नवीन लेखन...

पितृदिन

 
630-07071651 © Masterfile Royalty-Free Model Release: Yes Property Release: No Businessman playing with his baby

वडिलांचा गौरव करण्याचा हा दिवस!

गेल्या काही वर्षांमध्ये विविध डेज साजरा करण्याचा ट्रेंड चांगलाच रुजू झाला आहे. त्यातीलच एक दिवस म्हणजे ‘फादर्स डे’. आपल्या आयुष्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या वडिलांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
मुळात बाबा, वडील या शब्दांऐवजी ‘फादर’ वगैरे म्हणायला आपली जीभच लवकर तयार होत नाही.

प्रत्येकाच्या जीवनात आई इतके बाबासुद्धा महत्त्वाचे असतात. आपल्या घरच्यांसाठी, आपल्या मुलांसाठी आपण काहीतरी करतोय याची पुसटशी जाणीवही बाबा त्यांच्या चेहऱ्यावर कधी येऊ देतं नाहीत. घरामध्ये शिस्त टिकवण्यासाठी प्रसंगी बाबा कठोर होतात पण त्यांच्याशी असलेलं नात हे मैत्रीच्या नात्यासारखं आहे. पितृछत्र हे आकाशासारखे, समुद्रासारखे विशाल, अथांग आहे. साऱ्यांना सामावून घेण्याची ताकद त्यात सामावलेली आहे. लाडात वाढलेली लेक, दुसऱ्याच्या हातात सोपवताना ‘माझ्या काळजाच्या तुकड्याला सुखी ठेवा!’ बाप अतिवेदनेने न बोलताच डोळ्यांनी बोलून जातो. आईसारखे घाय मोकलून रडण्याचे स्वातंत्र्यही त्याला नाही. कारण, सर्वांचं सांत्वन त्यालाच करायचं असतं. कितीही गरीब, श्रीमंत वडील असो, तो आपल्या कमाईतला जास्त हिस्सा पत्नी, मुले, कुटुंब यांच्यावरच खर्च करतो. मला जे मिळालं नाही, त्यापेक्षा कितीतरी भरभरून परिवारातील सदस्यांना मिळावं या करिता अहोरात्र त्याची धडपड चाललेली असते. केवळ झिजत राहणं, हेच त्याचं ब्रीद असावं का?

आजच्या ‘फादर्स डे’च्या सर्व वडीलांना शुभेच्छा.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4059 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..