नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

उगाच काहीतरी -३ (बिस्किट्स नॉस्टॅल्जिया)

हल्लीच दुकानात बिस्किटांचे विविध प्रकार पाहत होतो. किती प्रकार, किती रंग, किती फ्लेवर्स काय नि काय. अचानकपणे आमचे दिवस आठवले.
त्यावेळेस ही बिस्किटांचे बरेच प्रकार असावेत पण आमच्या माहितीत हेच मुख्य होते. […]

भारतमातेच्या वीरांगना – ४९ – कुट्टी मालू अम्मा

१९३२ साली असहकार आंदोलन,सविनय कायदा भंग ह्या सगळ्यात त्यांनी भरपूर काम केले. एक मोठा मोर्चा काढण्यात आला, त्यात कुट्टी मालू ह्यांनी पुढाकार घेतला आणि त्या मोर्च्याचे नेतृत्व देखील केले त्यावेळी त्यांची मुलगी केवळ दोन महिन्यांची होती. इंग्रजांचे दडपशाही चे धोरण सर्वश्रुत आहेच. त्यांनी महिला, मुलं, अबाल-वृद्ध काहीच बघितले नाही आणि सगळ्यांना देशद्रोही म्हणून कारावासात टाकणे सुरू केले. कुट्टी मालू ह्यांना सुद्धा २ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा झाली, त्यांच्या दोन महिन्यांच्या तान्हुली बरोबर त्यांनी कारावास भोगला. प्रत्येक चळवळ जी भारताला स्वातंत्र्य देऊ शकेल अश्या सगळ्यात कुट्टी मालू ह्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला, मग ते सविनय कायदे भंग, असहकार आंदोलन किव्हा चले जाव चळवळ. प्रत्येकवेळी त्याची शिक्षा ही ठरलेली, कारावास कालावधी फक्त वेगळा होता. कारावसातून सुटून आल्यावर त्या अजून जोमाने कामाला लागायच्या. […]

राष्ट्रव्यापी संपातून घडलेले करियर

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये जोसेफ तुस्कानो यांनी लिहिलेला हा लेख जगणे सरळधोपट असले की त्यात बेचवपणा येतो. कुतूहल, धाडस, उत्कटता, ईर्षा यातून बरेवाईट निर्णय घेऊन आपण जगतो. ठेचकळत, अडखळत अपयशावर मात करत यश संपादन करतो त्याची चव काही औरच असते. आयुष्यातील विविध टप्प्यात उत्कृष्ठतेचा ध्यास अवश्य मनी असावा, पण तिच्या प्राप्तीचा हट्ट नसावा. ‘देवाची […]

ग्रामीण भागातील नागपंचमी

श्रावण महिना म्हणजे जिकडे तिकडे हिरवागार परिसर ओढे नदी नाले पाऊस भरपूर असल्यामुळे खळखळ वाहत असतात. तर काही वेळा महापूर येण्याची सुद्धा शक्यता असते या महिन्यांमध्ये सर्वत्र आनंदी आनंदतरळत असतो. या नागपंचमीला लग्न झालेल्या नवक्या मुली माहेरहून सासरला येतात घरात मुली आल्या म्हणजे घर गजबजून जाते. या महिन्यामध्ये पोषक वातावरण पावसाची रिमझिम तर सारखी चालू असते. पाऊस चालू झाला म्हणजे पावसाच्या रिमझिम मध्ये लहान मुले मुली घराच्या बाहेर पटांगणामध्ये आनंदाने गाणे म्हणतात….। […]

शतक पाहिलेला माणूस – शहाण्यांचे बहुमत !

डॉ सागर देशपांडे यांनी संपादित केलेल्या “शतक पाहिलेला माणूस ” या पुस्तकाच्या प्रकाशनाचे त्यांनी मला निमंत्रण पाठविले. अविनाश धर्माधिकारी, देगलूरकर सर, पी डी पाटील, भूषण गोखले सर, प्रदीप रावत आणि बाबासाहेबांचे चिरंजीव (अमृत पुरंदरे) ही बिनीची नावं समारंभाकडे खेचून नेण्यास समर्थ होती. […]

दर्जेदार कार्यक्रमांची रेलचेल

ऑक्टोबर २००७ मध्ये माझी एक मोठी इच्छा अचानक पूर्ण झाली. निर्मात्या मेधा मेहेंदळे यांच्या तन्वी प्रॉडक्शनच्या ‘डॉटर’ या हिंदी चित्रपटासाठी मी एक गाणे रेकॉर्ड केले. संगीतकार सलील अमृते होते. माझी पत्रकार विद्यार्थिनी तृप्ती दोंदेच्या मार्फत प्रेरणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण कुलकर्णी मला भेटले. लोकसत्ता आणि दिशा डायरेक्टरसाठी कार्तिकी एकादशीनिमित्त ‘मुखी नाम हाती टाळ’ हा अभंगाचा कार्यक्रम ते […]

हिमशिखरांच्या सान्निध्यातलं केदारनाथ

चैत्र महिना उजाडतो. आकाश निळ्या रंगाने झळकू लागते. आसमंतात सोनशिंपण पसरते. सूर्यकिरणांचे नाजूक हात पर्वतशिखरे गोंजारू लागतात. बर्फाची चादर हलकेच दूर होऊ लागते. नव्या नवलाईचे दिवस सुरू होतात. खुलणारा निसर्ग हसरा होऊ लागतो. […]

छुपा देवदूत (संक्षिप्त रूपांतरीत कथा ४०)

आळशीपणा, दुर्गुण आणि दारू पिण्याची सवय ह्यांचा व्हायचा तोच परिणाम होऊन त्या आईचा थंडगार मृत देह तिच्या दुर्दैवी मुलांच्या मधोमध पडला होता. ती दारूच्या नशेत स्वतःच्या घराच्या दारात येऊन पडली व भेदरलेल्या तिच्या मुलांच्या समोरच तिचा देह निष्प्राण झाला. एऱ्हवी त्या बाईवर रागाने डाफरणारा प्रत्येक गांवकरी आता हळहळत होता. मृत्यू माणसाच्या कोमल भावनांना आवाहन करतो. तिच्या […]

रंगपरंपरेचा नवा प्रवाह: टॅग

21व्या शतकात ठाणे शहराने आपले हात-पाय पसरवले. कधी काळी जंगलातून जाणारा घोडबंदर रोड आता भरवस्तीत आला आहे. या वाढत्या ठाण्यातील रसिकांच्या कलातृप्तीसाठी निर्माण झालं डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह! या सगळ्या बदललेल्या परिस्थितीत वाढलेल्या ठाण्यासाठी एक नवे सांस्कृतिक केंद्र निर्माण होणं अपरिहार्य होतं. या अपरिहार्यतेमधून 6 डिसेंबर 2012 रोजी ‘ठाणे आर्ट गिल्ड’ अर्थात TAG या संस्थेची स्थापना झाली. कलेच्या माध्यमातून कलेचा प्रसार हेच ध्येय समोर ठेवून टॅगचा जन्म झाला. अर्थात ‘ठाणे आर्ट गिल्ड’ ही संस्था केवळ कलावंतांची नसून, सर्व रसिकांसाठी आहे. […]

शिष्यांसंगे…

यशवंतराव विद्यापीठ गंगापूर नाशिकचे उपकुलगुरू डॉ. पंडित पालांडे माझ्या गाण्याचे चाहते होते. या विद्यापीठाच्या १८व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी माझा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात माझी विद्यार्थिनी दर्शना घळसासी माझ्याबरोबर गायली. वादक कलाकार म्हणून कीबोर्डवर माझाच विद्यार्थी सागर टेमघरे तर तबलावादक म्हणून अमेय ठाकुरदेसाई आमच्याबरोबर होता. सागर आणि अमेय आता अनेक व्यावसायिक कार्यक्रमांनाही वादन साथ करू लागले […]

1 106 107 108 109 110 490
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..