नवीन लेखन...

पितृदिन

पितृछत्र हे आकाशासारखे, समुद्रासारखे विशाल, अथांग आहे. साऱ्यांना सामावून घेण्याची ताकद त्यात सामावलेली आहे. लाडात वाढलेली लेक, दुसऱ्याच्या हातात सोपवताना ‘माझ्या काळजाच्या तुकड्याला सुखी ठेवा!’ बाप अतिवेदनेने न बोलताच डोळ्यांनी बोलून जातो. आईसारखे घाय मोकलून रडण्याचे स्वातंत्र्यही त्याला नाही. कारण, सर्वांचं सांत्वन त्यालाच करायचं असतं. […]

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यातील १४ फूट उंचीच्या पुतळ्याचे पासष्ठव्या वर्षांत पदार्पण

हा पुतळा कोणत्या शिल्पकाराला करायला द्यायचा याचा निर्णय घेण्याचे अधिकार समितीने ज्येष्ठ शिल्पकार विनायक करमरकर यांच्याकडे सुपूर्द केले होते. त्यानुसार भगवंतराव गोरेगावकर आणि नानाभाई गोरेगावकर यांनी हा पुतळा घडवावा, असे करमरकर यांनी सुचविले. या पुतळ्यामध्ये काही त्रुटी राहू नयेत यासाठी महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचा सल्ला घेण्यात आला होता, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी त्या काळात ९६ हजार ६४३ रुपये खर्च आला होता. […]

‘महाराष्ट्र टाइम्स’ वृत्तपत्राचा ६० वा वर्धापन दिन

यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की,”टाइम्सने मराठी वृत्तपत्र काढावे अशी सूचना मी केली होती, हे खरे आहे. कारण मराठी वृत्तपत्राद्वारे टाइम्सला मराठी मन समजून घ्यावे लागेल.मराठी वृत्तपत्राच्या सततच्या सान्निध्यामुळे महाराष्ट्रातील नव्या पुरोगामी विचारांची त्यांना ओळख होईल आणि टाइम्स व इतर पत्रांच्या द्वारे हा विचार महाराष्ट्राबाहेर असलेल्यांना कळेल, असा यात दोघांचा फायदा होणार आहे.” ही माहिती ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली. […]

क्रिकेटपटू कपिलदेव यांची कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी

२६ व्या ओव्हर मध्ये कपिल देव यांनी आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर कपिल देव यांनी गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरु केली. पुढचे अर्धशतक त्यांनी फक्त १३ ओव्हर मध्ये पूर्ण केले. त्यानंतरच्या ५० धावा फक्त १० ओवरमध्ये पूर्ण केल्या. […]

गोवा मुक्तीदिनाची सुरुवात

१९४७ साली भारत स्वतंत्र झाला , पण गोवा, दीव, दमण हे विभाग पोर्तुगीजांच्या अमलाखाली राहिले होते. गोवामुक्तीचे स्वप्न अखेर साकार करण्यासाठी शेकडो लढाऊ स्त्री-पुरुष सत्यागहींना आपले प्राण गमवावे लागले. हा लढा खरोखरच अभूतपूर्व असाच होता. […]

जागतिक सहल दिवस

सदर्न हम्पशायर मध्ये हा दिवस ऑगस्ट महिन्यातील पहिल्या सोमवारी साजरा केला जातो. […]

टिळक सुटले १६ जून आनंदाचा क्षण

१६ ता. रात्री ती गाडी पुणे स्टेशनापर्यंत न नेता अलिकडेच हडपसरला थांबली . चिटपाखरूही नसलेल्या त्या स्टेशनातून टिळकांना बंद चारचाकीमधे बसवले व पुण्याकडे रवाना केले. तरीदेखील आपल्याला येरवड्यात पाठवतील असे टिळकांना वाटत होते पण गाडी उजव्या हाताला बंडगार्डनच्या पुलाकडे न वळता शहराच्या दिशेने जाऊ लागल्यावर आपली नक्की सुटका झाली याची त्यांना खात्री पटली. गाडी गायकवाडवाड्यापाशी आल्यावर सामानासकट त्यांना उतरवले व धुरळा उडवत गाडी निघुन गेली. […]

राष्ट्रवादी काँग्रेस चा २३ वा वर्धापन दिन

१९९९ आणि २०१४ मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढले तेव्हा काँग्रेसचे जास्त आमदार निवडून आले. २००४ आणि २००९ मध्ये आघाडीत काँग्रेसचे संख्याबळ जास्त होते. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसला मागे टाकले. राष्ट्रवादीचे ५४ तर काँग्रेसचे ४४ आमदार निवडून आले. काँग्रेसची जागा घेण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्न गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत साकार झाले. […]

1 3 4 5 6 7 73
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..