नवीन लेखन...

पुस्तकांचे देणे, पुस्तकांवर बंदी !

पुस्तके असतात सोबती-एकाकी असताना ! अबोलपणे खुणावत असतात-मी आहे. केव्हढा धीर येतो मग. घरातल्या पुस्तकांनी ओथंबून चाललेल्या कपाटांकडे अभिमानाने नजर टाकता येते खरी पण त्याचवेळी सकाळी टीव्ही वर पाहिलेली दिवाळी अंकांच्या संचाची जाहिरात खुणावते, मित्रांच्या पुस्तक-प्रकाशनाची आवतणे येत असतात, प्रदर्शनांकडे पावले वळतात आणि काही काळाने कपाटांची “श्रीमंती” अधिक वाढते. […]

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – १४ – स्थितप्रज्ञ सावरकर

सावरकर यांनी  लहानपणापासून सतीच वाण पत्करले होते. हजारोंच्या घरी पुढेमागे सोन्याचा धूर निघावा म्हणून आपली चूल बोळकी वयाच्या विसाव्या वर्षी फोडून टाकली होती. […]

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – १३ – सावरकरांची भाषाशुद्धी

सावरकर भाषाशुद्धीचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांचा आग्रह होता, आपली मातृभाषा समृद्ध असायला हवी त्यावर इंग्रजी भाषेचा प्रभाव कशासाठी हवा? त्यांचे म्हणणे होते की problem न म्हणता समस्या म्हणा. […]

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – १२ – विज्ञाननिष्ठ सावरकर

सावरकर विज्ञाननिष्ठेचे कट्टर पुरस्कर्ते होते. कोणतीही गोष्ट विद्यानाच्या कसोटीवर पारखल्याशिवाय ती आचरणात आणायची नाही ही त्यांचे सांगणे होते. राष्ट्राची प्रगती व्हावी व ती विज्ञाननिष्ठेनेच होईल अशी त्यांची धारणा होती. […]

इंदिराजींचा राजकारणात प्रवेश

१९५५ सालातील गोष्ट. काँग्रेस अध्यक्ष यू. एन. ढेबर आणि लाल बहादूर शास्त्री यांनी नेहरूंबरोबर काँग्रेस पक्षामध्ये वरिष्ठ पातळीवर काही सदस्यांची नेमणूक व्हावी यासाठी चर्चा केली. असा विचार होता की, हे सदस्य तरुण असावेत व ते पक्षकार्यासाठी उपयुक्त असावेत. डझनभर नावे विचारार्थ आली होती. त्यात इंदिराचे एक नाव होते. शास्त्रीजी व ढेबर यांनी इंदिरेला विनंती केली, की तिने युवकांचे व महिला विभागाचे नेतृत्व करावे. […]

श्री साईनाथांच्या एकशेंचौथ्या स्मृतिदिना निमित्ताने

“यावचंद्रदिवाकरौग्निहोत्रंजुहुयात” – श्री साईनाथांच्या एकशेंचौथ्या स्मृति दिनानिमित्ताने…. लेखक : कॅ. विवेकानंद र. नूलकर आजीवन अग्निहोत्र चालविणाऱ्या श्री साईनाथांच्या शिरडीखेरिज अन्य अग्निहोत्र ऐकिवात वा वाचनांत नाहीत. श्री साईनाथ देहधारी असतांना व आतां सूर्य-चंद्र असेपर्यत चालणारे असे हे अग्निहोत्र आहे. ( पारसी अग्यारी अपवाद धरावा, तर ज्वालाजी हि. प्र. भूगर्भ अग्नि आहे.) मशीदीत तर अग्नी नाहीच. अग्निहोत्र चालविणारे […]

उभा तुझ्या अंगणी स्वरांचा “अबोल” हा पारिजात आहे!

भुदरगड येथील साहित्य संमेलनात प्रसिद्ध लेखक -शिवाजी सावंत म्हणाले होते- “अश्रुंचे वय किती ?” डोळ्यात उगवल्यापासून ते ओघळून जाईपर्यंत (किंवा डोळे कोरडे होईपर्यंत)कां खूप आधीपासून (आत खोलवर साठल्यापासून ते कधीच बाहेर न येईपर्यंत?) लताच्या स्वरांचे वय काय? कानावर पडल्यापासून ते विरून जाईपर्यंत की मी जन्मल्यापासून आजतागायत जे मी आत साठवून ठेवलंय (आणि जे माझ्याबरोबरच संपेल) तेथपर्यंत? […]

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ११ – अस्पृश्यता निवारक सावरकर

सत्यशोधक समाजाचे बागल म्हणाले “जे कार्य आम्ही कोल्हापुरात करू शकलो नाही ते सावरकर यांनी रत्नागिरीत करून दाखवले. असा नेता आम्हाला मिळाला असता तर आम्ही त्याला डोक्यावर घेऊन नाचलो असतो.” सावरकर यांनी आदेश दिला की माझा  वाढदिवस अस्पृश्यता निवारण म्हणून पाळा.” व कार्यकर्ते यांना सूचना केली की घरोघर जाऊन पत्रके भरून घ्या की “मी  सार्वजनिक व खाजगी जीवनात अस्पृश्यता पाळणार नाही.” […]

माझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२)

माझ्या आईच्या पिढीतले पणजोबांच्या घराला “तेंडोलकर युनिव्हर्सिटी” म्हणत. कोल्हापुरला राजाराम कॉलेज होते. पुण्यानंतर कुठे कॉलेज नव्हते, त्यामुळे कोंकण, सातारा, इथले सर्व विद्यार्थी तिथेच येत. महाविद्यालयीन अभ्यासाबरोबरच कसं रहावं, कसं वागावं, ह्याचे धडे त्यांना तेंडोलकरांच्या घरी मिळत. त्यामुळे ते आपलं शिक्षण तेंडोलकर युनिव्हर्सिटीत झालं आहे असं अभिमानाने सांगत. पहिली गोष्ट तिथे शिकवली जाई ती म्हणजे काम करणे महत्त्वाचे. तिथे राहिलेल्याला पुढे आयुष्यात कधीही कोणतेही काम करायला लाज वाटायची नाही. आजोबा स्वतः श्रमप्रतिष्ठा आचरणारे होते. दुसरी गोष्ट म्हणजे वायफळ खर्च न करणे. छानछोकीवर पैसे वाया न घालवणे. तिसरी गोष्ट निर्व्यसनीपणा. कोणतेही व्यसन लावून घ्यायचे नाही. […]

1 55 56 57 58 59 283
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..