कळायला लागल्यापासून आठवतो तो म्हणजे आमच्या आईच्या माहेरी असलेला समुद्र. मुंबईच्या विरुद्ध किनाऱ्यावर वसलेले मांडवा गाव जे हल्ली मांडवा बंदर म्हणूनच ओळखले जाते. मांडव्याच्या समुद्र किनाऱ्यावर घालवलेले बालपण आणि शाळेतल्या मोठ्या सुट्ट्या याच्यामुळे समुद्र, भरती, ओहोटी, लाटा, वाळू यांच्याशी कदाचित जन्म झाल्यापासूनच ओळख झाली होती. मालेगावला पाचवीत असताना बाबांची नाशिक जिल्ह्यातून थेट रायगड जिल्ह्यात बदली झाली […]
१४ नोव्हेंबर २०१३. सचिनने त्याचा शेवटचा कसोटी सामना याच दिवशी खेळला. सचिनच्या तब्बल १५० पेक्षा जास्त सह्यांचा संग्रह केलाय ठाण्यातील `सह्याजीराव’ या नावाने ओळखले जाणारे `सतिश चाफेकर’ यांनी. […]
दुपारी बारा वाजल्यानंतर जहाजावरुन कंपनीला नून रिपोर्ट पाठवला जातो. मागील चोवीस तासात जहाजावर वापरलेले इंधन ,पाणी आणि जहाजाने कापलेले अंतर अशा बऱ्याच गोष्टींची माहिती कंपनीला दिली जाते. दुपारी दोन वाजता चीफ इंजिनियर ने शिप्स ऑफिस मधून खाली इंजिन कंट्रोल रूम मध्ये फोन केला. फ्रेश वॉटर टँक ची लेव्हल चेक करून रिपोर्ट करायला सांगितले. लेव्हल पाहिल्यानंतर त्याला […]
ज्युनियर इंजिनीयर असतांना एका दिवशी दुपारी जेवणानंतर मेन डेकवर मिडशीप क्रेनच्या सहाय्याने जहाजावरील चैन ब्लॉक आणि लिफ्टिंग इक्वीपमेंट टेस्टिंग साठी गेलो होतो. टेस्टिंग झाल्यांनातर पुन्हा इंजिन रूम जाऊन काम करण्याचा कंटाळा आला होता. मेन डेकवर बऱ्याच दिवसानंतर आलो होतो सकाळी उठल्यापासू केबिन मधून इंजिन रूम आणि इंजिन रूम मधून केबिन एवढंच, फक्त खाण्यापिण्याच्या वेळेत मेस रूम […]
ठाणे शहर जागतिक शहरात रूपांतरित होत असताना रोडाज, ठाणे इस्टेट आणि हिरानंदानी वन पार्क यासारखे प्रकल्प शहराचे मानबिंदू बनले आहेत. व्यापारी केंद्रे, विविध कंपन्यांची कार्यालय आणि माहिती-तंत्रज्ञानाची केंद्रे यांनी हा सारा परिसर सातत्याने उत्साहाने परिपूर्ण असतो. […]
हा अजित सातघरे कोण ? अनेकांना प्रश्न पडला असे , याला पाहिले नाही कधी टीव्ही वर, कधी ऐकले नाही. तरीपण ह्या माणसाची ओळख करून देणार आहे एक गाण्यामधील आनंदयात्री म्हणून. […]
फ्रान्सच्या बंदरात हेवी फ्युएल ऑईल लोड करून आम्ही जिब्राल्टरला आलो होतो. अर्धा कार्गो डिस्चार्ज करून जिब्राल्टरच्या सामुद्र धुनीच्या पलीकडील किनाऱ्यावर स्युटा नावाचे बंदर आहे, उरलेला अर्धा कार्गो डिस्चार्ज करण्यासाठी जहाज तिकडे निघाले आणि तासाभरातच तिथे पोचले. कार्गो डिस्चार्ज करून पुन्हा निघायला मध्यरात्र होणार होती. दुपारी माझा बारा वाजता वॉच संपल्यावर थर्ड मेट आणि मी जेवण करून […]
‘राजकारण तुम्हाला आश्चर्यचकित करतं. राजकारण तुम्हाला धक्काही देतं आणि राजकारणात काहीही घडू शकतं..’ असं राजकारणाचं वर्णन नेहमी केल्या जातं. त्यातील सत्यता सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळतेय. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून पंधरवडा उलटला तरी अद्याप राज्यातील सत्ताकोंडी फुटलेली नाही. […]
जहाजावर मुख्यता दोनच टीम असतात एक डेक किंवा नेव्हिगेशनल टीम आणि दुसरी इंजीन टीम. जहाजाचा कॅप्टन हा जहाजावरील सर्वोच्च अधिकारी तर त्याखालोखाल चीफ इंजिनियर आणि मग क्रमाक्रमाने इतर अधिकारी डेक किंवा इंजीन टीम मध्ये असतात. जहाजाचा कॅप्टन किंवा चीफ इंजिनियर होण्यासाठी सर्वात खालच्या स्तरापासून सुरवात करावी लागते. कॅप्टन बनायचे असेल तर डेक कॅडेट आणि चीफ इंजिनियर […]
लूफथान्साच्या विमानाने मुंबई विमानतळावरून टेक ऑफ घेतला आणि फ्रँकफर्ट विमानतळावर लँड केले. तिथून अम्सटरडॅम साठी कनेक्टिंग फ्लाईट पकडली. युरोप मध्ये बऱ्याच देशांमधे रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नो फ्लाय टाइम असतो म्हणून युरोप किंवा अमेरिकेत जाणारी विमाने भारतातून मध्यरात्री नंतर पहाटे पहाटे निघतात जेणेकरून सहा ते सात तासानंतर विमानतळाजवळ राहणाऱ्या यूरोपियन लोकांची झोपमोड न होता […]