सिंधुदुर्ग जिल्हयाची निर्मिती
राजा भोज, चालुक्य, राष्ट्रकुट, शिलाहार व कदंब यांनी ज्या प्रदेशावर राजसत्ता गाजवली. तो प्रदेश म्हणजे कोकणच ह्रदय म्हणजेच आजचा सिंधुदुर्ग जिल्हा. १ मे १९८१ रोजी राज्य सरकारने रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन करून या सिंधुदुर्गची निर्मिती केली. सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकणाचा दक्षिणेकडील भाग आहे. त्याची निर्मिती आधीच्या रत्नागिरी जिल्ह्यातून करण्यात आली आहे. देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण, कुडाळ, वेंगूर्ले, सावंतवाडी आणि दोडामार्ग अशा आठ तालुक्यांच्या एकत्रितकरणामधून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. […]
