ललित लेखन
भिक्षापात्र
एक राजा असतो. तो अतिशय दानशूर असतो. एक दिवस त्याच्याकडे एक फकीर येतो. त्याच्या हांतात एक छोटेसे भिक्षापात्र असते. फकीर राजाला म्हणतो “मी खूप दूरुन आलो आहे. हे राजन, तू मला भिक्षा दिलीस तर मला समाधान वाटेल. मी तुझ्या दानशूरपणाबद्दल खूप ऐकले आहे.” […]
बाजीप्रभू देशपांडे
एक भव्य दिव्य व्यक्तिमत्त्व चांद्रसेनिय कायस्थांचा हा ढाण्यावाघ. साऱ्या महाराष्ट्राला वीररत्न बाजीप्रभू देशपांडे या नावाने परिचित असलेलं नाव अत्यंत वजनदार असलेले नाव. […]
सत्यजित रे यांची बायको
चित्रपट जगप्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक सत्यजित रे यांची पत्नी बिजोया रे तिने आपल्या वयाच्या ८४ व्या वर्षी आपल्या आठवणी लिहायला सुरुवात केली. त्या २००३ ते २००४च्या दरम्यान ‘देश’ या बंगाली मासिकातून ३७ भागात क्रमशः प्रकाशित झाल्या. नंतर त्या पुस्तकरूपात बाजारात आल्या. […]
‘बी.दत्ता’ची साडेतीन पीठं
‘तू तिथं मी’ चित्रपटाची स्मिता तळवलकर तयारी करीत होत्या, तेव्हाची ही गोष्ट आहे.. दिग्दर्शक संजय सुरकर यांना रात्री एक वाजता मसाला पान खाण्याची तीव्र इच्छा झाली. आता एवढ्या रात्री पानपट्टी कुठे उघडी असणार? स्मिताताईंनी खुर्चीत बसून पेंगुळलेल्या, एका सडपातळ तरूणाला टू व्हिलरची चावी दिली व संजयची इच्छा पुरी करण्यास फर्मावले… ताे तरूण गेला व तासाभरात मसाला […]
अनुभवाचे बोल
आयुष्यात भेटलेली काही माणसे, अनुभवलेले काही प्रसंग आपल्याला बरेच काही देऊन जातात. त्यातल्या काही माणसांची आणि अनुभवांची एक झलक. […]
चांद्रसेनिय कायस्थ प्रभूंचे भूषण जन. अरुणकुमार वैद्य
राष्ट्रपुरुष कुणा एका जाती वा धर्माचे असू शकत नाहीत. ते देशाचे असतात. भारताचे माजी लष्करप्रमुख जन.अरुणकुमार वैद्य यांच्याबद्दलही असेच म्हणता येईल. तथापी मुंबई येथे २६ जानेवारी १९२६ रोजी चांद्रसेनिय कायस्थ प्रभू घराण्यात त्यांचा जन्म झाल्यामुळे त्यांचा अभिमान सर्व सी.के.पी. समाजास असणे साहाजिकच आहे. […]
मुख्याध्यापकांचे पत्र
सिंगापूरमधल्या एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेतील मुलांच्या पालकांना वार्षिक परीक्षेपूर्वी एक पत्र पाठविले. हे पत्र भारतातल्या सर्व पालकांना उद्देशून आहे असे वाटते. पत्राचा मसुदा थोडक्यात असा होता. प्रिय पालकांनो, तुमच्या मुलांच्या वार्षिक परीक्षा लवकरच सुरु होणार आहेत. तुम्ही सगळे आपापल्या पाल्यांनी उत्कृष्ट मार्क मिळवावेत या विवंचनेत असणार. परंतु मनात ही इच्छा बाळगताना एक गोष्ट विसरु नका. […]
जगातील जुनी योगशाळा – सांताक्रुझची योग इन्स्टिट्युट
सांताक्रुझ मुंबई येथील द योग इंन्स्टिट्युट ही एक फार जुनी योग संस्था आहे. तिच्यामागे सत्त्याण्णव वर्षांची परंपरा आहे. सांताक्रुझ रेल्वे स्थानकाजवळच गर्द झाडीने वेढलेल्या परिसरात या संस्थेची वास्तू उभी आहे. तिची स्थापना १९१८ साली मणी हरिभाई देसाई उर्फ योगेंद्रजी यांनी केली. सुरूवातीच्या काळात ही संस्था वर्सोवा येथील दादाभाई नौरोजी यांच्या द सॅण्डस् या बंगल्यात सुरू झाली. १९४७ साली ती सांताक्रुझ येथील सध्याच्या जागेत स्थलांतरित झाली. […]
OK – वय वर्षे १७५
हा शब्द तुम्ही स्वतः अनेक वेळा उच्चारला असाल आणि असंख्य वेळा इतरेजनांकडून ऐकलेला असाल . कुणी तो OK असा वापरतात तर कुणी Okay असा . या शब्दाला मुद्रित अवस्थेत अवतीर्ण होण्यास आज १७५ वर्षे उलटली आहेत अमेरिकेत प्रकाशित होणाऱ्या ‘ द बोस्टन मॉर्निंग पोस्ट ‘ या दैनिकात OK हा शब्द सर्वप्रथम प्रसिद्ध झाला . […]
