जगणे अमुचे नका विचारू, आम्ही पाखरे भटकी !
असा डंका आम्ही फार पूर्वी मिरवलाय. हे भटकेपण स्वीकारलेलं असो की लादलेलं ! तेथे एकाकीपण आलंच. जगणं जगायसाठी बाहेर पडावं लागतंच. पण “तो प्रवास सुंदर होता ” अशी ग्वाही देता येतेच असं नाही. […]
असा डंका आम्ही फार पूर्वी मिरवलाय. हे भटकेपण स्वीकारलेलं असो की लादलेलं ! तेथे एकाकीपण आलंच. जगणं जगायसाठी बाहेर पडावं लागतंच. पण “तो प्रवास सुंदर होता ” अशी ग्वाही देता येतेच असं नाही. […]
कै. आनंद यादव सरांना मी ओळखत होतो पण त्यांची प्रत्यक्षात कॉलेज संपल्यावर कधी भेट झाली नव्हती. पुण्यात मराठी साहित्य परिषदेत एका कार्यक्रमात मी मुद्दाम कै. प्रा.आनंद यादव सरांची आवर्जून भेट घेतली. सातारच्या जुन्या आठवणींची उजळणी झाली. […]
१९७५ साल खऱ्या अर्थाने गाजवलं दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांनी ! त्याकाळी “कोटी ” कॅटॅगरी नव्हती. सोलापूरच्या मीना टॉकीज ला ” शोले ” आणि रस्ता ओलांडून शंभर फुटांवर प्रभात मध्ये ” जय संतोषी माँ “. दोघांचा प्रेक्षकवर्ग वेगळा पण सोलापूर मुळातच चित्रपट प्रेमी शहर असल्याने माझ्या सारख्या भुसावळहून गेलेल्या पांढरा पडदा प्रेमीसाठी ती पर्वणी होती. […]
महाकवी कालिदास प्रतिष्ठान ही संस्था स्थापन झाली . त्याप्रसंगी सर्वश्री ख्यातनाम व ज्येष्ठ साहित्यिक ,समीक्षक , रंगकर्मी अशी अनेक मंडळी कै. डॉ. द.भी. कुलकर्णी , डॉ. न.म. जोशी , कै. म.श्री. दीक्षित , कै. डॉ. वि.भा. देशपांडे , कै .डॉ. आनंद यादव , डॉ. अशोक कामत , प्रा.सु.ह.जोशी सर , प्रा. द.ता. भोसले सर , प्राचार्य नवलगुंदकर सर , डॉ. सदानंद मोरे , डॉ. रामचंद्र देखणे अशी अनेक ज्येष्ठ साहित्यिक मंडळी तसेच या धायरी , वडगाव पुणे परिसरातील अनेक ज्येष्ठ मंडळी ,सर्व सामाजिक कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते . […]
आपण परदेशात गेल्यावर तिथं कोणी भारतातील, त्यातूनही महाराष्ट्रातील, नशीबाने पुण्यातील माणूस भेटला की, जो आनंद होतो.. त्याचं शब्दांत वर्णन करणंही अवघड आहे. कारण त्यात एकप्रकारचा आपलेपणा, आपुलकी असते. तसंच आपण जिथं राहतो, त्या परिसरात मराठी माणसाचं दुकान दिसलं तर आपण पहिल्यांदा त्याच दुकानात खरेदीला जातो. माझं बालपण तर सदाशिव पेठेतच गेलं. तेव्हा मराठी माणसांची दुकानं भरपूर होती. अगदी भाजीवाल्यापासून ते मिठाईवाल्यापर्यंत! […]
दुःख वाटल्याने कमी होतं म्हणे ! हेही पटत नाही. माझ्याकडचं एक किलो दुःख चार जणात वाटल्याने ते प्रत्येकी २०० ग्रॅम ( मी धरून पाच ) होत नाही. माझ्यासाठी ते एक किलोच राहतं आणि प्रदीर्घ काळ टिकतं . नवं दुःख आलं म्हणजे जुनं विसरलो असं होत नाही. ते सतत असतच आणि एकाकी असताना नव्याने, पूर्ण शक्तीनिशी भिडतं. […]
लेखन किंवा काव्य प्रकाराकडे वळलो नव्हतो. पण योगायोगाने व्यवसायाची व्याप्ती वाढली होती . पण माझ्या अहंपणामुळे / गर्विष्ठपणामुळे / आडमुठेपणामुळे मला व्यवसायात एक मोठ्ठा फटका बसला ..रत्नागिरी जिल्ह्याचे माझे एक मोठ्ठे कामाचे टेंडर नामंजूर झाले होते तो माझा मूर्खपणा होता. खुपच विमनस्क झालो होतो. चिंताग्रस्त झालो. पश्चाताप झाला . मग रत्नागिरीतून सरळ पावसला गेलो ..! तिथे राहिलो. त्या अत्यन्त विदारक मानसिक उद्विग्न अवस्थेत मला पहिली रचना पावसच्या स्वामी स्वरूपानंद मन्दिरातील खालील चिदंबर गुहेत सूचली. हाच टर्निंग पॉईंट ऑफ लाईफ ठरला. […]
माणूस हा नेहमी सुखाच्या शोधात असतो. जरा कुठं मनासारखं घडलं नाही तर त्याची चिडचिड होते. माझंही तसंच झालं होतं. तसा मी सुखवस्तू होतो, मात्र ताणतणावाने मानसिक तोल ढळला की, मला सगळं काही सोडून हिमालयात निघून जावं, असं वाटत असे. तशी नुकतीच माझी चाळीशी उलटली होती. बायको, मुलं, फ्लॅट, नोकरी, गाडी अशा मध्यमवर्गीयाला जीवनावश्यक असलेल्या सर्व गोष्टी माझ्याकडे होत्या. फक्त मन सैरभैर झालेलं होतं… […]
मराठी वाक्प्रचारामध्ये अनेक फळभाज्यांची नावं सर्रास वापरली जातात. उदाहरणार्थ, पुराणातील वांगी पुराणातच, वांग्याचं तेल वड्याला, सांगीवांगी, इत्यादी. आमच्या शाळेतील एक शिक्षक फार कडक होते, ते गोंधळ घालणाऱ्या मुलांना दम देताना म्हणायचे, ‘तुम्ही जर माझं ऐकलं नाहीत तर मी एकेकाच्या पार्श्वभागाचं भाजून सोललेलं भरताचं वांग करेन..’ असा दम ऐकल्यावर त्या मुलांच्या डोळ्यापुढे, कल्पनेनं त्यांचा पार्श्वभाग दिसायचा आणि ते ‘शांत’ बसायचे. […]
चंदन वृक्षाच्या उपवनात एखादं बाभळीचं झाड़ जरी उगवलं तरी त्या बाभळीच्या झाडाला देखील चंदनाचा गंध येतो .! हाच सहवासाचा परिणाम असतो..! माझ्यासारख्या अगदी सर्वसामान्य व्यक्तीबाबत तेच घडलं !!! हा माझा दैवयोग !! […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions