नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

००७ जेम्स बॉन्डला सर्वप्रथम पडद्यावर आणणारा….

तुम्हा सर्वानाच जेम्स बॉन्ड साकारणारे सर्वच अभिनेते माहित आहेत. मात्र “शॉन टेरेन्स यंग‘’ हे नाव कदाचित आठवणार नाही. यंग हा सुरूवातीच्या तिनही बॉन्डपटाचा दिग्दर्शक होता. डॉ. नो(१९६२), फ्राम रशिया विथ लव्ह (१९६३ ) आणि थडंर बॉल(१९६५) हे तिनही बॉन्डपट तुफान गाजले. […]

पुराणपुरुष

जंगलातल्या मोकळ्या माळावर चरणांरा ‘रानगवा’ एवढ्या बेफिकिरीत वावरत असतो, की तो जणु काही त्या परिसराचा अनभिषिक्त सम्राटच आहे. त्याची ताकदच तशी प्रचंड असते. शरिराचा विलक्षण सुंदर घाट आणि पिळदार स्नायू यामुळे तो दिसतोही उत्तम शरीर कमावलेल्या पैलवानासारखा. व्यायामानं जसं पैलवानाचं शरीर चमकत असतं तशीच त्याची त्वचाही चमकत असते. त्याचं ते ‘बेरड’ रूपंच सगळ्या जंगलविश्वाला टरकावत असतं. […]

फॉरेन एक्सचेंज

गेल्या दोनचार दिवसांत बातमी वाचली की, रुपयाचा फॉरेन एक्सचेंज रेट, ७१.९९ म्हणजे , जवळजवळ ७२ झाला आहे . म्हणजेच, एका डॉलरच्या बदल्यात आपल्याला ७२ रुपये मिळतात . किंवा असंही म्हणतां येईल की एक डॉलर हवा असेल तर आपल्याला ७२ रुपये खर्च करावे लागतात. (Wow ! आपल्या सगळ्यांनाच अगदी धन्य धन्य वाटायला हवं ! ) […]

श्री. रामचंद्र शिवाजी कदम उर्फ राम कदम; व्यक्ती नव्हे, प्रवृत्ती..

श्री. रामचंद्र शिवाजी कदम हे भारदस्त आणि भारतीय समाजाच्या संस्कारांचे पुतळे समजल्या जाणाऱ्या थोरांचं नांव आपल्या नांवात गुंफलेल्या महाशयांना आपण सांप्रत राम कदम या नांवाने ओळखतो. ‘नांवात काय आहे’ असं शेक्सपियर म्हणाला होता, याची या क्षणाला आठवण होते. प्रभु रामचंद्र हे स्वत:चं नांव आणि वडिलांचं नांव छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करुन देणारं, याचं भान राम कदमांनी सोडलं व नांव काहीही असलं तरी त्यांची मूळ प्रवृत्ती रावण आणि मोगलांचीच आहे, याची त्यांनी पुन्हा एकदा प्रचिती दिली. […]

पोलिस दलाच्या सक्षमीकरणाकरता काही उपाययोजना

येत्या २०१८ – २०१९ मध्ये अनेक निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभुमीवर या हिंसांचे, आंदोलनांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या हिंसाचाराला रोखून सामान्य माणसाचे रक्षण केले पाहिजे. राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय पोलिस दलाच्या कार्यपद्धतीत सुधारणा होणे शक्य नाही. […]

पार्सल संस्कृती

वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे असे श्र्लोक म्हणत घरातील सर्वांनी एकत्र बसून जेवण्याची आपली भारतीय संस्कृती कधी काळी होती असे म्हणण्याची आता वेळ आलेली आहे असे म्हणले तर फारसे वावगे होणार नाही. पण या पार्सल संस्कृतीला नावे ठेवण्यापेक्षा ती आता बहुतेक शहरात एक आवश्यक बाब बनली आहे हे तितकेच खरे आहे. व आपण सर्वांनीच ती […]

भाषेची शुद्धाशुद्धता : एक चर्चा

२० ऑगस्ट २०१८ च्या ‘लोकसत्ता ( पुणें आवृत्ती)मधील बातमीद्वारें सई परांजपे यांचें भाषेबद्दलचें मत वाचलें ; तसेंच २१ऑगस्टच्या लोकसत्तातील ‘लोकमानस’मध्ये या विषयावरील विनित मासावकर व श्रीनिवास जोशी यांची मतेंही वाचनांत आली. ( एक स्पष्टीकरण : सई परांजपे यांची चर्चात्मक मुलाखात मी प्रत्यक्ष पाहिलेली-ऐकलेली नाहीं. त्याबद्दल ‘लोकसत्ता’मध्ये आलेल्या बातमीचाच संदर्भ मी येथें देऊं शकतो). सई परांजपे यांच्याबद्दल […]

हिंसक आंदोलनात सुरक्षा सामान्य माणसांची

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात आणि एकूण देशात हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. या हिंसाचारात सर्वाधिक बळी जातात ते सामान्य माणसांचे. स्त्रिया, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक जे हिंसाचार घडत असलेल्या ठिकाणी अडकतात आणि ते मारहाण, जाळपोळ याला बळी पडतात. कामाकरिता बाहेर पडलेल्या लोकांना अचानक उसळलेल्या हिंसाचाराला बळी पडावे लागते. […]

स्वर्गीय अटलजी

मी भाग्यशाली होतो, १९९७ मध्ये प्रधानमंत्री कार्यालयात पोस्टिंग झाली. अटलजी प्रधानमंत्री झाले आणि […]

1 208 209 210 211 212 241
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..