नवीन लेखन...

जागतिक सायकल दिवस

एप्रिल २०१८ मध्ये युनायटेड नेशन्सच्या जनरल असेम्ब्लीने ३ जून हा जागतिक सायकल दिन म्हणून घोषित केला. जवळपास दोन शतकांपासून आपण सायकलीचा वाहतुकीसाठी वापर करत आहोत. सायकलीच्या वापराबाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी सायकल दिन साजरा केला जातो.

हल्ली थोड्या अंतराच्या प्रवासासाठीही दुचाकी आणि चारचाकींचा सर्रास वापर केला जातो. त्यामुळे प्रदूषण, तापमान वाढीचे प्रमाण वाढले आहे. दिल्लीमध्ये तर वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी सम-विषमचा प्रयोग केला गेला. वाढत्या प्रदूषणाचा धोका वेळीच ओळखला नाही तर दिल्लीसारखी परिस्थिती आपल्या शहरातही उद्भवू शकते. त्यामुळे यावर उपाय करता येण्याजोगा एकच पर्याय आहे. तो म्हणजे शक्य तेवढ्या जास्त प्रमाणात प्रवासासाठी सायकलचा वापर करणे. प्रदूषण रोखण्यासोबतच शारीरिक आरोग्यासाठीही सायकल चालविणे उत्तम व्यायाम ठरतो. त्यामुळे प्रत्येकाने आठवड्यातून किमान एक दिवस तरी सायकल चालविण्याचा निर्धार करावा. सायकल चालविण्याचे आरोग्यदायी आणि पर्यावरणीय फायदे लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करावी. शहरात सायकल चालविण्याची संस्कृती रुजविण्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संघटना आणि व्यक्तींनी पुढाकार घेतला पाहिजे. लोकांचा सायकलकडे पाहण्याचा दुय्यम दृष्टिकोन बदलण्याची व सायकलिंगमुळे होणारे फायदे समजावून सांगितले पाहिजे. एवढेच करून चालणार नाही. शहरातील मार्केट, मॉल, रेल्वेस्थानक, बसस्थानक अन्य महत्त्वाच्या ठिकाणी सायकल पार्क करण्याची व्यवस्था असावी. सायकल संस्कृती रुजविताना जी वागणूक रस्त्यावरून मोटारसायकल, कार चालविणार्यां ना मिळते तीच सायकलिंग करणार्यांयना मिळाल्यास सायकल चालविण्याकडे नागरिकांचा कल वाढविण्यास मदत होईल. पालक पाल्यांना ५० ते ६० हजार रुपयांची मोटारसायकल घेऊन देतात. पण, दहा हजार रुपयांची सायकल घेऊन देत नाही. कारण ते त्यांना प्रतिष्ठेचे वाटत नाही. मोटारसायकलच्या किमतीपेक्षा महागड्या सायकल मिळतात. त्याने आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत व पैशाची बचत आणि अपघातांना पायबंद लावणे शक्य होते, परंतु ते सर्व या माहितीपासून अनभिज्ञ आहेत.

जगातील काही देशांमध्ये सायकल चालविण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. यामध्ये नेदरलँड देशाचा उल्लेख अवश्य करावा. नेदरलँडमध्ये तेथील लोक वाहतुकीचे साधन म्हणून ४० टक्के सायकलचा वापर करतात. यासाठी ठिकठिकाणी पार्किंग व्यवस्था, वाहतुकीचे नियम, सहज उपलब्धता या सर्व गोष्टींमुळे तिथे सायकल संस्कृती चांगली रुजली आहे. परदेशात कुठल्याही पायाभूत सुविधा उभारताना सायकलस्वारांची सोय लक्षात घेतली जाते. पायाभूत सुविधा उभारताना सर्वप्रथम पादचारी, सायकलस्वार, सार्वजनिक वाहतूक आणि त्यानंतर खासगी वाहने अशा पद्धतीने रस्त्यांची आणि पार्किंगची आखणी केली जाते. नेदरलॅण्डमध्ये २०१४ मध्ये एक अनोखा प्रयोग करण्यात आला. तिथे किलोमीटरभर लांब रात्री चमकणार्याा सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात आली आहे. फ्लोरोसंट रंगाचे विशिष्ट तुकडे सिमेंट-काँक्रीटमध्ये वापरण्यात आले असून, दिवसाच्या प्रकाशात ते ऊर्जा साठवून घेतात आणि रात्रीच्या अंधारात हाच रस्ता उजळून निघतो. स्पेनमधील सॅन सबॅस्टियन या शहरात २००९ साली जुन्या रेल्वेच्या बोगद्याचे रूपांतर सायकल ट्रॅकमध्ये करण्यात आले असून, हा जगातील सर्वात लांब सायकल बोगदा आहे. विशेष म्हणजे सायकलस्वारांच्या सुरक्षिततेसाठी यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा बसवण्यात आले आहेत. भारतातही सायकलचा वापर फार पूर्वीपासून होत आहे. सायकल हेच दळणवळणाचे प्रमुख साधन होते. मात्र, देशात सायकलसाठी म्हणून काही विशेष पायाभूत सुविधा उभारल्या गेल्याचे फारसे दस्तावेज उपलब्ध नाहीत. सायकलिंगबद्दलचे प्रेम वाढत आहे याबाबत शंका नाही, परंतु सायकलसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी लागणाऱ्या राजकीय इच्छाशक्तीचा आपल्याकडे अभावच आहे.

संकलन: संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4233 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..