नवीन लेखन...

‘रविवार’ च्या साप्ताहिक सुटीची १२९ वर्षे

१८८४ मध्ये नेमलेल्या फॅक्टरी कमिशनला लोखंडे यांनी ५३०० कामगारांच्या सह्यांचे निवेदन दिले. त्यात आठवड्यात एक दिवस सुटी, सूर्योदय ते सूर्यास्त ही कामाची वेळ, दुपारी अर्धा तास विश्रांती अशा मागण्यांचा समावेश होता. पण, सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. लोखंडे यांनी आंदोलन सुरूच ठेवले. २४ एप्रिल १८९० रोजी त्यांनी दहा हजार कामगारांची सभा घेतली. त्यांच्या आंदोलनाला यश आले आणि १० जून १८९० रोजी ‘रविवार’ हा साप्ताहिक सुटीचा दिवस म्हणून जाहीर झाला. […]

जागतिक अन्नसुरक्षा दिवस

अन्न सुरक्षा ही एक सामायिक जबाबदारी आहे. सुरक्षित, पौष्टिक आणि पुरेसे अन्न चांगल्या आरोग्यास प्रोत्साहित करतं. त्याचबरोबर उपासमारीची समस्या दूर करतं.
भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India-FSSAI) ने राज्यांद्वारे सुरक्षित अन्न पुरवठा करण्यासाठी प्रयत्नासाठीच्या संदर्भात पहिले राज्य अन्न सुरक्षा इंडेक्स (State Food Safety Index-SFSI) विकसित केले आहेत. […]

पहिला क्रिकेट विश्वचषक

पहिल्याच सामन्यात भारताने अभूतपूर्व असा पराक्रम केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ६० षटकांत भारतीय गोलंदाजांना धू धू धूत ४ बाद ३३४ धावा केल्या. यात डेनिस अमिसचे शतक आणि कीथ फ्लेचरचे अर्धशतक होते. दोघांनी अनुक्रमे १३७ (१४७) आणि ६८ (१०७) धावा केल्या. पण शेवटच्या षटकांत माईक डेनिस आणि ख्रिस ओल्ड यांनी तुफान फटकेबाजी केल्याने इंग्लंड ३००च्या पलीकडे पोचले. डेनीसने ३१ चेंडूत ३७ धावा केल्या तर ओल्डने ३० चेंडूत तब्बल ५१ धावा केल्या. […]

पुण्यातील ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स’चा स्थापना दिवस

अर्थशास्त्राच्या क्षेत्रामध्ये विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था – संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवाचाही ही संस्था उत्तम उपयोग करून घेते. या विद्यार्थ्यांच्या अनुभवाच्या आधारावर अभ्यासक्रम निर्मितीमध्ये सातत्याने नव्या मुद्दय़ांची भर घातली जाते. अशा प्रकारचे नानाविध अभ्यासक्रम आणि विषय नव्या-जुन्या विद्यार्थ्यांसाठी केवळ शैक्षणिक पातळीवरच नव्हे, तर व्यवहाराच्या पातळीवरही तितकेच उपयुक्त ठरत आहेत. शेतीविषयक उद्योगधंद्यांमधील तसेच उद्योगांच्या अर्थकारणाचे बारकावेही या संस्थेच्या अभ्यासक्रमामधून जाणून घेता येतात. संस्थेमध्ये सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर ॲ‍्प्लिकेशन्स इन इकॉनॉमिक ॲ‍तनालिसिस हा प्रमाणपत्र अभ्यासक्रमही उपलब्ध करून देण्यात आला आहे. संस्थेमध्ये एम. एस्सी. अभ्यासक्रमाला नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीदरम्यान इंटर्नशिपचा काळ पूर्ण करावा लागतो. […]

शिवराज्याभिषेक दिन

५ जून १६७४ व ६ जून १६७४: या दोनही दिवशी राज्याभिषेकाचे मुख्य विधी संपन्न करण्यात आले. अनेक नद्यांचे व समुद्राचे जल रायगडावर मागविले गेले होते. या दिवशी अनेक होमहवन करण्यात आले, यजमानांची औदुंबर शाखांचे असं करवून घेतले होते आणि मग होमहवन संपन्न झाल्यावर शिवरायांनी स्नान केले आणि अभिषेक शाळेत दाखल झाले आणि तेथील सिंहासनावर आरूढ झाले. मग ब्राह्मणांनी मंत्रांच्या घोषात शिवरायांवर अभिषेक केले. या अभिषेकावेळी शिवरायांचा हात धरून ब्राह्मणांनी ‘महते क्षत्राय महते अधित्यात महते जानराज्यायेष व भरता राजा सोमोअस्माकं ब्राह्मणानांच राजा’ अशी घोषणा केल्याचा उल्लेख देखील सापडतो. (मराठ्यांचा इतिहास, रा.वि. ओतूरकर) […]

जागतिक पर्यावरण दिन

सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया-प्रतिक्रिया व आंतरक्रियांमधून साकार झालेली सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय. […]

जागतिक सायकल दिवस

हल्ली थोड्या अंतराच्या प्रवासासाठीही दुचाकी आणि चारचाकींचा सर्रास वापर केला जातो. त्यामुळे प्रदूषण, तापमान वाढीचे प्रमाण वाढले आहे. दिल्लीमध्ये तर वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी सम-विषमचा प्रयोग केला गेला. वाढत्या प्रदूषणाचा धोका वेळीच ओळखला नाही तर दिल्लीसारखी परिस्थिती आपल्या शहरातही उद्भवू शकते. त्यामुळे यावर उपाय करता येण्याजोगा एकच पर्याय आहे. तो म्हणजे शक्य तेवढ्या जास्त प्रमाणात प्रवासासाठी सायकलचा वापर करणे. प्रदूषण रोखण्यासोबतच शारीरिक आरोग्यासाठीही सायकल चालविणे उत्तम व्यायाम ठरतो. […]

राष्ट्रीय वाढदिवस दिन

साधारण चाळीस पन्नास किंवा त्यापूर्वी खेड्यापाड्यामध्ये सुरक्षित प्रसूतीची सोय नव्हती. सर्व काही अनुभवी सुईणीच्या हातात असायचं. शिक्षण सुद्धा कमी असल्याने जन्मलेल्या बाळाची जन्म वेळ तर सोडाच पण जन्मतारीख सुद्धा काही लोकांना माहित नसायची. मग ज्यावेळी शाळेत प्रवेश घ्यायची वेळ यायची, तेव्हा मुलाच्या पालकाना अचूक तारीख सांगता यायची नाही. त्यामुले जन्मतारीख कोणती असा प्रश्न विचारला तर, तारखेच्या नजीकचा एखादी घटना, एखादा सण असे ठोकताळे सांगितले जायचे. पण गुरुजींना एझ्याट तारीख हवी असल्याने, पण ती काही पालकांना सांगता यायची नाही. मग काय शाळा सुरु होण्याच्या आठ – दहा दिवस आधीची तारीख गुरुजीच मुलाच्या नावापुढे लिहायचे ती शाळा प्रवेशाची तारीख म्हणजेच १ जून आणि त्यापूर्वी ५-६ वर्ष हे जन्म वर्ष म्हणून लिहिलं जाऊ लागलं आणि बऱ्याच जणांना १ जून ही जन्मतारीख चिकटली. […]

प्रभात फिल्म कंपनीचा ९३ वा वर्धापनदिन

पार्वतीबाई दामले ह्यांनी स्थापनेचा मंगल कलश १ जून १९२९ रोजी ठेवला. ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ मध्ये बाबूराव आणि आनंदराव पेंटर ह्यांच्या हाताखाली चित्रपट निर्मितीचे धडे घेणाऱ्या दामलेमामा, एस फत्तेलाल, व्ही शांताराम आणि धायबर यांनी ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ सोडली. स्वत:ची चित्रपटनिर्मिती कंपनी सुरु करण्याचा ध्यास सर्वांना लागून राहिला होता. कोल्हापूरातील सुप्रसिद्ध सराफी पेढीचे सितारामपंत कुलकर्णी ह्यांची दामले मामांशी जुनी मैत्री होती. आणि त्यांचा दामलेमामांवर विश्वास होता. त्याकाळात सितारामपंतानी दामल्यांना भांडवल देऊ केलं. दामले– फत्तेलालांबरोबर शांताराम व धायबरही एकत्रित झाले, आणि ‘प्रभात’ची स्थापना १ जून १९२९ रोजी कोल्हापुरातील मंगळवार पेठेत झाली. […]

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा अर्थात एस टी चा वाढदिवस

१९४८ साली, गृहमंत्री मोरारजी देसाई यांच्या पुढाकाराने, मुंबई राज्य सरकार अंतर्गत ‘मुंबई राज्य वाहतूक सेवा’ सुरु करण्यात आली. त्या कंपनीची पहिली बस १ जून १९४८ रोजी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. ड्राइव्हर आणि मार्गदर्शकांना खाकी गणवेश व टोपी असा पोषाख होता. त्याकाळी, शेवरले, फोर्ट, बेडफोर्ड, सेडान, स्टडेबेकर, मॉरिस कमर्शिअल, अल्बिओन, लेलँड, कोमर आणि फियाट या दहा कंपन्यांच्या बसगाड्या वापरात होत्या. […]

1 4 5 6 7 8 73
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..