरच्याच फुटपाथवर पाचसहा इमारतींचीं रांग दिसत होती. रांगेतल्या प्रत्येक इमारतीचं सौंदर्य खरोखरोच अप्रतिम होतं. युरोपियन पठडीतल्या बैठया घरांच्या शैलीतल्या त्या […]

जिम कॉर्बेट – भाग ३

जिम कॉर्बेटचे भारतावर व भारतीय लोकांवर अतिशय प्रेम होते. तो म्हणतो, ‘माझ्या भारतातील बहुसंख्य लोक नि:संशय भुकेकंगाल आहेत, धनहीन आहेत. पण ते अतिशय साधे, भोळे, प्रामाणिक, निष्ठावान व कष्टाळू आहेत. माझे त्यांच्याशी प्रेमाचे नाते जडलेले आहे.’ जिम बऱ्याच वेळा परदेशी गेला होता पण तो कुठेच रमू शकला नाही कारण त्याचे भारताविषयीचे प्रेम व ओढ! भारत हा […]

पूर्वाश्रमीची महत्वाची माणसे

“काल “ची असा शब्द वापरण्याऐवजी या शब्दसमूहात “पूर्वाश्रमीची” असा शब्द वापरलाय, बहुधा “महत्वाची” असावीत म्हणून ! महत्व लोप पावल्याने/ निरुपयोगी असल्याने हळूहळू गृहीत धरली जाणारी, काळाच्या ओघात विसरली जाणारी, एका कोपऱ्यात ढकलली गेलेली माणसे यांच्या संदर्भात नुकतेच काही वाचनात आले. पाश्चात्य देशांमध्ये निर्घृणपणे (मर्सिलेस्ली) त्यांना दूर केले जाते. कारण एकच -त्यांच्यासाठी काळ काही विशिष्ट क्षणांमध्ये गोठलेला […]

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ९ – सावरकरांची क्रांतिवृत्ती

सावरकरांची क्रांतीवृती सर्वश्रुत आहे.वयाच्या केवळ १५व्या वर्षी  “मी स्वदेश स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा झेंडा उभारून, शत्रूला मारीत मारीत मरेतो झुंजेन“ अशी शपथ घेतली होती. […]

माझे आजोळ – भाग ३- आजोबांची कामे (आठवणींची मिसळ ३१)

तेंडोलकरांच्या वाड्यांत मिळालेल्या संस्कारांनी अनेकांचे आयुष्य घडले. आजोबा वायफळ खर्च करत नसत. परंतु जेव्हां जेव्हां एखाद्याला नोकरी नव्हती, शिकायचे होते त्याला त्याला त्यांनी दार सदैव उघडे ठेवले. अडचणीत असणा-या सर्वांना वेळोवेळी आधार दिला. तिथे जेवणाखाण्याची, अंथरूण-पांघरूणाची, जागेची ददात नव्हती. शिस्त जरूर पाळावी लागे पण ती तुम्हालाच कांही शिकवून जाई. […]

1 84 85 86 87 88 493
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..