नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

आठवणीतले अण्णा..

जेव्हा नाटक चित्रपटांची डिझाईन करु लागलो तेव्हा अण्णांचे फोटो काढून डिझाईन करण्याची संधी मिळाली. भक्ती बर्वेच्या ‘डबल गेम’ नाटकाची डिझाईन करीत होतो. तेव्हा सर्व कलाकारांचे फोटो काढून अनेक डिझाईन्स केली. तेव्हा अण्णांशी खूप जवळून संपर्क आला. नाटक तुफान गाजले. दरवेळी मी नाटक पहात होतो, अण्णांच्या संवादफेकीत मला कधी सुईचाही फरक जाणवला नाही, त्यांचं टायमिंग आणि बेअरिंग हे प्रत्येकवेळी अचूकच असायचं. […]

जेवण संस्कृती पाटपंगत – डायनिंग टेबल ते…….कुठेही.

आमच्या लहानपणी , “मुकाट्याने जेव बरं, आणि नंतर काय ती बडबड कर…. “ हे वाक्य जेवताना कमीतकमी एकदा तरी आईच्या तोंडातून यायचंच. म्हणजे जेवायला आम्ही सगळे एकत्र पाटावर बसायचो, पण आजच्यासारखं गप्पा मारत, हास्य विनोद करत जेवण होत नसे. बोलत बसलं की, तेव्हढ अन्न कमी जातं पोटात, ही आयांची धारणा होती. त्यामुळे मोजकच , जरुरीपुरतं बोलायचं […]

एक अविश्वसनिय कलाकृती : मोढेरा सुर्यमंदिर

आपल्या देशात एवढया सुंदर कलाकृती आहेत/होत्या ना की त्या जगातील सात आश्चर्य आहेत ना सुद्धा मागे सोडतील ,पण तरीही आपल्याला पाहायचं काय असतं ताज महाल ,असं नाही की ताजमहाल सुंदर नाही ,पण डोळे उघडून बघा ,ताजमहाल पेक्ष्या कितीतरी सुंदर वास्तू/मंदिरे भारतात आहेत ,डोलदार पणे दिमाखात अजुनही आपले गतवैभव सांभाळत उभे आहे,विचार करा ,हे परकीय आक्रमणकर्ते ,इंग्रज […]

अभ्यासिका

साठ वर्षांपूर्वी खेड्यात वीज पोहोचलेली नव्हती. त्यावेळी मुलांना दिवसा झाडाखाली तर रात्री घरात कंदिलाच्या उजेडात अभ्यास करावा लागायचा. असा अभ्यास करुन शाळेमध्येच नव्हे तर तालुक्यात पहिल्या क्रमांकाने पास होऊन जीवनात यशस्वी झालेले प्राचार्य वसंत वाघ (फर्ग्युसन काॅलेज) सरांसारखी माणसं आजही आपल्यात आहेत. […]

उगाच काहीतरी -२०

लेट सिटींग डिस्कलेमर : हे माझं वैयक्तिक निरीक्षण आणि मत आहे. तुमचे विचार वेगळे असू शकतात. ‌आपल्या भारतीयांचे काही वैशिष्ट्य असतात म्हणजे भारतीय मेहनती असतात. प्रामाणिक असतात, आणि लवचिक असतात.याचे उदाहरण म्हणजे आपल्याकडच्या कॉल सेंटर वगैरे. परदेशी वेळेच्या हिशोबाने आपल्याकडे काम करण्याच्या जी लवचिकता आहे त्यामुळेच आपल्याकडे bpo आणि कॉल सेंटर एवढ्या प्रमाणात स्थापित होऊ शकले […]

निव्वळ आभार प्रदर्शन नव्हे तर हेतुपुरस्सर कृतज्ञता !

हेतुपुरस्सर कृतज्ञता व्यक्त करणे सोप्पे असते. दिवसातून काही वेळा क्षणिक विसावा घ्यावा, मनात आणि मनाबाहेर काय अनुभव येताहेत आजमावून बघावे आणि नक्की कशाबद्दल कृतज्ञ आहोत याचा मागोवा घ्यावा. रोज याचा सराव केला तर त्यामधून काही फायदे अनुभवाला यायला सुरुवात होते- […]

वरची ब

गावातले आमचे जुने कौलारू घर दोन माळ्याचे आहे. आमच्या त्या घरात माझ्या दोन काकांचे आणि आमचे असे तीन कुटुंब एकत्र राहायचे. शेतावरच्या घरात मोठा काका तर गावात अजुन एका घरात आणखीन एका काकाचे कुटुंब. आम्ही ज्या घरात राहायचो त्या घराच्या तळमजल्यावर आम्ही आणि दोन नंबर काकाचे कुटुंब तर वरच्या माळ्यावर तीन नंबर काकाचे कुटुंब. वरच्या माळ्यावर […]

एक ‘राजा’ प्रजेचा…

दादासाहेब फाळकेंचा पहिला मूकपट ‘राजा हरिश्चंद्र’ हा १९१३ साली प्रदर्शित झाला. त्यानंतर अनेक मूकपटांची निर्मिती झाली. तेव्हा मूकपट पडद्यावर चालू असताना तबला पेटी वाजवून काहीजण संगीताची साथ देत असत. अशाच एका थिएटरमध्ये संगीत साथ देणारे एकाच ठिकाणी बसून कंटाळले की, त्यांना पाय मोकळे करण्यासाठी संधी देऊन स्वतः पेटी वाजवणारा एक तरुण होता. तो गंमत म्हणून हे […]

वर्कलोड

“सर,आज मै थोडा कन्फ्यूज्ड हूं !” मी एम.डीं ना म्हणालो. ” क्यूं ?” “अपने एच.आर.मॅनेजरने एक असिस्टंट देने की रिक्वेस्ट डाली है .” मी माझे म्हणणे मांडले. ” हमारे यहां ‘पे रोल प्रोसेसिंग’ तो अकाऊंट्स डिपार्टमेंट करता है, फिर भी एच.आर. इतना बिझी ?” ” अब एच.आर.का वर्कलोड काफी बढा है. उसने एक टेबलमे, हर एक […]

कॅफे डेस्टिनी

एका मॅट्रिमोनिअल साईटवर दोन दिवस चॅटिंग केल्यानंतर निकिता आणि निखिल दोघे रविवारी संध्याकाळी हॉटेल कॅफे डेस्टिनीला भेटायचे ठरवतात. ठरल्याप्रमाणे निखिल निकिताला भेटण्यासाठी त्याचा मित्र निहारला सोबत घेऊन आणि निकिता तिची मैत्रीण नेहाला सोबत घेऊन येते. चौघांचे हाय – हॅलो झाल्यावर निखिल आणि निकिता हॉटेलच्या वरच्या फ्लोअरवर एकमेकांशी बोलण्यासाठी जातात आणि निहार आणि निकिता तिथेच एका टेबलवर […]

1 107 108 109 110 111 525
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..