उगाच काहीतरी -२४
काल मी मरता मरता वाचलो. त्याचं काय झालं की सध्या आमचे कन्यारत्न हॉस्टेल वरून घरी आले आहे आणि नेहमी प्रमाणे आम्हाला बोटावर नाचवणे चालले आहे. तशी तिला हॉस्टेलवर राहून ही आम्हाला फोनवरून नाचवण्याची कला अवगत आहे. पण असो तर पॉंइटाचा मुद्दा हा की तिने दोन दिवसापुर्वी हुकूम सोडला की तिला ती कुठलीशी H&E पेन्सिल पाहिजे आहे. […]
