‘गोलमाल ‘चित्रपटाला ४३ वर्षे पूर्ण झाली
मुंबईत ड्रीमलॅन्ड थिएटरमध्ये या चित्रपटाने खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादले. या चित्रपटातील अमोल पालेकर यांची रामप्रसाद आणि लक्ष्मीप्रसाद दशरथप्रसाद शर्मा अशी दोन रुपे घेतलेली भूमिका आणि त्यांचा आपले कार्यालयीन बॉस भवानी शंकर ( उत्पल दत्त) यांच्याशी झालेला गंमतीदार संघर्ष या सूत्राभोवती हा खुसखुशीत मार्मिक मिस्कील मनोरंजक चित्रपट रंगला. […]
