नवीन लेखन...

युरोप मधील सिबलिंग डे

असे म्हटले जाते की क्लोडिया एव्हर्टने सिबलिंग डे साजरा करण्याची कल्पना दिली. यासाठी त्यांनी सिबलिंग फाऊंडेशनची स्थापना केली, ज्याला अमेरिकन कॉंग्रेसने एकमताने मान्य दिली. यानंतर दरवर्षी १० एप्रिल रोजी सिबलिंग डे साजरा करण्यास सुरुवात झाली.असे म्हटले जाते की क्लोडिया एव्हर्टने आपल्या वडिलांचे बालपणात मृत्यू पावलेल्या एलन आणि लिस्ट या भावंडांच्या सन्मानार्थ या दिवसाची सुरुवात केली. […]

जागतिक तंबाखूविरोधी दिन

तंबाखूमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून; एकटया मुंबईत हे प्रमाण 25.4 टक्के आहे. याशिवाय लहान मुलांतही धूम्रपान करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जागतिक तंबाखूविरोधी दिना’निमित्त प्रबोधनावर भर दिला जात आहे. […]

गोवा राज्य स्थापना दिन

इंग्रज १९४७ मध्ये भारतातून बाहेर गेले. पण पोर्तुगीज त्यांच्या ताब्यातील प्रदेश सोडत नव्हते. अखेर भारतीय लष्कराने दमण, दीव आणि गोवा हा प्रदेश ‘ऑपरेशन विजय’ अंतर्गत १९ डिसेंबर १९६१ रोजी जिंकला आणि भारतात विलीन केला. केंद्र सरकारने त्यावेळी दमण, दीव आणि गोवा यांना केंद्रशासीत प्रदेशाचा दर्जा दिला. नंतर ३० मे १९८७ रोजी गोवा या केंद्रशासीत प्रदेशाला भारताच्या घटक राज्याचा दर्जा देण्यात आला पण दमण आणि दीव यांचा केंद्रशासीत प्रदेशाचा दर्जा कायम ठेवण्यात आला. यामुळे १९ डिसेंबर हा गोवा मुक्ती संग्राम दिन आणि ३० मे हा गोवा राज्य स्थापना दिन म्हणून साजरा करतात. […]

आंतरराराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस

गिर्यारोहण हा साहसी क्रीडाप्रकार आहे की नाही याबद्दल जगभर जरी वाद सुरु आहे. मात्र निसर्गातील प्रतिकुलतेशी गिर्यारोहणात झुंजल्याशिवाय कोणत्याही शिखर किंवा सुळक्याचा माथा सर करताच येत नाही या वस्तुस्थितीबाबत मात्र कोणाचेही दुमत नक्कीच नाही. […]

भद्रकाली प्रॉडक्शनचा वर्धापन दिन

‘चाकरमानी’ हे ‘भद्रकाली प्रॉडक्शनचं’ पहिलं नाटक होते. त्यानंतर त्यांनी ‘केला तुका झाला माका’, ‘वस्त्रहरण’, ‘घास रे रामा’, ‘पांडगो इलो रे बा इलो’, ‘अफलातून’ ‘रातराणी’ ‘भैया हातपाय पसरी’ यांसारखी ३८ नाटकं केली. ‘भैया हात पाय पसरी’ चे १०१ प्रयोग केले…. […]

आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य दिन

नोकरी करताना वेळ नाही हे पालुपद फक्त स्वत:च्या संदर्भात, बाकी इतरांसाठी धावतपळत ती सगळी कामं करतच असते. एवढंच कशाला, नोकरी करून निवृत्त झाल्यावरसुद्धा ती घरातली सारी कामं स्वत:वर ओढून घेते. इतकी वर्ष माझं तसं घराकडे दुर्लक्षच झालं म्हणत पोळ्या करणा:या बाईला सुटी देते. आपण आहे ना काम करायला, मग कशाला पैसे खर्च करा म्हणत कामच करते. स्वत:वर पैसे खर्च करण्याआधी दहादा विचार करते. स्वत:च्या ‘फिटनेस’साठी तर एक पैसा खर्च करायलाही तयार होत नाही. ती विचार करते, त्यापेक्षा मी घरात थोडं जास्त काम करेन. भाजी आणायला गेल्यावर थोडं जास्त चालायला जाईन. पण हे एवढंच करून ती फिट राहू शकत नाही. त्यासाठी रोज वेगळा वेळ काढून व्यायामच करायला हवा. आणि स्वत:कडे अजिबात दुर्लक्ष न करता स्वत:साठी वेळ काढायलाच हवा. […]

‘अमर अकबर ॲ‍न्थनी’ चित्रपटाची ४५ वर्षे

मनमोहन देसाईं यांनी या चित्रपटात आपला लाॅस्ट ॲ‍ण्ड फाऊंड हाच हुकमी फाॅर्मुला वापरला. लहानपणी हरवलेले तीन भाऊ मोठेपणी योगायोगाने आपल्या आई पित्यासह भेटतात, आणि ते खलनायकाचा निप्पातही करतात. ही त्यांची हुकमी थीम या चित्रपटात सर्वधर्मसमभाव पध्दतीने मांडली. या चित्रपटातील तीन भाऊ एकाच वेळेस आपल्या आईला रक्तदान करतात असाही एक हास्यास्पद प्रसंग या चित्रपटात आहे. पण प्रेक्षकांना तेही आवडले. […]

मुंबईतील तारापोरवाला मत्स्यालयाचा वर्धापन दिन

२७ मे १९५१ रोजी मुंबईतील तारापोरवाला मत्स्यालयाचे राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते उदघाटन झाले होते. सर्व बाजूने सागराने वेढलेल्या मुंबईला सागरी मत्स्यसंशोधन केंद्र असावे अशी संकल्पना प्रथम १९२३ साली बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेचे कार्यवाहक श्री.मिलार्ड यांनी शासनापुढे मांडली. याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने मत्स्यव्यवसाय संचालक यांच्या नेतृत्वाखाली १९२६ साली तज्ञसमिती नेमली. दुसऱ्या महायुध्दानंतर मत्स्यालय उभारणीला चालना […]

‘चंद्रलेखा’चं ‘‘नटसम्राट’’ नाटक रंगमंचावर आलं

या नाटकाचा पहिला प्रयोग दि गोवा हिंदूअसोशिएशन, कला विभाग या संस्थेने २३ डिसेंबर १९७० रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे सादर केला होता. […]

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ११४ वा वर्धापन दिन

१९६१ मध्ये महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदारांच्या पुढाकाराने मराठी साहित्य महामंडळाची स्थापना झाली. त्यावेळी ते पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष होते. साहित्य महामंडळाची स्थापना झाली, त्यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद, विदर्भ साहित्य संघ, नागपूर अशा चार घटक संस्था मिळून महामंडळ असे त्याचे स्वरूप होते. मराठी भाषेसंबंधी असलेल्या आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या समान प्रश्नांवर विचार करणे, त्यावर चर्चा घडवून आणणे, एकाच व्यासपीठावरून त्या प्रश्नांची सोडवणूक करणे, त्यासाठी, समाजाच्या आणि शासनाच्या पातळीवर प्रयत्न करणे हे साहित्य महामंडळाच्या स्थापनेमागचे उद्दिष्ट होते. […]

1 5 6 7 8 9 73
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..