गोवा राज्य स्थापना दिन
इंग्रज १९४७ मध्ये भारतातून बाहेर गेले. पण पोर्तुगीज त्यांच्या ताब्यातील प्रदेश सोडत नव्हते. अखेर भारतीय लष्कराने दमण, दीव आणि गोवा हा प्रदेश ‘ऑपरेशन विजय’ अंतर्गत १९ डिसेंबर १९६१ रोजी जिंकला आणि भारतात विलीन केला. केंद्र सरकारने त्यावेळी दमण, दीव आणि गोवा यांना केंद्रशासीत प्रदेशाचा दर्जा दिला. नंतर ३० मे १९८७ रोजी गोवा या केंद्रशासीत प्रदेशाला भारताच्या घटक राज्याचा दर्जा देण्यात आला पण दमण आणि दीव यांचा केंद्रशासीत प्रदेशाचा दर्जा कायम ठेवण्यात आला. यामुळे १९ डिसेंबर हा गोवा मुक्ती संग्राम दिन आणि ३० मे हा गोवा राज्य स्थापना दिन म्हणून साजरा करतात. […]
