नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

हॅलोविन डे

दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या ३१ तारखेला अनेक देशांमध्ये `हॅलोविन डे’ साजरा केला जातो. आपल्या भारतात मात्र फारच कमी ठिकाणी हॅलोविन साजरा केला जातो. मुख्य म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हॅलोविन सारखी कोणतीही प्रथा सांगितलेली नाही.
[…]

माल्टा

पुन्हा एकदा एमीरेट्सच्या विमानाने मुंबई एअरपोर्ट वरून टेकऑफ घेतला होता. दुबई वरून माल्टा या भूमध्य समुद्रात असणाऱ्या बेटावरील बंदरात जहाज जॉईन करायचे होते. चेक इन काउंटर वर दोन्ही फ्लाईट करिता नेहमी प्रमाणे विंडो सीट साठी रिक्वेस्ट केली. मुंबई दुबई प्रवासात विंडो सीट मिळाली नाही पण दुबई ते माल्टा या प्रवासात विंडो सीट मिळाली. मागील वेळेस जहाज […]

अधोरेखित दीपावली २०१९…

‘शोध सर्जनप्रेरणांचा’ हा या वर्षी अंकाचा विषय असून त्याद्वारे दिवंगत तसेच ज्येष्ठ साहित्यिकांच्या निर्मितिप्रक्रियेचा शोध पुढची लिहिती पिढी घेत आहे. समकालात वेधक, वेचक आणि आशययुक्त लिहून आपला स्वतंत्र ठसा उमटवणार्‍या काही लेखक, कवींना हा लेखन वारसा आपल्या साहित्यिक आई अथवा वडिलांच्या रूपाने घरातूनच थेटपणे लाभला. अगदी हाच धागा पकडत ‘अधोरेखित’च्या या अंकात लेखिका, संपादिका मोनिका गजेंद्रगडकरांचा […]

ढोरं उडवणे – विस्मृतीतील संस्कृती

आमच्या ठाणे जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात बळीप्रतिपदेला भाताची मळणी झाल्यावर भाताच्या पेंड्याला गावातल्या चावडीवर असलेल्या मुख्य रस्त्यावर पेटवण्यात येते. हा पेंडा पेटवल्यानंतर त्यातून निघणाऱ्या धुरातून व आगीच्या ज्वालांमधून गावात असणारी सगळी गुरे ढोरे एका बाजूकडून दुसरीकडे नेली जातात. पूर्वापार परंपरेनुसार चालत आलेली ही प्रथा आजही गावोगावी त्याच उत्साहात सुरू आहे. […]

कोण होणार मुख्यमंत्री?

या विधानसभा निवडणुकीने विरोधकांच्याच नव्हे तर सत्ताधार्‍यांच्या ही डोळ्यात अंजन घातले आहे. तुम्ही जनतेला गृहीत धरून त्यांच्या प्रश्नांची हेळसांड करणार असाल तर जनता तुम्हाला घरी बसू शकते, हा संदेश जनतेने मतपेटीतून दिलाय. त्यातील मतितार्थ राजकारण्यांनी समजून घेतला पाहिजे. […]

पाकिस्तान अस्थिरतेकडुन अस्थिरतेकडे

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदुंवर अत्याचार केले जात आहेत. इम्रान खान यांच्या पक्षातील एक माजी आमदार बलदेव कुमार यांनी भारतात आश्रय मागितला आहे. भारताने बलुचिस्तान, सिंध, पश्तून आणि आझाद काश्मीर प्रांतातिल मानवधिकाराचा मुद्दा सातत्याने आंतरराष्ट्रिय स्तरावर उठवत राहावा.त्यांना नैतिक/मानसिक समर्थन देत राहावे. आता पाकव्याप्त काश्‍मीरवरूनही भारताला आक्रमक धोरण अवलंबावे लागेल. पाकिस्तान दहशतवादाला कशा रितीने पोसतो, हे सगळ्यांना कळले पाहिजे. माहिती युध्दाचा वापर करुन हा चेहरा जगासमोर येणे काळाची गरज आहे. […]

स्मोक रूम

एका जहाजावर एक खलाशी ट्रेनी म्हणून पहिल्यांदाच आला होता. त्याने सोबत देवाची फोटो फ्रेम आणली होती. संध्याकाळी आंघोळ वगैरे आटोपल्यावर त्याने भक्तिभावाने देवपूजा करताना घरून आणलेली अगरबत्ती पेटवली आणि त्याला काही समजायच्या आत काही क्षणातच फायर अलार्म वाजला. टँव टँव करत कानठळ्या बसवणारा फायर अलार्म वाजला रे वाजला की सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो. पहिला दिवस असल्याने […]

फिश टँक

जहाजावर नोकरी करावी लागेल हे माहीत नसताना म्हणजे सुमारे 15 वर्षांपूर्वी आमच्या जुन्या घरात मोठा फिश टँक बसवला होता. आता दोन वर्षांपूर्वी नवीन घर बांधताना अजून मोठा फिश टँक घरात बसवून घेतला. फिश टँक मध्ये रंगीबेरंगी आणि वेगवेगळ्या आकारांचे सुंदर सुंदर मासे आणि त्यांची शांत व संथ हालचाल पाहून आपल्यालाच शांत शांत वाटू लागतं. फिश टँक […]

माझे ‘शब्दालय’

माणसाच्या घरात किती फर्निचर आहे , किती भारी सजावट आहे हे नेहमी बघितले जाते. माझे घर ज्यामध्ये मी राहतो तेथील सर्वात आवडती जागा कोणती असा प्रश्न कोणी मला विचारला तर माझे उत्तर माझे पुस्तकाचे कपाट म्हणण्यापेक्षा माझे ‘ शब्दालय ‘ असे उत्तर मिळेल. […]

युरोपायण अकरावा दिवस – टूरचा शेवटचा – रोम – व्हॅटीकन सीटी

संस्कृती आणि वारसा दोहोंची जपणुक या बाबत सर्वच युरोपीय देश आघाडीवर आहेत. इटली देशाची राजधानी रोममधेही हे दिसुन येते. सेवन हिल्समधे वसलेल्या या रोम शहराची पायी टूर करुन टायबर रीव्हर, रोमन फोरम, ट्रेव्ही फौंटन, सर्कस मँक्सीमस, पियाझा व्हेनीझिया, कलोझियम वगैरे ऐतिहासिक पार्श्वभूमी ची स्थळ बघताना जास्ती करुन भग्न अवशेषच बघायला मिळाले. रोम शहरातल्या ब-याचशा इमारती विटकरी […]

1 162 163 164 165 166 241
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..