नवीन लेखन...

मानवी मन…एक ऍबस्ट्रॅक्ट ?

झोपेमध्ये बरेच काही डोळ्यासमोर येते , हल्ली त्याचे प्रमाण वाढले कारण झोपेच्या वेळा बदलल्या , सगळेच बदलले . त्याला मीही अपवाद नाही. झोप कधी लागते आणि कधी अर्थवट पुरी होते हे समजत नाही.तुम्ही कितीही मेडिटेशन करा , योग करा आपल्याला या विचित्र पैंटिंग ला सामोरे जावेच लागते.कुठल्या कुठल्या विचित्र प्रतिमा डोळ्यासमोर येतात काहीच कळत नाही . येतात तशा भुर्रकन उडून जातात , झोप झाल्यावर फ्रेश वगैरे वाटते हा प्रकारचं नाही .

अर्थात जे क्वार्टर वगैरे मारून झोपतात त्याचा अनुभव काय असेल ते माहीत नाही ?

खरे तर आपल्याला बुद्धी दिली हा शापच आहे असे आज वाटत आहे. कारण अनुकरण म्हणा एखादा इम्पॅक्ट इतका जबरदस्त असतो की तो मनाच्या पाठीवर भुतासारखा मानगुटीवर बसतोच बसतो. निगेटिव्हिटी किती जोपासावी , त्याला ही खरेच मर्यादा आहेत , आणि पोझीटीव्हीटी किती आणावी यालाही मर्यादा आहेतच. दरररोज घडणारी प्रत्येक घटना एकाच सांगते तू स्वतः जगायला शिक आता. पण खरेच बुद्धिवादी माणूस जगू शकेल ? एखादा हिपटोनाइज्ड माणूस फक्त एकाच व्यक्तीचे आदेश ऐकतो त्याला बाकी काहीच ऐकायला येत नाही. असे का होते तर मानवी मन आता सम्पुर्णपणे गोंधळले आहे , त्याच्या समोर प्रचंड प्रश्नचिन्ह आहे , आपण ज्या देहात आहोत तो देह कसा जगवावा. अध्यात्मिक राहून की पोथ्या पुराणे वाचून जेव्हा जे होणार ते होणार आहे ते चुकवू शकत नाही हा विचार मनात ठेवून. ?मानवी मन आज प्रचंड हेलकावे खात आहे, ते ज्या शरीरात आहे ते शरीर नश्वर आहे हे त्यालाही माहित आहे , पण इतके की ते शरीर म्हणजे एक ‘ आकडा ‘ व्हावे त्यावर मानवी मन विश्वास ठेवू शकत नाही. कुणी अध्यात्मिक वृत्तीचा माणूस हो म्ह्णून सुटका करून घेईल . पण जो विचार करतो, सतत स्वतःच्या अस्तित्वासाठी प्रयत्न करत असतो तो कदापिही विश्वास ठेवणार नाही.कारण तो स्वतःलाच का ? प्रश्न विचारणारच . एक गोष्ट खरी आहे तो सामान्य माणूस आहे . हे महत्वाचे आहे म्हणून असेलही .आज मानवी मन खालच्या पातळीवर पैसा कमावणारी माणसे बघितली की तो हैराण होते ,हे दिवसभर अनेक माध्यमातून समजतच असते .. कधीकधी प्री प्लँन असते असेही म्हटले जाते , ते काहीही असो परंतु मानवी मन त्याला बळी पडत आहे.हे चागले नाही हे माहीत नाही पण तितकेच आता ते अपरिहार्य बनत चालले आहे हे मात्र नाकारू शकत नाही.यावर एकच उपाय विचारांना , मनातील वादळांना झेलण्याची ताकद ठेवली तरच कणखर बनू , जर तो विचारच नको असे म्ह्णून काढता पाय घेणे किंवा पलायन करणे हे सर्वात घटक आहे कारण अनेकजण आपल्या आतील मनाला झालेली जखम , ती जखम तशीच ठेवली जाते . कुठेतरी आत लपून रहाते , ते टाळण्यासाठी एकच नसगावेसे वाटते हा विचारांचा प्रवाह तसाच वाहू दे ,त्याचा निचरा होणे आता गरजेचे आहे.

मी सध्या ज्या फेज मधून जात आहे त्या फेजमधून अनेकजण जात आहेत हे सोशल मिडिया केव्हा व्हाट्स अप मिडिया मधून जाणवत आहे. सगळ्या वेळा बदललेल्या आहेत . एक गोष्ट , अनुभव सागतो. दोन वर्षाचा मुलगा बाहेर पाडताना जेव्हा मास्कचा आग्रह धरतो तेव्हा त्याच्या मनात एकच गोष्ट असते मास्क हा कपड्याप्रमाणे आवश्यक आहे.हे विचित्र आहे ह्याचे परिणाम पुढे जाणवतील .
हे ऍबस्ट्रॅक्ट असेच फेस करावे लागणार ?

जस्ट याचा विचार करा. नाही तर सोडून द्या .

— सतीश चाफेकर

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..