नवीन लेखन...

आज ५ सप्टेंबर – शिक्षक दिन

5 September - Shikshak Din

`गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।

गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।`

आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस… हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते व प्रथम ते शिक्षक होते. ते ‘नीतिशास्त्र’ या विषयाचे प्राध्यापक होते.

शिक्षक हा समाजाचा निर्माण कर्ता आहे. छोट्या बालकाचे देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्तन करण्याचे कार्य शिक्षकाला कारायचे असते. शिक्षकांना वैदिक काळापासूनच गुरूचे स्थान आहे. त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. आज शिक्षणाचे अवमुल्यन केला जात असल्याचे चित्र समाजात दिवस आहे. तसेच गुरू-शिष्य संबंधांमधील पवित्र भावना लोप पावत आहे. या संबंधामधील पावित्र्य कायम ठेवण्‍यासाठी व डॉ. राधाकृष्णन् यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो.शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोर्‍या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात. आपल्या आई-वडीलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात. शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवित नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो.आपल्या व्यक्तीमत्त्वावर त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती व आदर असे पैलू पाडले जात असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी‍ आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. त्यांच्याविषयी शिक्षक दिनी कृतज्ञता व्यक्त करून त्याचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

शिक्षकांच्या भूमिकेचं महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यांच्या जागरुकतेसाठी हा दिवस साजरा केला जातो.

To my teacher…

“Teachers are often the people who inspire us the most. I know I wouldn’t be where I am today without my fourth grade teacher, Mrs. Duncan. She so believed in me, and for the first time, made me embrace the idea of learning. I learned to love learning because of Mrs. Duncan.”

– Oprah Winfrey.

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4227 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on आज ५ सप्टेंबर – शिक्षक दिन

  1. नमस्कार.
    – हिंदीत एक सुप्रसिद्ध दोहा आहे –
    गुरु गोबिन्द दोऊ खड़े , काके लागूँ पायँ ।
    बलिहारी गुरु आपकी , गोबिन्द दियो बताय ।
    – तुम्ही दिलेला संस्क-त श्लोक महत्वाचा आहेच, पण हा हिंदी दोहाही महत्वपूर्ण आहे.
    – पण आतां तर, गुरू व शिष्य , दोघेही commercial झालेले आहेत. कालाय तस्मै नम: .
    सस्नेह,
    सुभाष स. नाईक

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..