नवीन लेखन...

अज्ञात आणि अनामिक यांना

हे दोन आपण पिढ्यानपिढ्या म्हणत आलेलो आहोत. अर्थ माहित नाही आणि कोणी लिहिले आहे हे सुद्धा माहित नाही…. अशी किती तरी गाणी. काव्य. बडबड गीत. वगैरे फार मोठा खजिना आहे कवितांचा. कवी. रचियता कोण आहेत हे मात्र अज्ञात आहे. म्हणून त्यांचे मोल कमी होत नाही. त्याचे जतन केले आहे… […]

परी कथेतील राजकुमारी

ही आहे माझ्या परीकथेतील माझी मोठी मुलगी. मला ही पहिली मुलगी झाली होती. आणि नांव काय ठेवायचं असा विचार करत होते. आणि मला वाटलं की माझ डॉ व्हायच स्वप्न माझी लेक पूर्ण करेल म्हणून मी तिच्या नावाचा विचार करताना डॉ हे आधी शोभेल असे काही तरी ठेवावे. आणि डॉ अनुराधा खूपच छान वाटलं म्हणून तेच ठेवले… […]

‘आर एच टी डी’ ते ‘रॉकेट्री’ – तोच धमाल, नैसर्गिक, खोलवर आर एम !

बाय द वे – शाहरुखचा येथे दुसऱ्यांदा पराभव झालेला दिसला – माधवन कडून ! पहिल्यांदा तो हरला होता “बिल्लू “मधील इरफान खान कडून ! अर्थात हे दोन्ही पराभव त्याच्यासाठी “मिरविण्यासारखे “खचित आहेत. एक पुसटती जखम त्याला “रईस “मध्ये नक्कीच झाली होती -नवाजुद्दीन सिद्दीकी कडून ! […]

ओवणे, पटवणे, गाठवणे

मंगळसूत्र मण्यांच्या आकारानुसार दोर वळली जायची. दोन पदरी साठी चार दोऱ्या व लांबी पण ठरलेली. पायाच्या पिढंरीवर पाणी लावून दोर वळली की मग चारपदरी दोर आणि ते सगळे एकत्रित करून दोन सोन्याचे मणी नंतर दोन सोन्याच्या वाट्या मध्ये एक मणी परत दोन वाट्या असे ओवून झाले की मग तीन पदर पायाच्या अंगठ्याला पीळ देऊन अडकवून एक पदरी दोऱ्या काळे मणी ओवून मग असे आळीपाळीने चार पदर ओवून झाले की देवा समोर पाट मांडून घरातील एखाद्या मोठय़ा सवाष्णी कडून त्या मंगळसूत्राला हळदीकुंकू लावून बांधून घेवून झाले की देवाच्या व त्या बाईच्या पाया पडायला लागायचे. […]

अ. भा. मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखेचा प्रवाह

ठाण्यातील समाजातून वेगवेगळे कलाकार निर्माण झाले पाहिजेत हीच जिगिषा, तळमळ मनांत ठेवून वि. रा. परांजपे व सन्मित्रकार स. पां. जोशी या द्वयींनी पुढाकार घेऊन अ.भा.म.ना. परिषद, ठाणे शाखेची स्थापना १ ऑक्टोबर १९७९ रोजी केली. तो विजया दशमीचा शुभ दिवस होता. […]

कादंबरी ते नाटककार एक प्रवास

ईश्वर प्रेरणेने आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडत असतात. ‘नरेंद्र ते विवेकानंद – एक झंझावात’ हे चरित्र म्हणजे माझ्या आयुष्यातील योगायोग म्हणावा लागेल, किंबहुना हा दैवी चमत्कारच ठरला असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. विवेकानंदांचे चरित्र वाचता वाचता सांगत गेलो, सांगता सांगता लिहीत गेलो. ते लोकांना आवडेल, त्यांनी उचलून धरले. हे कसे घडले? या प्रश्नांची उत्तरे माझ्याजवळ नाहीत. […]

२६/११- आमची “मिती “

या तारखेची ताजी भळाळती खूण आत्ता दुपारी नेटफ्लिक्स वर पाहिली – ” मेजर ” ! हा चित्रपट दोन दमात बघून संपवला. एका बैठकीत असले इंटेन्स पिक्चर्स आजकाल सहन होत नाही. मेजर उन्नीकृष्णन यांचे २६/११ चे बलिदान आणि पूर्णतया NSG अँगलने केलेला हा चित्रपट! […]

‘लता’

खचाखच भरलेल्या लोकल मधे.. घुसमटलेल्या श्वासात व घामेजल्या अंगानी उभे, प्रवास नामक नरकवास सहन करत असतो आम्ही तेंव्हा अनाहुतपणे वाजतो कोणा अगांतुकाचा फोन अन त्या गर्दीला चिरत आमच्यापर्यंत येतो तुझा स्वर “ओ पालनहारे, निर्गुण और न्यारे.. तुमरे बिन हमरा कौनो नाही..” चेह-यावर त्या स्थितीतही एक अस्फुट स्मित येते..
शेजारचा दाढीवालाही ओळख नसताना हसतो..
पुढचा प्रवास सुखकर होतो.. […]

” मधल्या सुट्टीतील डबा “

मागे वळून बघण्याच्या वयात आल्यानंतर सगळ्यांनाच स्नेहमेळाव्याची/बालपण भेटण्याची ओढ लागते. आम्ही त्याला अपवाद नाही. माझ्याकडे भेटीचे असे तीन पर्याय आहेत- भुसावळचे शाळूसोबती, सोलापूर हदे चे मित्र आणि सांगलीच्या वालचंदचे स्नेहगडी ! संधी मिळेल तशी मी प्रत्येक पाणवठ्यावर हजेरी लावत असतो. […]

‘कवितेचे झाड’

शब्दांचे पक्षी येऊन बसतात भावनांनी लदबदलेल्या वाक्यांच्या फांदीवर तेंव्हा सुरु झालेला असतो. कवितेचा किलबिलाट पानांपानांच्या आडून…मुळासहित सगळ्या झाडाचे कान अधिर होऊन जातील काही क्षणातंच..स्तब्ध होऊन आकाश ही विसावेल क्षणभर ढगांसहित…हळूहळू..उतरत जाईल कविता कागदावर..मेघातून झिमझिम बरसणाऱ्या पावसाच्या थेंबाप्रमाणे.. कोंब फुटतील शब्दांना मनाच्या मऊ-मऊ मातीत खोल..वर येण्यासाठी संघर्ष होईल मातीशी.अंगातले सारे बळ एकवठून वाट काढत शिरावे लागेल मातीच्या […]

1 74 75 76 77 78 284
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..