नवीन लेखन...

बरसात चित्रपटाची ७३ वर्षे

‘बरसात’पासून ‘मेरा नाम जोकर’पर्यंत राज कपूर यांच्या सर्वच चित्रपटांचे गीतलेखन शैलेंद्र यांनी केले. रामानंद सागर यांनी ‘बरसात’ चित्रपटाची पटकथा लिहीली होती. रामानंद सागर यांचा हा पहिला चित्रपट होता. अभिनेते प्रेमनाथ व अभिनेत्री निम्मी रूपेरी पडद्यावर प्रथमच झळकले, लता मंगेशकर यांना खरा ब्रेक मिळाला तो पण बरसात मधील गाण्यांमुळेच. बरसातमुळे राजकपूर यांचे नाव सर्वत्र झाले. […]

सनदी सेवा दिवस

भारतीय प्रशासनाचा पोलादी कणा म्हणून सनदी अधिकारी सुप्रसिद्ध आहेत. अठरापगड भाषासमूहांच्या ह्या देशाला एकत्र बांधून ठेवणारी ही पोलादी चौकट देशाच्या स्वातंत्र्यापासूनच तिच्या कामगिरीमुळे महत्त्वाची ठरली होती. देशात घटनादत्त संरक्षण असणारी सेवा म्हणजे सनदी सेवा. तिचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, व योग्य निर्णय घेताना कोणत्याही दबावाला बळी न पडता अधिकाऱ्यांनी आपले काम निष्पक्षपातीपणाने करावे, ह्यासाठी हे संरक्षण दिलेले होते. […]

युध्दपट ‘हकीकत’ चित्रपटाला ५८ वर्षे पूर्ण झाली

हा एक उत्तम आदर्श युध्दपट म्हणून गणला जातो. या चित्रपटात बलराज साहनी ( मेजर रणजित सिंग), धर्मेंद्र ( कॅप्टन बहादूर सिंग), विजय आनंद ( मेजर प्रताप सिंग), तसेच प्रिया राजवंश, संजय खान, सुधीर, शेख मुख्तार इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. […]

‘गोलमाल ‘चित्रपटाला ४३ वर्षे पूर्ण झाली

मुंबईत ड्रीमलॅन्ड थिएटरमध्ये या चित्रपटाने खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादले. या चित्रपटातील अमोल पालेकर यांची रामप्रसाद आणि लक्ष्मीप्रसाद दशरथप्रसाद शर्मा अशी दोन रुपे घेतलेली भूमिका आणि त्यांचा आपले कार्यालयीन बॉस भवानी शंकर ( उत्पल दत्त) यांच्याशी झालेला गंमतीदार संघर्ष या सूत्राभोवती हा खुसखुशीत मार्मिक मिस्कील मनोरंजक चित्रपट रंगला. […]

जागतीक केळे दिवस

केळे बाराही महिने बाजारात मिळणारे फळ आहे. फळांमधील केळं आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरते. केळ्यात पोटॅशियम आणि विटॅमिन भरपूर प्रमाणात असतात. त्याशिवाय केळ्यात इतरही अनेक पोषक तत्व असतात, जी शरीरासाठी अतिशय गुणकारी असतात. त्यामुळेच कोणत्याही प्रकारचं केळं आपल्या खाण्यात सामिल केल्याने फायदे होतात. दररोज केळं खाल्याने हार्ट ॲ‍टॅकची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते. त्याशिवाय केळ्याचे इतरही अनेक फायदे आहेत. अति पिकलेल्या केळ्याचे अनेक फायदे आहेत. […]

जागतिक हॅम रेडिओ दिवस

भारतातील एखाद्या व्यक्तीने देशातच आणीबाणीच्या प्रसंगी पाठवलेला संदेश वातावरणातील त्या वेळच्या स्थितीमुळे कदाचित मिळणार नाही; पण अनुकूल वातावरण असलेल्या कोणत्याही ठिकाणच्या “हॅम’वर तो जाऊन पोचतोच. अतिशय तातडीचा किंवा आणीबाणीचा प्रसंग असेल, तर ज्याला संदेश मिळाला तो अन्य मार्गाने मदत पोचवण्याचा प्रयत्न करतो. दुर्घटना किंवा आपत्कालीन परिस्थितीत संदेशवहनासाठी हॅम रेडिओ हे एक प्रभावी माध्यम आहे. […]

सामना मराठी चित्रपट प्रदर्शित झाला

एका ध्येयनिष्ठ मास्तरने (डॉ. श्रीराम लागू) एका सहकार सम्राटाच्या (निळू फुले) अस्तित्वास दिलेले आव्हान या कथासूत्राभोवती हा चित्रपट होता. हा चित्रपट झळकला आणि नंतर २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर झाल्याने, या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालून तो चित्रपटगृहातून उतरवण्यात आला. विजय तेंडुलकरांची कथा-पटकथा-सवांद असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल यांचे होते. तर निर्मिते रामदास फुटाणे व माधव गालबोटे हे होते. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित पहिला चित्रपट. “सामना” चित्रपटाने बर्लिन महोत्सवात भारताची ‘प्रवेशिका’ म्हणून गेलेला पहिला मराठी चित्रपट मान मिळवला. […]

चक्र चित्रपटाच्या प्रदर्शनाची ४१ वर्षे

मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर नाझ हे होते. या चित्रपटाची निर्मिती एनएफडीसीच्या वतीने करण्यात आली आहे. मुंबईतील झोपडपट्टीतील जीवन संघर्ष या चित्रपटात अतिशय प्रभावीपणे साकारला आहे. या चित्रपटात स्मिता पाटील (अम्माच्या भूमिकेत), नसिरुद्दीन शहा (लूका), कुलभूषण खरबंदा (अण्णा), अंजली पैंजणकर (चैन्ना) तसेच रोहिणी हट्टंगडी, रणजित चौधरी, सलिम घोष इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष म्हणजे अलका कुबलचीही या चित्रपटात भूमिका आहे. तेव्हा ती शाळकरी वयात होती. […]

पहिली लोकसभा अस्तित्त्वात आली

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेली ही पहिली लोकसभा निवडणूक होय. देशातील २५ राज्यांतील ४८९ जागांवर २५ ऑक्टोबर १९५१ ते २१ फेब्रुवारी १९५२ या काळात मतदानाची प्रक्रिया पार पडली. जवळजवळ चार महिने पार पडलेल्या या निवडणुकीत ४५.७ टक्के मतदान झाले. २५ ऑक्टोबर १९२५ रोजी हिमाचल प्रदेशमधील चिनी या तालुक्यात पहिल्या मताची नोंद झाली. […]

ईस्टर संडे

ईस्टर संडे ख्रिस्ती बांधवांसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. ख्रिस्ती समाज हा सण साजरा करतात. पॅलेस्टाइनमध्ये रोमन व ज्यू लोकानी येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढविले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी रविवारी येशू परत जिवंत झाला. ह्या प्रसंगाचे स्मरण म्हणून वसंत ऋतूतील पहिल्या पौर्णिमेनंतर येणारा पहिला रविवार, हा ईस्टर संडे म्हणून हा सण साजरा केला जातो. […]

1 10 11 12 13 14 73
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..