नवीन लेखन...

पहिली ग्रँड प्रिक्समोटर रेसिंग

 

पहिली ग्रँडप्रिक्समोटर रेसिंग फ्रान्समध्ये २६ आणि २७ जून १९०६ रोजी आयोजित करण्यात आली होती.

आजच्या तारखेमध्ये, जरी फॉर्म्युला कार रेसिंग पाहिल्यानंतर आपण ‘वेगाच्या जगात’ गुंग होत असू. तसेच व्हिडिओ गेमच्या जगतातही, फॉर्म्युला कार रेसिंग गेम हा सर्वात लोकप्रिय आहे. पण याची सुरुवात १९०६ मध्ये, २६ जून या दिवशी झाली, या दिवशी प्रथमच फ्रान्समध्ये मोटारींमधील व्यावसायिक ग्रँड प्रिक्स रेस आयोजित केली गेली होती. ज्याने सर्वांना केले. ही रेस पाहण्यासाठी जे जमले होते ते सर्व वेग बघून आश्चर्यचकित झाले होते.

खरं तर, १९०६ साली जेव्हा फ्रान्सने प्रथमच ग्रँड प्रिक्स मोटर रेसिंग आयोजित करण्याचा निर्णय घेतला तेव्हा ती पहिली कार शर्यत नव्हती. फ्रान्समध्ये वार्षिक गोर्डन बेनेट कपसाठी कार रेसिंग होत असे. गोर्डन बेनेट कपमध्ये एका देशातील फक्त ३ संघ सहभागी होऊ शकत होते, व तेव्हा कार उत्पादनात फ्रान्स जगातील आघाडीवरील राष्ट्र होते, तेथे बरेच संघ होते. या कारणास्तव, हा व्यावसायिक कार्यक्रम म्हणून विचार केला गेला, ज्यामध्ये कोणताही देश प्रवेश शुल्क भरुन कितीही संघ पाठवू शकत होता. ही रेस फ्रान्समधील ले मॅन्स या शहरात आयोजित केली गेली आणि या शर्यतीला फ्रेंच ग्रँड प्रिक्स असे नाव देण्यात आले.

या अनोख्या कार रेसिंगच्या प्रकारात पहिल्यांदाच ३४ संघांनी आपल्या गाड्या उतरवल्या, त्यापैकी २५ कार हे फ्रान्सच्याच होते.सहा कार इटलीहून आणि तीन कार जर्मनीहून आल्या होत्या. गोर्डन बेनेट कप बंद झाल्याच्या निषेधार्थ ब्रिटनने यावर बहिष्कार टाकला. अशा प्रकारे, ती तीन देशांमधील स्पर्धा बनली. या कार्यक्रमात प्रवेशासाठी २०० पौंड फी ठेवली गेली होती आणि सर्व खर्च अंदाजे दहा हजार पौंड झाला होता. या शर्यतीत भाग घेण्यासाठी, ड्रायव्हरसह कारच्या वजनाची स्थिती १००० किलोपेक्षा जास्त नसावी ही अट होती. काही लोकांचा म्हणणे पडले की ही अट फ्रान्सने स्वतःच्या फायद्यासाठी ठेवली होती, कारण त्यांच्या गाड्या इतर देशांपेक्षा हलक्या होत्या. २६ व २७ जून १९०६ या दोन दिवशी झालेल्या या स्पर्धेत ६४.११ मैलाच्या रेसिंग ट्रॅकवर स्पर्धकांनी बारा लॅप्समध्ये ७६९.३६ मैल अंतर कापले.विशेष म्हणजे ही शर्यत जरी फ्रान्स, जर्मनी आणि इटली या देशात झाली , परंतु त्याचा विजेता या तिन्ही देशांपैकी कोणाही नव्हता. ही शर्यत हंगेरीमध्ये जन्मलेली ड्रायव्हर फेरेंक सेजिस्कने (Ferenc Szisz)जिंकली, जो रेनॉ (Renault)कंपनीची कार चालवत होता.

या स्पर्धेत चॅम्पियन बनलेल्या रेनॉ कारची सरासरी जास्तीत जास्त गती प्रति तास फक्त ६२ मैल होती. टायर बदलणे, पेट्रोल भरणे आणि लुब्रीकेंट बदलणे हे काम रेनॉ कंपनीचे सर्वांना सर्वाधिक आवडले. रेनॉ कारची टीम यासाठी फक्त ४.५ मिनिटे घ्यायची, त्यावेळी आजची आधुनिक उपकरणे हल्ली नव्हती. या विजयामुळे रेनॉ कार कंपनीला ती प्रसिद्धी मिळाली होती की त्या वर्षात त्यांची कार विक्री १६०० वरून ३००० वर गेली होती.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4156 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..