ज्याकाळी भारतात दूरचित्रवाणी नव्हती व आकाशवाणी हेच लोकशिक्षणाचे मुख्य साधन होते, अशा काळातील एम.एस.सुब्बलक्ष्मींचे ‘वेंकटेशसुप्रभातम्’ ऐकले नाही असा मराठी माणूस शोधावाच लागेल. आकाशवाणीवर प्रातःस्मरणात बहुधा शुक्रवारी वेंकटेशसुप्रभातम् हमखास लागे व त्यामुळे ते घराघरात पोहोचले होते. […]
प्राण्यापासून माणसापर्यंतचा प्रवास हा नैसर्गिक होता. परंतु माणूस आज माणसापासून पुन्हा प्राण्यांकडे, नुसता प्राणी नव्हे तर हिंसक पशु होण्याच्या उलट्या संक्रमणाकडे वाटचाल करू लागल्याचे दिसत असून ही बाब निश्चितच संपूर्ण मानवी समाजासाठी चिंताजनक आहे. एका साध्या अफवेतुन, गैरसमजुतीतून अशा नृसंश घटना घडत असतील तर, हे आपल्या सुशिक्षितपणावरील एक प्रश्नचिन्ह आहे. शिवाय, अशा घटनांवर राजकारण करणे, हेदेखील बेजबाबदारपणाचे लक्षण म्हटले पाहिजे. […]
मला एक नेहमी वाटतं आपण मराठी माणसं सकाळी घरामध्ये छान संगीत लावतो. अभंग लावतो. उत्तम स्वरांनी वातावरण पवित्र करतो. तेच आपण संध्याकाळी टीव्ही सिरीयल, सो कॉल्ड टीपेच्या आवाजातल्या बहुतांशी बिन बुडाच्या ईशू वरील चर्चा मधून भांडणाचे, द्वेषाचे विषारी स्वर घरात आणतो. […]
पाकिस्तानात 8 हजार लोकांना संसर्गित करणाऱ्या प्राणघातक चिनी करोना मृतांचा आकडा 159 पर्यंत गेला आहे. अनेक ठिकाणी हा संसर्ग ‘स्टेज तीन’ला म्हणजे सामाजिक प्रसारापर्यंत गेला आहे. […]
ऑफिसच्या कामामुळे माझे सिमेंट प्लांटमध्ये येणे जाणे असायचे.हे प्लांट शहरापासून बरेच दूर असतात.तेथे काम करताना आलेले अनुभव,तेथेपर्यंत पोचण्याचा प्रवास आणि प्लांट मधील वर्णन आहे या लेखात केले आहे. […]
जवळपास १२०० पुस्तके लिहिणाऱ्या , मराठीतील वाचक प्रिय लेखक ,गुरुनाथ नाईक यांना आयुष्यात अखेेरीस का होईना परंतु अ.भा.साहित्य संमेलनात सन्मान पुर्वक आमंत्रित करून व्यासपीठावर सत्कार करावयास काय हरकत असावी? […]
हिंदी चित्रपट सृष्टीचा सन १९५० ते १९७० हा चित्रपट संगीताच्या दृष्टीने सुवर्ण काळ मानला जातो. या काळात अनेक प्रथितयश संगीतकारांनी अनमोल अशा गाण्यांची रसिकांवर अगदी बरसात केली. नुसते गाण्यांवर चित्रपट चालण्याचे ते दिवस होते. ज्येष्ठ संगीतकार रोशन यांनी याच काळात आपल्या सुमधुर गीतांची देणगी चित्रपट सृष्टीला दिली. […]
ज्याकाळी भारतात दूरचित्रवाणी नव्हती व आकाशवाणी हेच लोकशिक्षणाचे मुख्य साधन होते, अशा काळातील एम.एस.सुब्बलक्ष्मींचे ‘वेंकटेशसुप्रभातम्’ ऐकले नाही असा मराठी माणूस शोधावाच लागेल. आकाशवाणीवर प्रातःस्मरणात बहुधा शुक्रवारी वेंकटेशसुप्रभातम् हमखास लागे व त्यामुळे ते घराघरात पोहोचले होते. […]
कुरुक्षेत्रावर द्रोणाचार्यांनी रचलेल्या चक्रव्यूहात अर्जुनपुत्र अभिमन्यू जसा असाह्य झाला होता, तीच हतबलता आज आपणही अनुभवतो आहोत. अभिमन्यूला कौरवांनी गरडा घातला होता, आपल्याभोवती कोरोनाचा विळखा आवळला जातोय. फरक इतकाच की, अभिमन्युला चक्रव्यूह भेद करण्याचं तंत्र अवगत नव्हतं त्यामुळे तो ते छेदून बाहेर पडू शकला नाही. आपल्याला ते ज्ञात आहे. परंतु, ते तंत्र वापरण्यास लागणारं ‘संयमा’स्त्र काहीसं बोथट झाल्याने आपली शिकस्त होतांना दिसतेय. […]
गेल्या काही दशकात आपण एकत्र कुटुंब पद्धती कडून अलिप्त कुटुंब पद्धतीकडे वळालो. आता अलिप्त कुटुंब पद्धतीत देखील छोटेखानी कुटुंबाला प्राधान्य आहे. काळानुसार हा बदल घडताना भौतिक सुख सोयी वाढत आहेत आणि घरातील माणसांचा संवाद कमी होत आहे. आई, वडील आणि मुल अशा तीन माणसांच्या छोटेखानी कुटुंबात जर आई आणि वडील सतत बाहेर व्यस्त असतील तर त्या मुलाने संवाद साधायचा कोणाशी? […]