नवीन लेखन...

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – १४ – स्थितप्रज्ञ सावरकर

सावरकर यांनी  लहानपणापासून सतीच वाण पत्करले होते. हजारोंच्या घरी पुढेमागे सोन्याचा धूर निघावा म्हणून आपली चूल बोळकी वयाच्या विसाव्या वर्षी फोडून टाकली होती.

सावरकरना मृत्यूचे भय  नव्हते. मृत्यूला आव्हान देत ते राष्टकार्य करत होते. १९४३ मध्ये त्यांना साठ वर्षे झाली त्यावेळेस संमारंभात त्यांना दोन लाख दिले पण त्याचा सावरकर यांना हर्षउन्माद झाला  नाही. १९१० सावरकरना अटक झाली. कोठडीत त्यांना मित्र अय्यर भेटायला गेले. तेव्हा सावरकर त्यांना म्हणाले.” प्राप्त परिस्थितीचा विचार करता तक्रार करण्यासारखे काही नाही. मला अंदमानात नेले तर माझ्या वडील बंधुचे दर्शन होईल “.

एक महिन्यानंतर सावरकरांना डोंगरीहून भायखळा येथील तुरुंगात नेण्यात आले. तिथेच जॅक्सन हत्या कटातील ज. ना . थत्ते शिक्षा भोगत होते. एका वॉर्डरच्या मदतीने त्यांना सावरकरांशी गुप्त भेट घेता आली. त्यांच्या हाता पायात बेडी होत्या. पण त्यांची निर्भय व प्रसन्न वृत्ती थत्ते अचंबित झाले त्यांनी सावरकरांना झालेल्या शिक्षेचा धिक्कार केला पण त्यावर सावरकर म्हणाले.”चापेकर, धिंगरा,  कान्हेरे ,अश्या थोरानी  आपले बलिदान दिले त्यांच्या पुढे मी कोण ?” अंदमानला नौका पोहोचली तेव्हा सावरकर म्हणाले “ अंदमान स्वतंत्र हिंदुस्थानचा सिंधुदुर्ग व्हायला योग्य आहे.” सावरकरांवर दु:ख कोसळले, काळेपाणी नशिबी आले तरीही सावरकर  प्रत्येक प्रसंगात अविचल राहिले.

— रवींद्र वाळिंबे.

संदर्भ व आभार-(शतपैलू सावरकर-लेखक हरिश्चंद्र त्र्यंबक देसाई)

 

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 79 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..