नवीन लेखन...

‘गन्स ऑफ नेव्हरॉन’ हा इंग्रजी क्लासिक युद्धपट प्रदर्शित झाला

ॲ‍लिस्टर मॅक्लीन यांच्या ‘गन्स ऑफ नेव्हरॉन’ याच नावाच्या कादंबरीवर आधारित, जेली थॉमप्सन दिग्दर्शित हा चित्रपट सुमारे १६० मिनिटांचा असून यात ग्रेगरी पेक, डेव्हिड निवेन, अँथनी क्वीन, अँथनी क्वेल आदी एकापेक्षा एक मातब्बर कलावंत आहेत. या चित्रपटाला ऑस्करची ६ नामांकने मिळाली होती तर २ गोल्डन ग्लोब अवॉर्डसह १ ऑस्कर मिळाले होती. […]

भारतात रंगीत दूरचित्रवाणी प्रक्षेपणाची सुरुवात

“हमलोग” ही भारतातील दूरचित्रवाणी वरून प्रक्षेपित होणारी पहिली मालिका आहे. भारतीय दूरचित्रवाणीच्या वाटचालीतला हा महत्त्वाचा टप्पा. अशोक कुमारद्वारा सूत्रसंचालित आणि मनोहर श्याम जोशीद्वारा लिखित हमलोग मालिकेने तत्कालीन लोकप्रियतेचे उच्चांक मांडले होते. […]

‘ब्रह्मचारी’ चित्रपट प्रदर्शित झाला

स्वत: अनाथ असलेला ब्रह्मचारी (शम्मीकपूर) अनेक अनाथ, असहाय मुलांचा सांभाळ करत असतो. त्याची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने मुलांचा सांभाळ करणं त्याला अत्यंत कठीण जात असतं. पण तरीही तो हसतमुखाने त्यांना आशावादी बनविण्याचा प्रयत्न करत असतो. अशी या चित्रपटाची कथा होय. […]

जलसंपत्ती दिन

पाणी नियोजन व व्यवस्थापनाबाबत आज आपण एका दुहेरी कोंडीत सापडलो आहोत. एकीकडे ८० हजार कोटींहून (आजच्या किमतीने तीन लाख कोटी) अधिक रक्कम खर्च करून आपण राज्यातील एकूण लागवड जमिनीच्या १० टक्केदेखील क्षेत्र प्रत्यक्षात पाटपाण्याने ओलित करू शकत नाही हे कटू सत्य आहे. […]

जागतिक पेंग्विन दिन

टार्क्टिका खंडात आढळणारा आणि उडता न येणारा एक पक्षी. स्फेनिसिडी कुलातील पक्ष्यांना ‘पेंग्विन’ म्हटले जाते. या कुलात त्याच्या १७ जाती असून मुख्यत: अंटार्क्टिका, अर्जेंटिना, चिली, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या ठिकाणी तो आढळतो. सागराचे उबदार पाणी त्यांना मानवत नसल्यामुळे ते उत्तर गोलार्धात पोहून जात नाहीत. एंपरर पेंग्विन हा आकाराने सर्वांत मोठा असून त्याचे शास्त्रीय नाव ॲप्टेनोडायटिस फॉर्स्टेरी आहे. त्याची उंची सु. १२० सेंमी. व वजन सु. ४५ किग्रॅ. असते. लिटल पेंग्विनाचे शास्त्रीय नाव युडिप्टुला मायनर आहे. त्याची उंची सु. ३० सेंमी. व वजन सु. १•५ किग्रॅ. असते. अन्य जातींच्या पेंग्विनांची उंची ४५–९० सेंमी. व वजन २•३–६•८ किग्रॅ. असते. पेंग्विनाची एक जाती गालॅपागस पेंग्विन ही विषुववृत्तावर आढळते. […]

सुवेझ कालव्याच्या बांधकामाची सुरुवात

सुवेझचा कालवा हा मानवाने निसर्गाच्या रचनेत केलेला पहिला महत्त्वाचा बदल. सैद बंदर ते सुवेझ येथील तेवफिक बंदर यांना जोडणाऱ्या या कालव्याची लांबी तब्बल १९३.३० कि.मी. म्हणजे जवळपास मुंबई ते पुणे इतकी आहे. पण त्यामुळे बोटींचा सुमारे सात हजार कि.मी.चा आफ्रिकेचा वळसा वाचतो. अर्थात सुवेझच्या बांधकामाला सुरुवात करण्याचा उद्देश केवळ सागरी प्रवासातील वेळेची बचत व त्यामुळे युरोप व आशियातील व्यापारत वाढ व्हावी, इतकाच नव्हता. अरब राष्ट्रे व अन्य जग यांच्यातील विकोपाला जाणारे संबंध आणि त्याचा तेल व्यापारावर होणारा परिणाम, त्यामुळे पाश्चिमात्य देशांचे अरब राष्ट्रांवर वाढत चाललेले आर्थिक अवलंबन यांची किनारही सुवेझ कालवा तयार करण्यामागे होती. […]

राष्ट्रीय पंचायती दिवस

लोकशाहीची सत्ता विकेंद्रीकरणाचा घटक लोकशाहीच्या विकेंद्रीकरणातील महत्त्वाचा घटक म्हणून महात्मा गांधींनी पंचायती राज व्यवस्थेची संकल्पना मांडली होती. सूक्ष्म नियोजनातून अगदी दुर्गम भागातही उत्तम शासन देण्याचा हा पर्याय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रूपाने १९५८ मध्ये स्वीकारण्यात आला. राजस्थान राज्याने सर्वप्रथम ही व्यवस्था स्वीकारली. त्यापाठोपाठ महाराष्ट्रानेही ही व्यवस्था अंगीकारत त्रिस्तरीय पंचायत व्यवस्था निर्माण केली. […]

यु ट्युबवर पहिला व्हिडियो अपलोड करण्यात आला

३ एप्रिल २००५ रोजी यु ट्युबवर पहिला व्हिडियो अपलोड करण्यात आला होता, याला आज १७ वर्षे झाली. ज्यामध्ये जावेद करीम हे एका प्राणिसंग्रहालयाची माहिती देत होते. या व्हिडियो चे नाव आहे “ME AT THE ZOO”
आजच्या युगात युट्यूब कोणाला माहित नाही असं होणार नाही. आजची तरुण पिढी टीव्ही बघण्यापेक्षा जास्त पसंती युट्युबवर व्हिडियो बघण्याला देते हे एका सर्वेमधून सिद्ध देखील झाले आहे. मनोरंजनाचे सर्वोत्तम साधन म्हणून या काळात युट्युब समोर येत आहे. […]

जागतिक पुस्तक दिवस

आजच्या मनुष्याच्या ठिकाणी असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या साह्याने तो सुबुद्ध आणि प्रगल्भ तर होतोच परंतु त्याच्या कार्यसंस्कृतीवर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. मागल्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे अशी तक्रार सर्वच थरातून वाढले आहे. ती गोष्ट सत्यही आहे कारण वाचनाव्यतिरिक्त रेडिओ, टेलिव्हिजन, कंप्युटर, चित्रपट, नाटके, इतर मनोरंजनाची साधने इतकी जास्त वाढली आहेत की या सर्व गलबल्यात मनुष्याला वाचण्यासाठी निवांतपणाच मिळेनसा झाला आहे. […]

जागतिक वसुंधरा दिवस

आपल्या पिलांना मोकळा श्वानस घेत बागडण्यासाठी ‘स्पेस’ आणि उडण्यास ‘आकाश’ देण्यासाठी सुजाण प्रयत्न केवळ आपल्याच हातात आहेत. तंत्रज्ञानाचा वापर ‘ग्राउंड टु स्मार्ट अर्थ’ असा करीत सुंदर, सुव्यवस्थापित आणि सुसज्ज वसुंधरेचे ‘खरेखुरे स्वप्न’ पाहण्याची संधी भावी पिढीला केवळ आपणच उपलब्ध करून देऊ शकतो. मला काय करायचे, यापेक्षा ‘मी काय करू शकतो’ ही आपली भूमिकाच खरंतर आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, अशी ‘सेल्फ आयडेंटिटी’ (स्वतःची ओळख) निर्माण करते. […]

1 9 10 11 12 13 73
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..