“शास्त्र हे तर्क व सिद्धांत सिद्ध करण्याच्या कसोटीवर सिद्ध होते. समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या मारुती स्तोत्रातील सहा दाखले व विज्ञानातल्या संबंधित शोधांमधे साम्य आहे. अलीकडच्या काळातील या संकल्पना ३५० वर्षापूर्वी भारतातील संतांना माहीत होत्या. भारतीय विद्वानांना संतपदी बसविण्यात आले, त्यामुळे आपल्याकडील ज्ञानी लोकांना जागतिक पातळीवर मान्यता मिळाली नाही. फक्त मनन व चिंतनातून शोधनिबंधाच्या तोडीचे साहित्य विद्वानांनी निर्माण केले आहे. मग त्याला जगन्मान्यता का मिळत नाही?” […]
मानवाला मानवपण मिळण्यास महत्वाचे कारण ठरली ती भाषा. जगभरात देशानुरूप वेश, संस्कृती व भाषा विकसित झाल्या. संपर्कमाध्यमानुसार भाषेत बदल होत गेले. शब्दमर्यादा पाळता-पाळता त्याचे कालमर्यादेत रुपांतर झाले. वेळ नाही या कारणाने लांब वाक्य, चार-पाच शब्दांचे समुह यांच्या जागी संक्षिप्त रूपे आली. ‘एक चित्र हजार शब्दांच्या बरोबर असते’ या उक्तिनुसार आता चित्रांची चलती आहे. आता ‘इमोजी’ मान्यता पावली आहे. वाक्यरचना, व्याकरण, भावना व्यक्त करणार्या शब्दांची निवड मागे पडू लागली आहे. सांकेतिक प्रणाली रूढ होते आहे. […]
ओतारू हे ऐनू वस्तीचे शहर, “ओतारू” हे नाव सुद्धा मूळचे ऐनू भाषेतुन घेण्यात आले आहे. ऐनु म्हणजे उत्तर जपानमधील एक जमात आहे. ह्या ऐनु जमातीचे लोकं साधारणपणे सध्या फक्त होक्काइदो मध्ये आढळून येतात. सांस्कृतिक पार्श्वभूमी सुद्धा बहुतेक करून उर्वरित जपानमधल्या लोकांपेक्षा वेगळी आहे. भाषा आणि संस्कृती मध्ये वेगळेपण आहे. ऐनु संस्कृती विषयक पुरावे आणि विस्तारित माहिती देणारी अनेक ठिकाणे होक्काइदो मध्ये आहेत. […]
आपल्या आराध्य देवतेची स्तुती करून तिला प्रसन्न करून कृपाप्रसाद प्राप्त करणे हे कोणाही भक्ताचे उद्दिष्ट असते. स्तोत्र पठण हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. ‘प्रतिवादी भयंकर’ स्वामी अण्णा यांनी मुख्यत्त्वे तोडक वृत्तात (सससस) रचलेल्या या स्तोत्रात श्री व्यंकटेशाचे गुणवर्णन व स्तुती आहे. कृपा किंवा उपकार एखाद्या गोष्टीची परतफेड म्हणून किंवा कारणाविना निर्हेतुक असू शकतात. येथे याच निर्हेतुक कृपेची तसेच आपल्या हातून जे अनेक अपराध, दुष्कृत्ये घडल्रेली आहेत त्याबद्दल क्षमा मागून याचना केली आहे. […]
त्यांच्या गाण्यातील नितळ पारदर्शकता त्यांच्या स्वभावातही आहे. लोकांना विश्वास देण्याचं, त्यांच्याशी स्नेहबंध निर्माण करण्याचं त्यांचं कसब अलौकिक आहे. खरा स्नेह हा माझ्या रविकाकाचा आणि परवीनजींचा व दिलशाद खांसाहेबांचा. त्या बळावर माझी व दीदींची भेट झाली. काही भेटींतच त्या माझ्यावर मुलासारखं प्रेम करू लागल्या. पाडवा असो, गणपती असो, दसरा किंवा दिवाळी असो वा नववर्ष दिवस असो, मी एक वेळ आळशीपणा करेन, पण सकाळी बरोबर आठ वाजता मोबाईलवर दीदींचा शुभेच्छा संदेश असतो. […]
हाकोदाते पाहिल्यानंतर पुढे ओढ लागली ती म्हणजे होक्काइदोची कॅपिटल सिटी पाहण्याची. “साप्पोरो” हे होक्काइदो मधील सर्वात मोठे शहर असुन इकडे येण्याचा सगळ्यात सोयीस्कर मार्ग म्हणालं, तर हवाई मार्ग.साप्पोरो Planned City असल्यामुळे, शहराची रचना पद्धतशीर आहे. […]
‘ऋतुरंग’च्या अरुण शेवते यांनी मला सांगितलं की २००३ च्या दिवाळी अंकासाठी तुम्ही उस्तादजींच्या जडणघडणीविषयी त्यांची मुलाखत घ्या व तिचं शब्दांकन करता येईल का ते बघा. माझं ते पहिलं शब्दांकन असणार होतं. मी रवीकाकाला सांगितलं, निर्मला बाछानी म्हणून झाकीरकाकाच्या सचिव आहेत, त्यांना सांगितलं आणि झाकीरकाका मुलाखतीला तयार झाला. शब्दांकनकार होण्यासाठी मला पहिला आशीर्वाद मिळाला तो उस्ताद झाकीर हुसेन यांचा. […]
सावरकरांना भारतरत्न दयावे की नाही यावर अजूनही वाद-विवाद होत आहेत यावरूनच अजूनही या प्रखर आणि धगधगत्या राष्ट्रपुरुषाची उपेक्षा थांबलेली नाही हे स्पष्टच होते. पण भारताच्या या थोर राष्ट्र भक्ताचे आपणही काही देणे लागतो आणि ते या LOCK DOWN च्या अवघड काळाने आपल्याला जाणवावे हीच माफक अपेक्षा आहे. त्यांच्या त्या LOCK UP मधल्या पर्वताएवढया दुःखांपुढे आपल्या आजच्या LOCK DOWN मधले कष्ट खरोखरच तीळमात्र आहेत ही जाणीव सुद्धा फार सुखदायी आहे. […]
जपान या देशात 47 prefectures (राज्य म्हणूयात) आहेत. बाकी सविस्तर माहिती Google च्या कृपेने आजकाल एका Click वर उपलब्ध आहे. तर या देशाच्या चार मुख्य भूभागातील एक आहे “होक्काइदो”. “होन्शू” या मुख्य भूभागानंतरचा जपान मधला मोठा भुभाग. जपानच्या नकाशात पाहिलं तर सगळ्यात मोठा प्रदेश दर्शवणारा हा होक्काइदो. ‘जपान मधला स्वर्ग’ म्हटलं तरी अतिशयोक्ती वाटू नये इतका इथला निसर्ग सुखावणारा आहे. होक्काइदो ची राजधानी असलेले शहर म्हणजे “साप्पोरो” त्या बद्दल नंतर सविस्तर पाहुया… […]