नवीन लेखन...

सर्वसाधारणपणे अमेरिकेत, किंवा एकूणच परदेशात जाऊन आलेली मंडळी तिकडच्या शहरांविषयीच बोलतात, लिहितात. प्रवासवर्णनेही शहरकेंद्रित असतात. कदाचित पर्यटक म्हणून गेल्यावर शहरातच फिरणे जास्त होत असेल किंवा गावांमध्ये काय बघायचे अशी भावना असेल. या पुस्तकाचं वेगळेपण इथेच आहे.

अमेरिकेत दहा वर्षाहून जास्त काळ ग्रामीण भागात वास्तव्य करणार्‍या डॉ.संजीव चौबळ यांनी तिथल्या ग्रामीण जीवनाचं सुंदरसं चित्र आपल्यासमोर उभं केलेलं आहे.

गावाकडची अमेरिका – पार्श्वभूमी – ३

माझा जन्म मुंबईचा. आयुष्याची साधारण ३० वर्षं मुंबईत काढलेला मी एक अस्सल मुंबईकर आहे. आई वडिलांच्या दोघांच्याही बाजूने वकीली आणि शिक्षकी हे दोन महत्वाचे पेशे. दोन्ही बाजूंच्या कुटुंबांमधे काहीजण डॉक्टर्स किंवा इंजिनिअर्स, बरेचसे पोस्टग्रॅज्युएट्स आणि काहीजण Ph.D. त्यामुळे घरातलं वातावरण शिक्षणाला सर्वस्व मानणारं. बहुतेक सारेजण मुंबई, पुण्यात स्थिरावलेले. त्यामुळे या सार्‍या शहरी वातावरणात, गावरान वारा लागण्याचं […]

गावाकडची अमेरिका – पार्श्वभूमी – २

तसं बघायला गेलं तर भारत हा प्रगतीशील देश तर अमेरिका म्हणजे अतिप्रगत देश. आपल्याकडे ग्रामीण भागातून शहराकडे वळणारा ओघ हा तसा गेल्या काही दशकांतला. आपली शहरी लोकसंख्या ही एकूण लोकसंख्येच्या २८%, तर अमेरिकेतली शहरी लोकसंख्या ही एकूण लोकसंख्येच्या तब्बल ८२%. थोडक्यात म्हणजे अमेरिका हा एक बहुतांशी शहरी / नागरी लोकवस्तीचा देश आहे. पण जसं मुंबई, पुणे, […]

गावाकडची अमेरिका – पार्श्वभूमी – १

भारतीयांना, निदान मध्यमवर्गीय, उच्चविद्याविभूषित भारतीयांना आता अमेरिका काही नवीन राहिलेली नाही. आज अमेरिकेत राहणार्‍या भारतीयांची संख्या सुमारे २७.७ लाख आहे. एकूण अमेरिकन लोकसंख्येच्या जरी ही केवळ ०.९% असली, तरी ह्या वाढीचा वेग लक्षणीय आहे. सन २००० मधे अमेरिकेतील भारतीयांची संख्या सुमारे १७ लाख होती, आणि केवळ पाच वर्षांत, सन २००५ मधे ती २३ लाखांच्या पुढे गेली […]

गावाकडची अमेरिका – लेखकाचे मनोगत

प्रांजळपणे सांगायचे तर मी कधी काळी मराठीत पुस्तक लिहीन असे वाटले नव्हते. शालेय शिक्षण सारे मराठी माध्यमातून झाले होते खरे पण मराठीत लिहिण्याचा संबंध दहावीनंतर (१९७७ साली) कायमचाच संपला होता. पूर्वी मराठी वाचन खूप केले होते, परंतु गेली दहा वर्षे अमेरिकेतल्या वास्तव्यामुळे ते अगदीच आटून गेले होते. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर जवळ जवळ ३०-३२ वर्षांनी मराठीत पुन्हा […]

“गावाकडची अमेरिका”च्या निमित्ताने……

“क्रमश:” या नव्या सदराद्वारे काही मराठी पुस्तके “मराठीसृष्टी”द्वारे वाचकांपर्यंत पोचवण्याच्या या प्रयत्नातील हे पहिले पुस्तक….. “गावाकडची अमेरिका”. आतापर्यंतच्या “मराठीसृष्टी”च्या अनेक उपक्रमांना प्रतिसाद आणि दाद देणार्‍या आमच्या वाचकांना हा प्रयत्न नक्कीच आवडेल… “मराठीसृष्टी”च्या माध्यमातून “गावाकडची अमेरिका” हे एका अत्यंत वेगळ्या विषयावरील पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाचे इ-बुक सुद्धा प्रकाशित केले. हे पुस्तक आता वेबसाईटवर “क्रमश:” च्या […]

गावाकडची अमेरिका – अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे चित्रण

सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण भागात गेली १२ वर्षे वास्तव्याला असलेल्या डॉ. संजीव चौबळ यांनी केलेले अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण. अमेरिकेतील मोठमोठ्या शहरांमध्ये रहाणार्‍या बहुतांश मराठी लोकांनीही ग्रामीण अमेरिकेचा हा पैलू अनुभवलेला नाही. भारतात राहून अमेरिकेची झगझगीत आणि भव्यदिव्य कल्पनाचित्रे रेखाटणार्‍या मंडळींना हे पुस्तक वाचून वास्तवाचे नक्कीच भान येईल. […]

1 7 8 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..