पार्सल संस्कृती

वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे असे श्र्लोक म्हणत घरातील सर्वांनी एकत्र बसून जेवण्याची आपली भारतीय संस्कृती कधी काळी होती असे म्हणण्याची आता वेळ आलेली आहे असे म्हणले तर फारसे वावगे होणार नाही. पण या पार्सल संस्कृतीला नावे ठेवण्यापेक्षा ती आता बहुतेक शहरात एक आवश्यक बाब बनली आहे हे तितकेच खरे आहे. व आपण सर्वांनीच ती बाब मान्य केली पाहिजे. पुर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. मुले व घरातील कर्ती व्यक्ती १० वाजता जेवायला बसत. नंतर मुले शाळेत व वडील नोकरी व्यवसाय करणेसाठी बाहेर पडत. सायंकाळी ५.३० नंतर मुले शाळेतून घरी येत असत. नोकरीतील व्यक्ती सुध्दा बहुधा ६.०० ते ६.३० पर्यंत घरी येत असे. त्यानंतर रात्रीचे जेवण बहुधा ८.३० चे सुमारास सर्व एकत्र घेत.

पुढे काळ बदलला. एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू कमी होत गेली. नोकरीच्या शाळेच्या वेळा बदलत गेल्या. सातारा, सांगली, सारख्या लहान गावांतील तरुण नोकरीसाठी पुणे, मुंबई, बंगलोर, हैदराबाद अशा मोठ्या शहरात स्थलांतरीत झाले. बहुतांशी पती-पत्नी दोघेही नोकरी करणारे. कामाच्या वेळा वेगवेगळ्या त्यामुळे घरी एकत्रीत स्वयंपाक व एकत्र जेवण ही बाब दुर्मीळ होत गेली. संध्याकाळी ( रात्री म्हणणे जास्त संयुक्तिक होईल कारण घरी यायला ८.३० ते ९.०० वाजून जातात ) घरी आल्यावर स्वयंपाक करणं कठीण बनले. आणी मग इथेच पार्सल संस्कृतीचा उदय झाला. संध्याकाळी अॉफीसमधून घरी येताना जेवणाचे पार्सल घेऊन येणे व घरी आल्यावर जेवण करणे हा एक रुटीनचा भाग बनला. काही वेळा अॉफीस ते घर या वाटेवर जर हॉटेल नसेल तर अडचणी येऊ लागल्या व त्यासाठी मग अॉन लाईन बुकींग ही पुढची पायरी आली. अॉफीस मधून बाहेर पडताना अॉर्डर द्यायची घरी येईपर्यंत जेवण घरपोच अशी व्यवस्था सुरु झाली. जी आता बऱ्यापैकी रुजू लागली आहे.

हा झाला एक नोकरी करणाऱ्यांसाठी मोठ्या शहरातील विषय. लहान शहरात व महानगरात सुध्दा जेष्ठ नागरिक मुले दूर गेल्यामुळे एकटे किंवा पती-पत्नी दोघेही रहात असतात.वयोमाना नुसार आता त्यांना किराणा सामान भाजीपाला आणणे हा व्याप होत नाही. तसेच किती आणायचे व किती करायचे हाही एक प्रश्नच असतो. मग त्यांच्यासाठी म्हणून अशा लहान गावात सुध्दा काही हॉटेल व्यावसायिकांनी तसेच काही ठिकाणी घरगुती स्वरुपात घरपोच डबा देणे सुरू केले. फोन करून काय पाहिजे ते सांगीतले की आपल्या वेळेला जेवण हजर.

यावितीरिक्त आजारी व हॉस्पिटल मध्ये दाखल पेशंटच्या नातेवाईकांना जेवण पोहोच करणेसाठी ही पार्सल पध्दती उपयुक्त असल्याने त्यासाठी सुध्दा ही आवश्यकता बाब आहेच.

त्यामुळे एकंदरीत विचार करता कोणी काही म्हणले तरी पार्सल संस्कृती ही आता आपल्या जिवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहे व ती आपण टाळू शकत नाही. उलट मी तर म्हणेन ती आता आपली गरज झाली आहे व काळाची गरज आहे त्यामुळे तिचे स्वागतच करायला हवे.

— सुरेश काळे
सातारा
मो.९८६०३०७७५२
दिनांक. ३१ अॉगस्ट २०१८

सुरेश गोपाळ काळे
About सुरेश गोपाळ काळे 48 Articles
मी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे "शब्दसूर" हा काव्यसंग्रह प्रकाशित.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…