पुण्यातील ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स’चा स्थापना दिवस
अर्थशास्त्राच्या क्षेत्रामध्ये विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था – संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवाचाही ही संस्था उत्तम उपयोग करून घेते. या विद्यार्थ्यांच्या अनुभवाच्या आधारावर अभ्यासक्रम निर्मितीमध्ये सातत्याने नव्या मुद्दय़ांची भर घातली जाते. अशा प्रकारचे नानाविध अभ्यासक्रम आणि विषय नव्या-जुन्या विद्यार्थ्यांसाठी केवळ शैक्षणिक पातळीवरच नव्हे, तर व्यवहाराच्या पातळीवरही तितकेच उपयुक्त ठरत आहेत. शेतीविषयक उद्योगधंद्यांमधील तसेच उद्योगांच्या अर्थकारणाचे बारकावेही या संस्थेच्या अभ्यासक्रमामधून जाणून घेता येतात. संस्थेमध्ये सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर ॲ्प्लिकेशन्स इन इकॉनॉमिक ॲतनालिसिस हा प्रमाणपत्र अभ्यासक्रमही उपलब्ध करून देण्यात आला आहे. संस्थेमध्ये एम. एस्सी. अभ्यासक्रमाला नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीदरम्यान इंटर्नशिपचा काळ पूर्ण करावा लागतो. […]
