नवीन लेखन...

दैनिक लोकसत्ता

इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्र समूहाने १४ जानेवारी १९४८ रोजी मुंबईहून लोकसत्ता हे दैनिक सुरु केले. त्र्यं. वि. पर्वते हे त्याचे पहिले संपादक होत. त्यानंतर ह. रा. महाजनी संपादक झाले. त्यांची कारकीर्द लक्षणीय ठरली. अष्टपैलू लेखणी आणि संपादकीय कौशल्य यांच्या साहाय्याने त्यांनी लोकसत्ता लोकप्रिय केले. महाजनी यांच्या नंतर र. ना. लाटे, विद्याधर गोखले आणि माधव गडकरी, कुमार […]

रेल्वे प्रवास करताना हे कराच…

उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या भीषण रेल्वे अपघातात समोर आलेली एक माहिती धक्कादायक आहे. अपघात झालेल्या गाडीत ६९८ व्यक्तींचे रिझर्वेशन होते. आरक्षित व्यक्तींपैकी फक्त १२८ जणांनी विम्याचा पर्याय निवडला. ऑनलाइन रिझर्वेशन केल्यास रेल्वे प्रवाशाला फक्त एका रुपयात (92 पैसे) १० लाखाचा विमा मिळतो. यासाठी रिझर्वेशन करताना फक्त संमतीची खूण करायची असते. हा विमा घेतल्यास अपघातात प्रवाशाचा मृत्यू […]

६ जानेवारी – पत्रकार दिन

मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले त्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची आठवण म्हणून ६ जानेवारी हा दिवस “पत्रकार दिन” म्हणून साजरा केला जातो. सुधारकांच्या पहिल्या पिढीने पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करुन नवी जीवनमूल्ये वृत्तपत्र माध्यमाव्दारे रुजविली. त्या परंपरेचा पाया बाळशास्त्री जांभेकरांनी घातला. बंगालमध्ये राजाराम मोहन रॉय यांनी सुधारणांचे नवयुग आरंभिले तेच कार्य बाळशास्त्री […]

तिथी आणि तारखेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक

तिथी आणि तारखेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक काय आहे माहितीये? तुम्हाला जर आज उचलून कुणी एखाद्या निर्जन बेटावर नेऊन सोडले तर तारीख फार फार तर महिनाभर लक्षात राहील तुमच्या. त्यातही एखादाच जरी दिवस चुकला तरीही पुढचं सगळंच चुकणार, हे निश्चित. पण तिथीचं तसं नाही. तुम्ही एखाद्या निर्जन बेटावर असलात तर महिनाभराने कदाचित तिथीही विसरुन जाल. पण जर […]

देशभरात अत्यावश्यक सेवांसाठी ११२ हा एकमेव नंबर

देशभरात अत्यावश्यक सेवांसाठी असलेला ११२ हा एकमेव नंबर नव्या वर्षात कार्यान्वित झालाय. पोलीस, अॅम्ब्युलन्स, अग्निशमन दल या सगळ्या सेवांसाठी ११२ हा एकमेव इमरजन्सी नंबर असेल. पोलिसांसाठी १००, अग्निशमन दलासाठी १००, ऍम्ब्युलन्ससाठी १०२ आणि आपत्कालीन संकटासाठी १०८ हे क्रमांक होते. मात्र आता एवढे नंबर लक्षात ठेवण्याची गरज नाही. केवळ ११२ हा नंबर डायल केल्यास या सगळ्या अत्यावश्यक सेवा उपलब्ध होणार आहेत. ट्रायने […]

कॅशलेस संस्कृती स्वीकारलेला स्वीडन

स्वीडनमध्ये २२ एप्रिल २०१३ रोजी घडलेली एक गंमतीदार घटना सांगायला हवी. यादिवशी, सकाळी साडेदहाच्या सुमारास स्कँडिनव्हिस्का एन्सकील्डा बँकेच्या स्टॉकहोम परिसरातल्या एका शाखेत एक दरोडेखोर शिरला. त्याने हातातले पिस्तूलवजा हत्यार उंचावले आणि बँक कर्मचाऱ्यांना रक्कम देण्यासाठी धमकावले, पण स्वीडनमधील ती बँक शाखा पूर्णपणे कॅशलेस असल्याने तिथे लुटायला एक छदामही नव्हता. हे जेव्हा त्या दरोडेखोराला बँक अधिकाऱ्यांनी सांगितले, […]

आज ५ सप्टेंबर – शिक्षक दिन

`गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।` आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस… हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते व प्रथम ते शिक्षक होते. ते ‘नीतिशास्त्र’ या विषयाचे प्राध्यापक होते. शिक्षक हा समाजाचा निर्माण कर्ता आहे. छोट्या बालकाचे देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून […]

शब्दनाद – मुलगा, चिरंजीव, Son..

मुलगा. वंशाचा दिवा, कुलदिपक, संपत्तीचा वारस..काय काय नांवाने याला पुकारलं जात. भारतात कुठेही गेलात तरी ‘मुलगा’ हा शब्द अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला आपल्याला आढळेल ( केरळ व महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हे सन्माननीय अपवाद! इथे मुलग्यांची क्रेझ नाही) महाराष्ट्रापुरते बोलायचं झालं तर ‘मुलगा’ हा शब्द अगदी अस्सल मराठी मातीतला वाटतो. पण मित्रांनो, अस्सल मराठमोळा वाटणारा हा शब्द मुळचा […]

शब्दनाद – चिकू मारवाडी

‘मारवाडी’ या शब्दाचं ‘चिकूशी’ घनिष्ट मेतकूट असल्याचं आपण लहानपणापासून ऐकत आलोय. प्रत्यक्षात आपला संबंध घोलवडच्या खाण्याच्या चिकूशीच जास्तं येत असल्याने, राजस्थानातील मारवाड्याशी त्याचा काय संबंध, असा प्रश्न कधीना-कधी आपल्याला पडतोच. ‘मारवाड्या’चा अविभाज्य भाग असलेल्या ‘चिकू’चा आपण समजतो तसा खाण्याच्या चिकू नामक फळाशी काहीही संबंध नाही हे थोऽऽडा विचार केला तर लक्षात येतं. मारवाड्याचा संबंध कंजूसपणाशी येतो […]

‘शब्दनाद’ – बारसं..

अपत्याचं नांव ठेवण्याचा विधी. अपत्य जन्मानंतर जनरली १२ व्या दिवशी हा विधी पार पाडला जातो. आपल्यापैकी बर्‍याच जणांना हा विधी ‘बाराव्या’ दिवशी करतात म्हणून त्याला ‘बारसं’ म्हणतात असे वाटते. मलाही असच वाटायचं पण नंतर शब्दांचा अभ्यास करताना अनेक गोष्टी कळत गेल्या त्यापैकी एक ‘बारसं’ हा शब्द आहे. ‘जे जे आपणांसी ठावे, ते ते जनांसी सांगावे..’ या […]

1 9 10 11 12 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..