नवीन लेखन...

जागतिक रंगभूमी दिन

रंगभूमीवरील महत्त्वाची क्रांती ब्रिटीशकाळात १६ व्या शतकात एलिझाबेथ थिएटरच्या काळात जेव्हा शेक्सपियरने रंगभूमीचे पुनरुज्जीवन केले त्याकाळापासून म्हणजे `हॅम्लेट’, `मॅक्बेथ’, `ऑथेल्लो’, `किंगलियर’ या शोकांतिका किंवा `एज यू लाइक इट’, `ट्वेल्थ नाईट’ अशा सुखान्तिका रंगभूमीवर गाजत होत्या त्यावेळेस इंग्रजी रंगभूमीचा काळ हा सुवर्णकाळ मानला गेला. व्हिक्टर ह्युगो, अलेक्झांडर डय़ुमा, आल्बेर काम्यू, सॅम्युअल बेकेट, मोलिअरने फेंच रंगभूमीवर गाजवलेली नाटके, जर्मन रंगभूमीवरील ब्रेख्त आणि गटे यांची नाटके, अमेरिकन रंगभूमीवरील युजीनओ नील यांची नाटके, आधुनिक रंगभूमीचा पाया घालणारा नॉर्वेतील इब्सेन या नाटककारांच्या नाटकांनी रंगभूमीवर क्रांतीच केली. […]

किर्लोस्करवाडी : महाराष्ट्राचा मानबिंदू!

सुरुवातीला किर्लोस्करवाडीत फक्त पाण्याचे पंप बनत होते. किर्लोस्करांचे पंप इतके लोकप्रिय झाले की, पुढे पंप म्हणजे किर्लोस्करांचे, अशीच ख्याती झाली. किर्लोस्करांनी पुढे आपल्या उत्पादनांचा पसारा वाढवला आणि डिझेल व विजेवर चालणाऱ्या पंपांबरोबरच यांत्रिक नांगर, ट्रॅक्टर्स अशा शेती उत्पदनांसाठी लागणाऱ्या यंत्रांचीही निर्मिती तिथेच सुरू झाली. […]

चिपको आंदोलनाला आज ४९ वर्ष पूर्ण झाली

जंगलात तब्बल अडीच हजार झाडांचा लिलाव त्यावेळी करण्यात आला. गावातील आंदोलकांनी विरोध केला, तरीही लिलाव झालाच. ठेकेदारांना लोकांच्या विरोधाची कल्पना होती. त्यांनी कार्यकर्त्यांना लोकांची जुनी देणी देण्याच्या निमित्ताने चामोलीत बोलावून घेतले. त्यांच्या गाफीलपणाचा गैरफायदा घेऊन त्यांनी गुपचूप रेनीच्या जंगलात मजूर पाठविले. एका छोट्या झाडांची कत्तल करण्यासाठी आलेल्या मजुरांना पाहिलं आणि धावत गावात ही खबर दिली. पण, गावात फक्त १५-२० स्त्रिया आणि काही छोटी मुले होती. पुरुष मंडळींना निरोप कळवून ते परत येईपर्यंत दोन-तीन दिवस लागणार. तोपर्यंत जंगलतोड अटळ होती. हे लक्षात येताच गावातील महिला आपल्या मुलांसह जंगलात आल्या. बायकांसह सगळी लहान मुलं झाडाला चिकटून उभी राहिली. […]

‘मुंबईचा जावई’ चित्रपटाची बावन्न वर्षे

या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. प्रथम तुज पाहता जीव वेडावला, आज कुणीतरी यावे, कारे दुरावा कारे अबोला, कशी करु स्वागता अशी या चित्रपटात गाणी आहेत. या चित्रपटाचे काही चित्रीकरण गिरगावातील खोताची वाडीतील खंडेराव ब्लॉक येथे झाले होते. […]

लॉकडाऊनची दोन वर्षं

कडाऊन करण्याची तीन प्रमुख कारणे होती. पहिले उद्दिष्ट म्हणजे, विषाणूची साखळी तोडणे. साखळी तोडली, तर विषाणूचे पेशीविभाजन रोखले जाईल. दुसरे म्हणजे, बाधित व्यक्तिंमध्ये वाढ झाली, तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तयारी करायला आरोग्य यंत्रणेला अवधी मिळेल आणि तिसरे उद्दिष्ट म्हणजे, मानवी वर्तणुकीवर काम करणे. याचा अर्थ पुरुष, स्त्रिया आणि मुलांना हात धुणे, मास्क घालणे आणि सुरक्षित वावराचे नियम पाळण्याची सवय लावणे. […]

जागतिक क्षयरोग दिन

ट्युबरक्युलोसिस म्हणजे (क्षयरोग) हा संसर्गजन्य आजार असून , तो ‘मायकोबॅक्टेरिया ट्युबरक्युलोसिस’ या जंतूमुळे होतो. वाढत्या शहरीकरणामुळे अस्वच्छ परिसर , दाटीवाटीने वाढणार्या झोपड्या व जास्त घनतेच्या परिसरात राहणाऱ्या लोकांमध्ये क्षयरोग होण्याची शक्यता अधिक असते. […]

कोकण मराठी साहित्य परिषदेचा वर्धापनदिन

ठाणे जिल्हयात यापैकी ६ शाखा कार्यरत आहेत. कोमसापच्या सर्व शाखांतर्फे दरवर्षी स्थापना दिवस विविध कार्यक्रम करून साजरा केला जातो.
कोकणातील आवाज,लेखणी महाराष्ट्रभर पोचवण्यासाठी असलेलं हे व्यासपीठ.. […]

शहीद दिन

भारतमातेसाठी बलीदान करणाऱ्या क्रांतीकारकांमध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांची नावे एकत्रितपणे घेतली जातात. इंग्रज अधिकारी सँडर्स याच्या जाचातून मुक्तता करणाऱ्या या तिघांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. […]

राष्ट्रीय दिनदर्शिकेचा केंद्र सरकारने अधिकृतरीत्या स्वीकार केला

राष्ट्रीय दिनदर्शिका ही भौतिकशास्त्रज्ञ डॉ. मेघनाथ साहा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचविलेली आणि २२ मार्च १९५७ रोजी केंद्र सरकारने अधिकृतरीत्या स्वीकारलेली दिनदर्शिका. ती खगोलशास्त्रावर आधारित असून ऋतुचक्र, भौगोलिक परिस्थिती इ. अनेक घटकांचा सखोल विचार करून तयार करण्यात आली आहे. म्हणूनच तिचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे. […]

जागतिक जल दिन

पाणी हे जीवन आहे, असे जे म्हटले जाते ते किती खरे आहे! परमेश्वर मानवासाठी जी नवीन सृष्टी निर्माण करणार आहे, तिचे एक ओझरते वर्णन पवित्र शास्त्रात आढळते. त्यात लिहिले आहे की, तिच्या मध्यभागातून स्फटिकासारखी निर्मळ अशी नदी असेल आणि तिच्यातून जीवनाचे पाणी वाहत असेल! नाही तर पाण्यासाठीच होईल तिसरे जागतिक महायुद्ध. […]

1 15 16 17 18 19 73
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..