नवीन लेखन...

यु ट्युबवर पहिला व्हिडियो अपलोड करण्यात आला

२३ एप्रिल २००५ रोजी यु ट्युबवर पहिला व्हिडियो अपलोड करण्यात आला होता, याला आज १७ वर्षे झाली. ज्यामध्ये जावेद करीम हे एका प्राणिसंग्रहालयाची माहिती देत होते. या व्हिडियो चे नाव आहे “ME AT THE ZOO”
आजच्या युगात युट्यूब कोणाला माहित नाही असं होणार नाही. आजची तरुण पिढी टीव्ही बघण्यापेक्षा जास्त पसंती युट्युबवर व्हिडियो बघण्याला देते हे एका सर्वेमधून सिद्ध देखील झाले आहे. मनोरंजनाचे सर्वोत्तम साधन म्हणून या काळात युट्युब समोर येत आहे.

जगात सर्वाधिक पाहिली जाणारी वेबसाईट म्हणजे युट्यूब! युट्यूबची सुरुवात १४ फेबुवारी २००५ मध्ये झाली होती, पण २३ एप्रिल २००५ रोजी यु ट्युबवर पहिला व्हिडियो अपलोड करण्यात आला होता.

पॅपेलचे ३ कर्मचारी चॅड हर्ले, स्टीव्ह चॅन आणि जावेद करीम यांनी ही साईट बनविली होती ही साईट सुरु करण्यामागे दोन घटना कारणीभूत ठरल्या. तिघेही मित्र एकदा डिनर करत होते. त्यावेळी त्यांना एक दिवस आधी शूट केलेला प्राणिसंग्रहालयाचा व्हिडिओ शेअर करताना अडचण आली. त्यावेळी इमेल तंत्रज्ञानात आजच्यापेक्षा अनेक त्रुटी होत्या. इमेल पाठविण्यासाठी मोठी फाईल अटॅच करणे शक्य नव्हते.

त्यामुळे त्यांनी व्हिडिओ शेअर करण्यामध्ये येणा-या सर्व अडचणी दूर करुन यूट्यूब वेबसाईटची निर्मिती केली.
युट्यूबला बनविण्यात पॅपेल कंपनीचा मोठा वाटा आहे. तिघेही मित्र तिथेच काम करत हाते. चॅड हर्लेचा पॅपेलचा लोगो बनविण्यात सहभाग होता. बोनसच्या स्वरूपात मिळणा-या पैशातून तिघांनी युट्यूब उभे केले होते. सर्वप्रथम त्यांनी युट्यूबला एक व्हिडिओ डेटींग वेबसाईट म्हणून सुरु केले होते. त्यावेळी साईटचे नाव ‘टयून इन हूक अप’ असे ठेवले होते. युट्यूब या नावावरुनही गोंधळ झाला होता.

युट्यूब हे नाव २००५ मध्ये व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी नोंदणीकृत करण्यात आले होते. एकसारखे वाटत असल्यामुळे युनिव्हर्सल ट्यूब आणि रोलफॉर्म इक्विपमेटच्या वेबसाईटला याचा फायदा झाला होता. लोक youtube.com ऐवजी utube.com वर जात होते. परंतु, साईट ओव्हरलोड झाल्यामुळे क्रॅश झाली. त्यामुळे २००६ मध्ये त्या कंपनीने युट्यूबविरुद्ध खटला दाखल केला होता. परंतु, युट्यूबविरुद्ध ते खटला हरले आणि त्यांनाच युआरएल बदलावी लागली. नोव्हेंबर २००५ मध्ये त्यांनी जगात क्रांती घडवून आणणारी ही साईट लॉंच केली. परंतु, दीड वर्षांमध्ये गुगलने युट्यूबची ताकत ओळखून १.६५ अब्ज डॉलर्स मोजून ही साईट विकत घेतली.

युट्यूबवर जगभरात प्रत्येक मिनिटाला १०० तासांपेक्षा जास्त कालावधीचे व्हिडिओ युट्यूबवर टाकण्यात येतात. दरमहा १ अब्जपेक्षा जास्त लोक या साईटला भेट देतात. म्हणजेज इंटरनेट वापरणा-या प्रत्येक दोन जणांपैकी एक जण या साईटला भेट देतो.

दक्षिण कोरियाचा पॉप सिंगर सायचा ‘गंगनम स्टाईल’ हा युट्यूबवर सर्वाधिक पाहण्यात आलेला म्युझिक व्हिडिओ आहे. भारतीय गाण्यांचा विचार केल्यास सीरीयल किसर इम्रान हाशमी आणि तनुश्री दत्ता यांचे ‘आशिक बनाया आपने’ हे हॉट गाणे सर्वाधिक वेळा पाहण्यात आले आहे. यापूर्वी जस्टीन बीबरचे ‘बेबी फीट’ हे गाणे सर्वाधिक वेळा पाहण्यात आले होते. जगभरात एकूण २० टक्के लोक मोबाईलवरुन युट्यूबचा वार करतात. तर उर्वरित ८० टक्के लोक कॉम्प्यूटर किंवा लॅपटॉपचा वापर करतात.

आज युट्यूबवर २२ टक्के ट्रॅफिक अमेरिकेतून येते. तर ७८ टक्के युझर्स इतर देशांमधील आहेत. युट्यूबवर प्रचंड व्हिडिओ आहेत. ते सर्व पाहण्यासाठी एका व्यक्तीला कमीत कमी १७०० वर्षांचे आयुष्य लागेल. यु ट्युब वर दार मिनिटाला १०० तासाहून अधिक वेळचे व्हिडियो अपलोड होतात.

यु ट्युब वापर करणाऱ्यांपैकी ४४ % महिला आणि ५५ % पुरुष आहेत आणि जास्त यूजर्स हे १७ वर्षाखालील मुले आहेत जी कार्टून पाहण्यासाठी यु ट्युब चा वापर करतात. यु ट्युब वर दर सेकंदाला एक लाखाहून अधिक व्हिडियो पहिले जातात. युट्यूबवर विविध प्रकारचे व्हिडिओ आहेत. त्यात ‘हाऊ टू’ श्रेणीतील व्हिडिओ सर्वाधिक वेगाने पाहण्यात येतात. शैक्षणिक कामासाठीही युट्यूबचा मोठा वापर होतो.

युट्यूबवर ४३ देशांच्या ६० भाषांमधील व्हिडिओ उपलब्ध आहेत. युट्यूबकडे १० हजारांपेक्षा जास्त जाहीरातदार आहेत. ते या माध्यमातून लाखो डॉलर्सचा नफा कमावितात. युट्यूबवर १५ हजारांपेक्षा जास्त चित्रपट उपलब्ध आहेत. तसेच सर्व व्हिडिओजचा १० टक्के कंटेंट एचडीमध्येही उपलब्ध आहे. इतर वेबसाईटच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक आहे. युट्यूबचे जगभरात ४९ कोटी पेक्षा जास्त प्रेक्षक आहेत. सरासरी एक प्रेक्षक १४ वेळा वेबसाईटवर येतो.

युट्यूब केवळ एक व्हिडिओ वेबसाईट नाही. तर जगातील दुसरे सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. अनेक जण समस्या आणि प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी युट्यूबवर येतात. युट्यूबनंतर व्हीमियो, हूलू, ब्लिप टीव्ही इत्यादी अनेक वेबसाईट सुरु झाल्या. त्यापैकी अनेक साईट्स बंद पडल्या तर काही सुरु आहेत. युट्यूबवर म्युझिक व्हिडिओ सर्वाधिक लोकप्रिय ठरतात. युट्यूबवर जवळपास २० टक्के कंटेंट हा म्युझिक व्हिडिओचाच आहे. यु ट्युब च्या टॉप १०० व्हिडियोज पैकी ६० व्हिडियोज हे जर्मनी देशात बॅन केले गेले आहेत.

अनेक देशांनी यु ट्युब वर बॅन लावला आहे ज्यामध्ये ब्राझील, तुर्की, पाकिस्तान, सौदी अरेबिया, चीन, इराण, इंडोनिशिया सारख्या देशांचा समावेश होतो.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..