नवीन लेखन...

सर्वसाधारणपणे अमेरिकेत, किंवा एकूणच परदेशात जाऊन आलेली मंडळी तिकडच्या शहरांविषयीच बोलतात, लिहितात. प्रवासवर्णनेही शहरकेंद्रित असतात. कदाचित पर्यटक म्हणून गेल्यावर शहरातच फिरणे जास्त होत असेल किंवा गावांमध्ये काय बघायचे अशी भावना असेल. या पुस्तकाचं वेगळेपण इथेच आहे.

अमेरिकेत दहा वर्षाहून जास्त काळ ग्रामीण भागात वास्तव्य करणार्‍या डॉ.संजीव चौबळ यांनी तिथल्या ग्रामीण जीवनाचं सुंदरसं चित्र आपल्यासमोर उभं केलेलं आहे.

अमेरिकेतील वन्यप्राणी जीवन – भाग ८

अमेरिकेतल्या अस्वलांमधे ग्रीझली बेअर्स आणि ब्लॅक बेअर्स हे दोन प्रकार. ग्रीझली अस्वलं कॅनडामधे आणि अमेरिकेच्या वायव्येकडच्या राज्यांमधे प्रामुख्याने आढळतात. कॅनडा आणि अमेरिकेमधली सीमा रेषा ही उघडीच असल्यामुळे या सीमेलगतच्या भागात ग्रीझलीज मोकळेपणाने दोन्ही देशांमधे ये जा करत असतात. एकंदर ग्रीझलीजची संख्या सुमारे ६०,००० असावी असा अंदाज आहे. त्यांतील बहुतेक कॅनडातच आहेत तर अमेरिकेच्या वायोमींग, मॉंटेना, आयडॅहो, […]

अमेरिकेतील वन्यप्राणी जीवन – भाग ७

अमेरिकेतला कायोटी हा एक रानटी कुत्र्याच्या जातकुळीतला प्राणी आहे. त्याला प्रेअरी वुल्फ असे देखील नांव आहे. अफ्रिकेतले वाईल्ड डॉग्ज (जंगली कुत्रे) किंवा पूर्वी आपल्या महाराष्ट्रात आढळणारे कोळ्सुंदे, हे अशाच रानटी कुत्र्याच्या जातकुळीतले प्राणी. कायोटी हा उत्तर आणि मध्य अमेरिकेत सर्वत्र आढळतो. ग्रे वुल्फ हा युरोपीयन – रशियन वंशाचा आहे; तर कायोटी हा पूर्णपणे अमेरिकेतच उगम पावलेला […]

अमेरिकेतील वन्यप्राणी जीवन – भाग ६

अमेरिकेतल्या मध्यवर्ती प्रदेशाच्या अफाट गवताळ कुरणांवर एकेकाळी ज्यांचं अक्षरश: साम्राज्य होतं ते म्हणजे बायसन. खांद्यापाशी ६-६॥ फूट उंचीची आणि जवळ जवळ १ टन (१००० किलो) वजनाची ही प्रचंड धुडं, लाखोंच्या संख्येने कळपा कळपाने फिरायची. यांचं डोकं आणि खांदे खूपच अवाढव्य असतात तर त्यामानाने पुठ्ठ्याचा भाग साधारण असतो. नर आणि मादी दोघांनाही आखूड वळलेली शिंग असतात. ऑगस्ट […]

अमेरिकेतील वन्यप्राणी जीवन – भाग ५

शिकारीचा सीझन आला की शिकार्‍यांच्या अंगात संचारतं. जवळ जवळ प्रत्येक घरी बंदुक ही असायचीच. मग तिची घासून पुसून साफसफाई करणं, काडतुसांची जमवाजमव करणं, शिकारीचं लायसन्स नव्याने करून घेणं, वगैरे गोष्टींची नुसती धांदल उडते. इथे बंदुका तर काय वॉलमार्टमधे देखील मिळतात. त्यामुळे कोणत्या प्रकारची बंदुक, कोणती काडतुसं, त्यांचा पल्ला, वगैरे गोष्टींची चर्चा कानावर यायला लागते. काही ठिकाणी […]

अमेरिकेतील वन्यप्राणी जीवन – भाग ४

अमेरिकेतल्या आमच्या ग्रामीण/निमग्रामीण भागातल्या वास्तव्यात आणि पाळीव/वन्य प्राण्यांच्या सहवासात मला अनेकदा कुमाऊंच्या जीम कॉर्बेटची किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या भानु शिरधनकर, मारूती चितमपल्ली किंवा व्यंकटेश माडगुळकरांच्या वन्यप्राणी जीवनावरील लिखाणाची आठवण यायची. वाटायचं, एखादा शेतकरी अंगणात येऊन सांगू लागेल, “दादानु, डुकरांनी लई वात आणलाय. उसाची लई नासाडी चालवलीय पघा. सांजच्याला बांधावर बसुया बंदुक घेऊन. एखादा डुक्कर मारलात तर पोरं […]

अमेरिकेतील वन्यप्राणी जीवन – भाग ३

एकोणिसावं शतक सुरू झालं त्यासुमारास अमेरिकेचे स्थूल मानाने तीन विभाग होते. एक म्हणजे पूर्व किनारपट्टी, जी पूर्णपणे प्रस्थापित आणि बहुतांशी सुरक्षित होती, दुसरा म्हणजे ऍपेलेशियन पर्वतराजीपासून पश्चिमेला मिसीसीपी नदीपर्यंतचा प्रदेश, जो गेल्या शे – सव्वाशे वर्षांतल्या धाडसी लोकांच्या मोहीमांमुळे परिचित होऊ लागला होता आणि तिसरा म्हणजे मिसीसीपीच्या पलीकडचा प्रचंड मोठा असा (गोर्‍या लोकांना) पूर्णपणे अनभिज्ञ असा […]

अमेरिकेतील वन्यप्राणी जीवन – भाग २

ऍपेलेशियन पर्वतराजीची नैसर्गिक हिरवी भिंत अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीला पलीकडे पसरलेल्या जंगल, दर्‍या आणि माळरानांपासून वेगळं करते. सुरवातीला अटलांटिक महासागर ओलांडून येणार्‍या निर्वासितांनी अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर आपल्या वसाहती स्थापन केल्या. ऍपेलेशियन पर्वतराजीची नैसर्गिक सीमारेषा हीच सुरवातीच्या वसाहतीसाठी विस्ताराची लक्ष्मणरेषा होती. परंतु या अगदी सुरवातीच्या काळापासूनच काही अस्वस्थ, धडपड्या, साहसी लोकांना या नैसर्गिक सीमेच्या आत स्वत:ला बंदिस्त करून […]

अमेरिकेतील वन्यप्राणी जीवन – भाग १

ग्रामीण, निमग्रामीण भागातल्या लोकांचा आणि निसर्गाचा जवळचा संबंध असावा यात काही नवल नाही. या निसर्गाच्या सान्निध्यातूनच पाळीव तसंच वन्य पशु-पक्षी जगत हे या जीवनाचं एक महत्वाचा घटक बनून गेलेले असतं. कृषीउद्योग आणि पशु संवर्धन हे एकमेकांशी निगडीत असल्यामुळे, ग्रामीण जगतामधे पशु संवर्धनाला मानाचं स्थान असावं हे उघडच आहे. परंतु एकंदरीतच अमेरिकन जीवन प्रणालीमधे निसर्गाला आणि त्या […]

अमेरिकेतील कंट्री म्युझिक – भाग ६

केवळ मराठीचा विचार करायचा झाला तर आपल्या तुकोबांची गाथा, ज्ञानेश्वर – नामदेवांचे अभंग, जनाबाईंच्या ओव्या, भीमसेन जोशी, आशा भोसले, अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात ऐकणे म्हणजे भक्ती रसात पूर्णपणे बुडून जाणे. पण हे भक्ती संगीत जेव्हा खर्‍या अर्थाने लोकसंगीत होतं तेव्हा त्याचा जनमानसावरचा प्रभाव समजून येतो. मग ते गावातल्या देवळातले कीर्तन असो, दमल्या भागल्या कष्टकर्‍यांचा संध्याकाळचा भजनाचा […]

अमेरिकेतील कंट्री म्युझिक – भाग ५

आपल्या शेताचं कौतुक, आपल्या ट्रॅक्टरचं कौतुक, आपल्या जुन्या मोडक्या गंजलेल्या पिकअप ट्रकचं कौतुक, हे सगळं ऐकलं की अगदी आपल्याकडच्या जुन्या गाण्यांची आठवण होते. त्यात इथे गाण्याचे व्हिडिओज असतात. टी.व्ही.वर कंट्री म्युझिकचा स्वतंत्र चॅनल असतो. त्यामुळे त्याच्यावर लोकप्रिय गाण्यांचे व्हिडिओज पाहिले की गाण्यातल्या शब्दांना वेगळाच अर्थ येतो. त्यातली शेतं, माळरानं, छोटी गावं, गावातले लोक पाहिले, की हे […]

1 2 3 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..