एका अथांग विश्वातल्या एका आकाशगंगेतल्या एका सूर्यमालेतल्या एका ग्रहावरच्या, कोट्यावधी सजीवांमधील एक प्रजाती म्हणजे ‘माणूस’. उत्क्रांतीत लाभलेल्या मेंदूचा वापर करीत प्रगतीचा वेग वाढवत नेला या मानव समुहाने. थोड्याच काळात बौध्दिक व भौतिक पातळीच्या सीमा गाठण्याच्या वल्गना हा समूह करू लागला. Nature आणि Nurture या दोन्हींचा समतोल राखण्याचे भान तो या घोडदौडीत विसरला. ‘Nature काय? किस झाडकी पत्ती’ ही प्रवृत्ती वाढत गेली. […]
अफगाणिस्तानमधील शिखांच्या गुरुद्वारावर ३ आत्मघातकी दहशतवाद्यांनी हल्ला केला. २५ मार्चला त्यांनी तेथील २०० भाविकांवर गोळीबार केला, बॉम्ब फेकले. त्यात २५ भाविक मारले गेले. आणि ८० लोकांना त्यांनी ओलिस धरले होते. अफगाणी सुरक्षा दलाच्या सहा तासाच्या चकमकीनंतर हे तीनही हल्लेखोर ठार झाले. […]
सुजान बंधू-भगिनींनो, परिस्थितीचं गांभिर्य ओळखा. विनाशाची वेळ नजीक आली आहे. आता जर आपण सावध झालो नाही तर तर मग पुढे जे होईल त्याला दैव देखील अडवू शकणार नाही…अनंत पीडा आणि असह्य्य वेदनांचा एक भयानक प्रवास ज्यामध्ये मृत्यूचं असं तांडव खेळल्या जाईल की याची आपल्याला कल्पनाही करता येणार नाही. […]
इथून पुढे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवी प्रगती साधताना जिथे जिथे निसर्गाला धक्का लागेल तिथे तिथे ति झीज भरून काढण्याची जिम्मेदारी देखील आपल्याला उचलावी लागेल. आपण तंत्रज्ञान विकसित करण्यासोबत निसर्गाचा आदर राखायला लागलो की मग आपल्यावर देखील वेगवेगळ्या आपत्तीच्या निमित्ताने घरात बंदिस्त होण्याची वेळ येणार नाही. […]
भारत-नेपाळ सीमेवर सीमा सुरक्षा बल हे अर्ध सैनिक दल तैनात आहे आणि या सीमेवरून रोज लाखो नेपाळी नागरिक भारतात आणि हजारो भारतीय नागरिक हे नेपाळ मधे हालचाल करतात. म्हणूनच सीमा सुरक्षा बलाने सतर्क होऊन या नेपाळ मधून येणाऱ्या सगळ्या नागरिकांची करोना टेस्ट करणे गरजेचे आहे. कारण नेपाळ मध्ये चीन मधुन वेगवेगळ्या कारणाकरता येणार्या चिनी नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. […]
नॉस्ट्रडॅमसने सांगितलेली बरीच भविष्य खरी ठरली आहेत.. त्याच्यामध्ये फ्रेंच राज्यक्रांती, लेडी डायनाचा मृत्यू, ग्रेट फायर ऑफ लंडन, हिटलरचा उदय, अणुबॉम्बचा शोध, दुसरे महायुद्ध,अमेरिकेतील 9 11 चा हल्ला, यांसारख्या घटनाबाबत नॉस्ट्रडॅमसची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरल्याचे दिसून आले आहे. […]
चीननंतर सर्वाधिक लोकसंख्येचा देश भारत आहे. चीनला लागून आहे आणि व्यापारी संबंधांमुळे भारत-चीन प्रवासी वाहतूकही चांगलीच आहे. असे असतानाही भारतात कोरोनाग्रस्तांची इतकी कमी संख्या आहे. सावधगिरीचे उपाय काटेकोरपणे अंमलात आणणे आणि भीतीने पळत सुटणे यात फ़रक आहे. […]
करोना व्हायरसचा भारताच्या आर्थिक व्यवस्थेवरती नेमका काय परिणाम होऊ शकतो, याचा चेंबर ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने अभ्यास केला,या अभ्यासामध्ये अनेक उपाय योजना सुचवण्यात आल्या आहेत. सरकार त्यावरती विचार करून आवश्यक पावले पण उचलत आहे. […]
चाळीस पन्नास वर्षांपूर्वी कोकणातल्या आमच्या गावाकडच्या खेड्यात असलेली जीवन -पद्धती आरोग्याच्या हितासाठी किती योग्य होती ही दृष्टी थोडी उशिरा म्हणजे आज मोठे झाल्यावर, जग पाहिल्यावर, शिकले सावरल्यावर मिळाली. सगळंच जुनं वाईट नसतं आणि टाकून देण्यासारखे नसते ही जाणीव जुन्या आठवणी कुरतडत राहाते आणि काहीतरी हरवल्याच्या भावनेने जीव कासावीस होत राहातो. […]
भारत सरकारने कोरोनाचे संकट ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली आहे. केंद्र सरकारने या मोठ्या संकटाला तोंड देण्यासाठी खंबीर उपाय व जनजागृती युध्द पातळीवर हाती घेतली आहे. सध्या एकतीस मार्चपर्यंत निर्बंध जारी केले आहेत. शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदी जारी केली आहे. सर्व गर्दीच्या ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. मुंबई म्हणजे गर्दी हे समीकरण आहे. म्हणून गरज नसेल तेव्हा बाहेर पडायचे नाही, हे पथ्य लोकांनी आपणहून पाळणे महत्वाचे आहे. […]